Sunday, October 14, 2012

आई..तुझे नसणे आयुष्याचे उणे

 
आई..तुझा हात
वात्सल्याचे नाते

आई..तुझा स्पर्श
दुधावरची साय जणू

आई..तुझे रागावणे
माणूस घडविणे..

आई..तुझी मुद्रा
सहनशीलतेचा दीप

आई..तुझी माया
पांघरलीस पृथ्वीची काया

आई..तुझी शिकवण
आयुष्याची साठवण

आई..तुझी नजर
वाईटापासून दूर रहा

आई..तुझी हाक
मिठीचा संदेश

आई..तुझी आठवण
साक्षात खरेपण

आई..तुझे नसणे
आयुष्याचे उणे


-subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: