Wednesday, March 14, 2012

पिंपळपान...जाळी झालेले एक पान सहज वहीत गवसले
जणू जुन्या स्मृतींना देत त्या आठवणी साठवित पहुडले

किती दिवस झाले आता निटसे आठवत नाही
किती स्वप्ने गळून गेली आता ती उगाळायची नाही

वाट पाहुन थकलेले पाय कधीचेच थांबलेले
आता नव्या स्वप्नांच्या धुंदीत तेही विसावलेले

उरी चेतल्या , जागल्या त्या आठवांच्या नोंदी
किती आणा, शपथा ती होती एक धुंदी

नाही साहवेना आता जुनी झाली गाठोडी
चेतावली त्यात आता अंधुकशी चिंधोटी

सारी कधी स्वप्ने पुरी होत असतात का ?
तरीही कुणी ती पाहायची सोडतात का ?

गेली वर्षे आणि महिने गेला तो काळ
पिंपळाची जीर्ण पाने सुकलाही तो बाळ

नांदती सुखी आता दोन जीव दोही दिशी
उरलेल्या आयुष्याच्या गाठी आली आता एकादशी....
सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276


एका वेदनेला फुंकर


आज मी प्रतिमेहुनही अधिक सुंदर चेहरा अनुभवला
त्याला खूप बोलायचे होते..पण आज तो अबोल होता..
त्याचे डोळेच सारे काही सांगत होते..
त्याला आज माझीही ओढ दिसत होती
मात्र संधी तशी प्रत्यक्षात नाही मिळाली..

एका वेदनेला फुंकर घालण्यासाठी माझे मन आतुर झालेले..
पण आज ती वेळ केवळ शब्दांनी होत होती...

सारी देहबोलीतून ती बोलत होती..
सांगत होती मला खूप काही सांगायचयं..

कितीतरी अशा महिला असतील समाजात
ज्यांच्या मानेवर आणि शरीरावर एक भला मोठा वजनी काटा ठेवलाय...
तो उचलून दूर करण्याचे सामर्थ्य ...आहे कुणापाशी...


त्या खचल्या आहेत...रोजच्या जगण्याला ..त्याच त्या वेदनेला झेलत.
त्यांची मनही बोथट बनली आहे..

जागतिक महिला दिन...झाला ना परवा..
तो कोणासाठी..कोणत्या त्या महिलांसाठी..की..फक्त ते नाव..लेबल ..सुभाष इनामदार,पुणे.

Monday, March 12, 2012

आयुष्य ओघळताना..


आयुष्य ओघळताना मन चिंब भिजलेले
दडवून आत सारे ते सांग ना आता रे

मी केले दूर तेव्हा होती मने जवळी
जाणून घेतल्याही ती होती अविट गोडी

कधी दूरावलो, विसावलो तरीही आठव तुझीच होते
सुस्तावल्या मनाला चेतना तूच देते..

तू सांग ना खुळे ग हा हाल तुझाच होतो
स्पर्शाची मिटता पाने हलकेच रंगही पुसतो

ही वेदना उरीची आता न काही उरली
त्या आठवातूनी मी आयुष्य साठवित झुरलो
सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276