Saturday, February 25, 2012

आयुष्याच्या गाठी


आयुष्याच्या दोरीच्या गाठी
असतात बळकट
सुटताना घालतात गुंता
सहजी सुटत नाही अशा...

सारी स्वप्ने आधुरी ठेऊन
अचानक विचार न करता
सारेच इथे ठेऊन
एकटेपणीच निघून जातात...

घर उदासवाणे भासणारे
व्यक्तिच्या खुणा जपणारे
भावनांचा आवेग
विसरता न येणारे ...

आठवणींचे बांध फुटतात
उमाळा दाटतो
सारा काळ डोळ्यासमोर येतो
भुतकाळात रमत जातो..

होणारे टाळता येत नाही
समेवर दाद मिळत नाही
कधी संपेल गाणे
सांगता येत नाही...

म्हणून म्हणतो जागा रहा
आल्या घडीचे स्वागत करा
विसरू शकणारे सारे सोडून द्या
उद्यासाठी आशा मात्र जपत रहा...subhash inamdar,Pune


subhashinamdar@gmail.com

Wednesday, February 22, 2012

व्हावी दिगंत कीर्ति जगभरी..

उंच बांधा, भव्य कपाळ
भाळी शोभे कुंकवाचा साज

चेहरा उभा, ओठ नाजूक
अंगी शिरशिरी, रुप साजिरे
डोळे धारदार, नाक चाफेकळी
बोलण्यातली हास्याची झालरी..

बोटात कला, येई बाहेरा
बोलण्यात साधा भास
अंगात शिस्त बाणेदार...

तशी चारचौघींसारखी, पण तेवढीच उजळ
सोज्वळता अंगी, वाणीत हेलकावे...

रुपाचा तोरा, केसाचा तोरा
पाठीवर ऱुळे शेपटाचा पिसारा..

नजरेत बाणा, कणखर पणा..
अंगी असे बहुत साधेपणा..

सतत भासतो गंभीरपणा
जवळ येताच दिसे बाणेदारपणा..

खळखळून हसणे
नजाकत फसवी
नाना रुपात साठे अन्य देहबोली..

मनाचा तळ, ह्दयीचा उमाळा
कसा शोधू जाणा
अंतरीचा...

आकाशात तारकापुंज
स्पष्ट दिसे रवि-शुक्र संग

साठवून ठेवी रुप हेच माझ्या चित्ती
व्हावी दिगंत कीर्ति जगभरी.....
सुभाष इनामदार, पुणे

नेसली निळी पैठणी-सीड़ीचे प्रकाशनलावणी सम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाण यांच्या हस्ते आणि नामवंत संगीय संयोजक इनॉक डॅनियल यांच्या उपस्थितीत `सप्तक` म्युझिकच्या वतीने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण आणि घरंदाज लावण्यांची `अनुपमा चंद्रात्रेय `यांच्या आवाजातली डॉ. ज्योती ढमढेरे यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या, तर अनुपम चंद्रात्रेय यांनी गायलेल्या 'नेसली निळी पैठणी' या. सीड़ीचे प्रकाशन...२१ फेब्रुवारी. २०१२.टिळक स्मारक मंदिर,पुणे

निळ्या पैठणीत नटून अमेरिकेत स्थायीक झालेल्या अनुपमा चंद्रात्रे (पूर्वाश्रमीची पुण्याची अनुपमा ढमढेरे) हिने आपल्या आईने रचलेल्या लावण्यांची सीडी सुलोचनाबाईंच्या हस्ते मंगळवारी, २१ ला पुण्यात प्रकाशित केली. अतिशय उत्साही वातावरणात दादही तेवढीच दिलखुलास मिळाली.

इनॉक डॅनीयल यांनी परदेशात राहून भारतीय संस्कृती जपणा-या अनुपामाचे विशेष कोतुक केले. सुलोचनाबाईंनी तर संगीतकार वसंत पवार यांच्यामुळे आज आपण जे काही आहोत त्याचे श्रेय त्यांना दिले..अगदी डोळ्यात पाणी आणून त्यांनी वसंत पवारांच्या आठवणीने स्वतःला आणि श्रोत्यांना गलबलून सोडले. आपण एकवेळ परमेश्वराला आठवणार नाही.मात्र वसंत पवारांना आठवणार नाही असा दिवस जात नाही... त्यांनी आपल्याला लावणी शिकविली...घडविली..
मला लावणी गायिका म्हणून उभे केले ते संगीतकार वसंत पवार यांनी. 'नावगाव कशाला पुसता, मी हाये कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची' ही त्यांनी दिलेली पहिली लावणी प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांच्यामुळे मिळालेल्या यशाची चटणी-भाकरी आम्ही अजूनही खात आहेत, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांनी येथे काढले.
त्यावेळी त्या बोलत होत्या. ढमढेरे यांच्याच सुलोचनाबाई म्हणाल्या, की पुण्याशी माझा जुना बंध आहे आणि इथल्या लोकांची पसंती मिळाल्याशिवाय कलाकाराचे नाव होत नाही, असेही त्यांनी संगितले.

मोघे म्हणाले, की लावणी ही 'परफॉर्मिंग पोएट्री' आहे. त्याची प्रचीती 'नेसली निळी पैठणी' या सीडीत येते.

या निमित्ताने लावण्यांचे पुस्तकही 'अटकर बांधा' या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना सौ. ज्योती ढमढेरे यांनी लावण्याविषयीचे आपेल मतही नोंदविले. `लावणी ही लावण्यपूर्ण, शृगांरिक, समर्पित भावनेनी नटलेली. मनाला उल्हसित करणारी. सकारात्मक दृष्टीकोन देणारी काव्यरचना आहे.शृंगार हा तिचा आत्मा आहे. ती कधीही अश्लील, बिभत्स होता कामा नये. लावणी ही उपशाश्त्रीय व लोकसंगीताच्या बांधावर उभी असेलेली सौंदर्यपूर्ण कलाकृती आहे. इतर संगीताच्या मानाने लावणी उष्ण प्रकृतीची आहे.`

Monday, February 20, 2012

आनंदाचा सुस्कारा..


सभागृहात शांतता होती.. सारे लोक कान आणि डोळे एक करुन स्वर साठवित होते. चेह-यावर तृप्तीचे भाव अगदी स्पष्ट दिसत होते. त्यांनी जसा पहिला सूर व्हायोलिनमधून आळवला तसा सारा श्रोतृवर्गही तेवढाच उल्हसित झाला.


...
केवढ्या तरी मेहनतीने त्याने तो दिवस ठरविला होते. स्थानिक निवडणुकांच्या सभा आणि घरोघरचा प्रचार सुरु होता.
रविवार असला तरी सकराळी दहाची वेळ होती.

त्यातच लग्नाचा मूहूर्त..आणि तोही शेवटचा.... अनेकांचे फोन त्याला येत होते. आम्ही येणार होतो..पण काय करणार....त्याच्या लग्नाला जायलाच हवे...

तोंडावर येतो म्हणू चहा-कॉफिचा आग्रह करणारे हेच ते सारे..आता काढता पाय घेत यायला तयार नव्हते..

--------------------
त्याने जिद्द सोडली नाही....कलावंतालाही धीर दिला. तुम्ही तुमचा कार्यक्रम उत्तम करा बाकी मी पाहतो....सागितले..त्यांच्यात उमेद दिली. ठरल्या दिवशी कार्यक्रम केला.. काय होईल...पैसे कमी मिळतील.
त्यातून निधी फारसा उभा नाही रहाणार इतकेच...

मात्र अर्धा अधिक हॉल भरला...नामवंत काही हजर झाले. कौतुकाची थाप मिळाली ..
आणि आता तो आता पुढे रंगणार हे नक्की झाले..
त्याने आनंदाचा सुस्कारा सोडला....

मानवमानव आज, किस ओर जा रहा
कहा भटकता, किस ओर जा रहा

सृष्टि का, क्यूं कर रहा विनाश
आखिर तुझे, किसकी है तलाश

मचा सब ओर हाहाःकार
कब वंद होगा ये नरसंहार

मारे जा रहे निर्दोष,
थंडा होगा कब आक्रोश

तूने तो , चांद परभी विजय है पाई
तू पर क्यूं खोजी, नफरत की खाई

व्यर्थ्य बना फिरता है महान
लेकिन अभिमानी का, कैसा मान

अब हो रहा सदभाव, परस्पर प्यार
मिले कभी तो, सुख समाचारसो. सरोज सुभाष इनामदार, पुणे
-सन २०००

दोहे शांती के


जब तक शांती न चल सकी, करती रही विवाद
किये शांती के नाम पर, झगडे और फसाद

मेरा मत ही सत्य है, अन्य सभीका झूट
जब तक यूं चिंतन चले, रहे शांती सुख रुठ

शांती न तर्क वितर्क है, शांती न वाद विवाद
वैर तजे सो ही चखे, स्वयं शांती का स्वाद

उंची मेरी मान्यता, हीन पराया ज्ञान
अपने ही राज्य में ढूंढो, शांती का बयान

शांती देव है, शांती रुप है, परमात्माका विशाल
ये मूर्ख, दूत बनो शांती के इस जगमे बेमिसाल

घात करती है मानव की ये अणुशक्ती का दक्ष,
किसी की मत सुन, किसीका मत सोच, बचाव मानव का लक्ष

फिर देख ये शांती कैसे दिन लेकर आएगी
यहां सोने की चिडीयां भी वापस सपने लाएगी...
सौ. सरोज सुभाष इनामदार, पुणे
- १९९८

Sunday, February 19, 2012

गोनीदांच्या श्रींची इच्छेने श्रवणसंपुटे तृप्त जाहली
पुण्याच्या पावन विश्रामबाग वाड्यातील भवानी महालात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या विद्ममाने शिवजयंतीच्या पावन दिवशी गो.नी. दांडेकरांच्या लेखणीतून साकारलेले `हे तो श्रींची इच्छा`च्या कादंबरीच्या अभिवाचनातून उपस्थित शिवप्रमी संतुष्ट जाहले.
रविवारची संध्याकाळ. १९ फैब्रुवारी. २०१२. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत गोनदांच्या कन्या आणि साहित्यिक सौ. वीणा देव यांच्या पुढाकाराने शिवराज्याभिषेकावर आधारित असलेले हे लेखन प्रभावीपणे सादर झाले.

राज्याला छत्रपती देणारा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक त्याची सारी पार्श्वभूमी त्यावेळचे सारे वातावरण आणि त्याकाळाची परिस्थितीचे यथोचित सादरीकरण या अभिवाचनातून श्रोत्यांच्या कानी पडले..एकूणच श्रवणसंपुटे तृप्त झाली.

सासू (डॉ.विणा देव), सासारे (डॉ.विजय देव) जावई (रुचिर कुलकर्णी) आणि नातू (विराजस कुलकर्णी) यांनी आपल्या प्रभावी वाचनातून सारा तो सोहळा..आउसाहेब आणि शिवाजी महाराज यांचे पुत्रप्रेम. गावोगावच्या लोकांना झालेला आनंद. गागाभट्ट आणि कवीभूषण यांच्या उपस्थित झालेल्या राज्याभिषेक सोहळ्याची वर्णने...सारेच ऐकून उपस्थित सारेच शिवाजी महाराजांच्या त्या काळात न्हाऊन निघाले.

गोनि दांडेकरांच्या संवादातील प्रतीभा..नव्हे त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेले असावे असे लेखणीतील जीवंतपण ही त्या लेखनाची ताकद होती. ते वाचन करताना सारेच अभिवाचक त्या काळात रमून तुमच्याशी जणू ती गोष्ट सांगताहेत असा भास होत होता.

राजगडावर ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होऊन महाराष्टाराचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांना राज्याभिषेक कसा झाल्या त्याचे वर्णन कानात टिपून घेत श्रोतेही त्याकाळात स्वतःला नेत होते. ती भाषा. ती भावना आणि लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा अतिव आदर सारेच इथे ओतप्रोत दिसत होते.

विश्रामबागवाड्याच्या त्या महालात झुंबरांच्या साक्षिने आणि देखण्या ऐतिहासिक दरबारात बसून ऐकताना जी वातावरण निर्मिती झाली ती शब्दात सांगणे कठीण आहे. त्यासाठी पुन्हा एकदा असा अभिवाचनाचा कर्यक्रम होणे आवश्यक आहे.
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276