Tuesday, October 23, 2012

ज्योत आता कुठं दिसत नाही


 
 
सणांची महती आता तेवढी उरली नाही
पिवळ्या धमक झेडूंनी तोरणं चौकटीवर
सिंमेंटच्या दारांवर खिळ्यातून झुलत
अलगद लटकवली जाताहेत
वाडा..कौलारु घर..बैठ्या चाळी सारेच हरविले
बंदिस्त अधिक बंदिस्त जग
बाहेरून डोकावायचीही सोय नाही
झरोकाही उरला नाही.
कोनाडाही दिसत नाही
ज्योत आता कुठं दिसत नाही
प्रकाश अंधुकसा तोही वीजेच्या दिव्यांनी सजतोय
नवी नाती तशीच बंदिस्त होत आज माणूस जगतोय..
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: