Thursday, August 9, 2012

अवघे पाउणशे वयमान ...! अण्णा हस्मे

गेल्याच रविवारी..५ ऑगस्ट २०१२ला आमच्या मेहुण्यांची अण्णा हस्मे यांची पंच्च्याहत्तरी बोरीवलीच्या डॉन बॉस्को शाळेच्या सभागृहात साजरी झाली..त्यांच्या कुटंबीयांची तर हजरी होतीच पण मंत्रालयात कामकरणारे त्यांचे अनेक सहकारीही त्यांच्यावरच्या प्रेमाखातर या कार्यक्रमाला हजर होते..यात आर. व्ही. कुलकर्णी, बापुराव वैद्य, मोरेश्वर उगावकर,अरविंद जोग यांचा समावेश होता..ते सारे १९५८ पासुनचे कर्यालयातले सहकारी...माझे मेहुणे अत्यंत साधे.लाघवी आणि प्रेमळ ..त्यांनाही माझ्या मामेबहिणीबरोबर अगत्य होते सा-यांचे..
आज बहिणाच्या नसण्याची हूहहूर होती पण तरीही..
`ठेविले अनंते ...`
या न्यायाने त्यांच्या मुलाने आणि मुलीनी हा पंच्च्याहत्तरीचा सोहळा साजरा करुन त्यांच्या आयुष्यात अधिक आनंद देण्याचा प्रयत्न केला...मोठ्या परिवाराचे आपण एक घटक आहोत..याचा आनंद जमलेल्या सा-यांना झाला..हा जरी कौटुंबिक सोहळा असला तरी आजच्या काळात...असे एकत्र येण्याचे प्रसंग फार दुर्मिळ होतात... सारे विखुरलेले नातेमंडळी आवर्जुन त्यांच्यासाठी हजर होती...त्यांच्यासाठी एक मानपत्र तयार केले ते या प्रसंगी त्यांचेच ज्येष्ठ सहकारी बापुराव वैद्य यांच्या हस्ते रंगमंचावर दिले...त्याचेच हे दर्शन..
अवघे पाउणशे वयमान ...!

आनंदाच्या, उत्साहाच्या, हसतमुख व्यक्तिमत्वाचे ति. अण्णा हस्मे...तुम्हाला आम्हा सर्वांचा सन्मानाचा मुजरा!
अण्णा, तुम्ही आमचे स्फूर्तिस्थान. पिढ्या घडविणा-या सा-यांचे श्रध्दास्थान. आयुष्याच्या लढाईत कित्येक हादरे तुम्ही पचविलेत, परतवून लावलेत, त्यांच्याशी दोन हात केलेत. कष्टाने तुम्ही जीवन आनंदात फुलविलेत! आशेच्या प्रत्येक किरणांना तुम्ही कुटुंबियात साठविलेत!

बांद्र्याच्या दोन खोल्यातला तुमचा संसार आणि त्यात तुम्ही निर्माण केलेले सुखाचे मळे आजही आमच्या मनात कोरलेल्या आठवणीसारखे ताजे आहेत! तुम्ही घरातल्या वातावरणात स्वतःचे `तेजोमंदिर` निर्माण केलेत...रुजविलेत..वाढविलेत...आम्ही सारे त्याचे साक्षीदार आहोत...!मंत्रालयात नोकरी करुन दीर्घकाळ तुम्ही घरात पहाट जागती ठेवलीत. म्हणून तर चारकोपच्या चार खोल्यातल्या भिंतीत तुमच्या आनंदाचा सुवास कायम दरवळत राहिलेला आहे..छंदाची जोपासना केलीत. पत्नीचे गुण हेरलेत..मुलांची उत्तम उभारी केलीत. सारे घर कसे स्वागतासाठी नटवून, सजवून ठेवलेत! पण...असो...!

अण्णा, तुमचे येणे म्हणजे आमच्या सर्वांच्या घरातला आनंदाचा उत्सव असतो..तुम्ही सतत येत रहा...सारी आमची घरे आणि मनेही तुमच्या स्वगतासाठी उत्सुक आहेत !

तुम्ही दुःखाचा लवलेशही कपाळावर न ठेवता.. आनंद घराघरात पसरवित आहात ! हाच आनंद पंच्चाहत्तरीनंतरही तुम्ही ठिकठिकाणी ऊजळवून आणाल..अण्णा, तुमचे हे उत्साहाचे झाड पहाणे..त्याखाली सावलीसारखे बसणे यातच आम्हाला धन्यता वाटते..

तुमचा आशिर्वाद..तुमचा भक्कम आधार असाच आम्हाला कायम मिळत राहो...उत्तम आरोग्याचे संपन्न जीवन यापुढेही शताब्दीपर्यंत अखंडीत राहो,,हिच आम्हा सर्वांची इच्छा...आणि त्या परमेश्वराकडे मागणे !


ति. अण्णा हस्मे....
तुमच्या पंच्च्याहत्तरीच्यानिमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीने तुमचा मान राखायचा आहे..पण ते या शब्दांच्या कांही ओळीतून...आमच्या भावना त्यातून व्यक्त होतील..आणि त्या तुम्ही समजून घ्याल ही आशा आहे...

या निमित्ताने कुटंबियांनी केलेल्या विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेताना स्वतः अण्णा हस्मे आणि इतर उपस्थित
(All Photos by Pankaj Joshi)
५ ऑगस्ट, २०१२-Subhash Indmdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276