Monday, February 6, 2012

हूरहूर...आधी हूरहूर येणा-या क्षणांची..
लपलेल्या त्या अवकाशात दडलेल्या हळुवार स्पंदनासारखी..
संथ चाललेले नादही मग गोंगाट भासू लागतात..
इतर वेळी सहजपणे जाणारी वेळही मग सेकंदाची गणिती ठोके ऐकवीतात..
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तीचे रुप वेगवेगळे..
कधी आतूरता
कधी दाहकाता
कधी धूसरता
कधी स्वप्नही...
प्रत्येकाच्या नजरेत तिची किमया आगळी..
रुपात ती कधीच साठत नाही..
चंचल, चपळ तरीही हवीहवीशी..
शैशवापासून वृध्दत्वापर्य़ंत सतत तुमच्या बरोबर
तुमच्या श्वासासारखी..
जी सतत फसवते
मात्र ती टाळता येत नाही..
ती लागते मात्र तिची आसही तेवढीच
जी दिसत नाही पण असते..
अस्तित्व नसले तरी भासते ते मनात.
कधी झोपेतही...
रोजच्या व्यवहारात..प्रत्येक क्षणी...
सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

बातम्यांपेक्षा जाहिरातींचा दणका

मी बाहेर पडूनही आता दोन वर्षे उलटली...आताचा नवा सूर्य तरीही तसा सारखाच उगवतो मावळतोही.
काहींना नव्याने बाहेर पाठविले..तर कांहीवर नवे चेहरे आणून बसविले.
आजचा त्याचा चेहरा फारसा चांगला नसला तरी त्याची सवय पुणेकरांना लागली आहे..ती मात्र कमी होत नाही.
बातम्यांपेक्षा जाहिरातींचा दणका अधिक वाचकांना सहन करावा लागतो.
पर्याय येत आहेत तेवढे ते सशक्त नाहीत... असो जोपर्यंत वाचकबर्ग मानत नाही.तो पर्य़त जाहिरातदार तिकडे वळणार नाही.
कुठलीही गोष्ट एका झटक्यात घडत नाही..त्यासाटी लागतो ते अवधी.
मात्र त्याची जागा इतर घेणार हे निर्विविद आहे,
यासाठी मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे.
ते होणार हे नक्की..पण किती काळाने ते सांगणे कठीण आहे...