Thursday, September 20, 2012

हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो



 हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो

आज भुवरी सकल दिशांनी तांडव ते सारे
काय करावे कुठे पहावे आम्हा नच ठावे..
तुझा आसरा म्हणून सर्वथा हेच नित्य सावे..11

 
 हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो


तूच विधात्या सांग ईश्वरा शरण कुणाशी जावे
त्याच राऊळा उभा राहूनी नतमस्तक आहे..
तुझ्या दर्शनातून उमले आयुष्याचे धागे..11

  
 हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो

आजपासूनी तुझी प्रार्थना मनात मी करतो
जनात आहे तुझीच मूर्ती मनात ती स्मरतो..
हे गजवदना तुझ्यापुढे मी उभय हस्त जोडतो..11

हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो







सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, September 19, 2012

जय गणेशा...




गणपती तुझी कीर्ति महान
आम्ही सारेच मागतो शांतता आणि समृध्दीचे वरदान
हे एकदंता गजानना स्वकरुप सुंदर विनायका
तुच त्राता या जिवांचा
आम्हास दे बुध्दी
दुःख क्लेष अन् विघातक सारे
विरुन जावे ..पुन्हा न यावे
दे आम्ही शक्ति...
तुझ्याच रुपे तुझ्याच नामी एकमुखाने आता मारु ललकारी...

भयकारी ती नको उराया
सारे व्हावे तुप्त
आजपासूनी दहा दिवसांचे
दर्शन तुझेच मात्र...

तुझ्या रुपाचा एकमुखाने करीतो आम्ही पुकार
हे विघ्ननाशना विनायका
स्विकारतो तुझा अधिकार
प्राप्त व्हावया.. आशिश तुझा मग
वाहतो शब्दातून ...
तो आता स्विकार....


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, September 17, 2012

चला जीवन आनंदी करुया....


आनंदीपणा कधीही एकट्याचा नसतो
सभोवतालची सारी त्याची हक्कदार असतात
वातावरण आणि त्यात राहणारे सारे जण तो ते देत असतात
आनंद हा उमलून येत नाही..
तो असतोच
पण तुम्हाला भासतो
तेव्हा तो तुमच्या आय़ुष्यात सामिल झालेला असतो..
हाच आनंद इतरांना देऊन
त्यांचेही जीवन आनंदी करण्याचा यत्न करुया...
चला आजच त्याची सुरवात करुया....


इति- सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
95525926726

आनंद भाटे यांच्या स्वरांची बैठक तेवढीच बोलकी




शनिवारी झालेल्या डॉ. प्रभा अत्रे यांच्या ८१ व्या सत्कार सोहळ्याच्या पाठोपाठ 'गानवर्धन' आणि 'तात्यासाहेब नातू फाउंडेशन'च्या वतीने दिला जाणारा 'स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार' तरुण आणि शास्त्रीय संगीत पुढे नेणारा तडफदार गायकाला दिला जाणारा पुरस्कार सोहळाही रविवारी टिळक स्मारक मंदिरात असाच रंगला..यंदा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा शिष्य आणि बालगंधर्व चित्रपटाने बहुचर्चीत झालेला गायक आनंद भाटे यांला तो सन्मानपूर्वक डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या हस्ते दिला गेला.


पुरस्कार सोहळ्यानंतर आनंद भाटे यांनी सादर केलेला राग पूरिया कल्याण आणि त्यानंतरची विलंबित बंदिश ऐकून श्रोत्यांना काही काळ पंडितचींच्या गाण्य़ाचा या कलावंतात स्पर्श असल्याची जाणीव झाली.. आनंद भाटे यांची शास्त्रीय संगीतातील तयारी आणि त्याची स्वरांची बैठक तेवढीच बोलकी असल्याचे रसिकांना मनोमन पटले...किराणा घराण्याच्या अभ्यासू ..विचक्षण अशा गायनाने संपन्न असा डॉ. प्रभा अत्रे यांनीही आनंद भाटेच्या गायनाला तन्मयतेने दाद दिल्याचे रसिक अनुभवित होता..



बसंत रागातल्या काही बंदिशी सादर करुन तर आनंद भाटे यांनी प्रेक्षागृहातून वारंवार टाळ्यांचे कौतूक ऐकले. डॉ. प्रभा अत्रे यांनी रचलेली आणि नुकतीच त्याला शिकविवेली रचना `देवा लंबोदर गिरीजा नंदना`, त्यांच्यासमोर सादर करतानाही तिच मोहकता आणि स्वरांचा लगाव कायम ठेवला..

शेवटी पं.भीमसेन जोशी या गुरुचे अजरामर भजन ..जो भजे हरि को सदा...त्यांच्या आठवणींना उजाळा देत कमालीच्या तडफदारपणे आणि रंगतदार गाऊन तन्मयता आणि स्वरांवरची फिरत आणि सादरीकरणातली आर्तता सारेच दाखवून दिले.. त्यांना तबला साथ केली ती भरत कामत यांनी तर संवादिनीवर संगत केली ती सुयोग कुंडलकर यांनी तेवढीच मोहक.



आरंभी पुरस्कार सोहळ्यात `गुरूंना खूप शिष्य मिळतात आणि शिष्यांनाही खूप गुरू मिळतात. पण ज्या गुरूंमध्ये कलेची ताकद असते, त्यांचे शिष्यच गायक बनतात. गुरूंच्या कलेची ताकद शिष्याच्या कलेतून समोर येते. तुम्ही ज्या गुरूंकडून संगीताचे धडे घेतले, त्यांची कला पुढे नेणे ही शिष्याची जबाबदारी आहे; पण गुरूची नक्कल मात्र करू नका,` असा कानमंत्र उस्ताद सईदुद्दीन डागर यांनी दिला.

डॉ. अत्रे म्हणाल्या, 'या क्षेत्रातील ही पिढी कर्तबगार आहे. नवीन मुले आव्हानांना सामोरे जातात. स्वत:चा वेगळा व्यवसाय आणि संगीतकलेची जोपासना अशा दोन्ही गोष्टी ही पिढी सर्मथपणे करते आहे..'


पुरस्कारानिमित्त बोलताना भाटे म्हणाले, 'मी या क्षेत्रात अगदी नवखा असताना गानवर्धन संस्थेने मला प्रोत्साहन दिले. नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य या संस्थेकडून केले जाते. त्या संस्थेकडून मला मिळालेला पुरस्कार मौल्यवान आहे.' याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कृ.गो.धर्माधिकारी यांनी संस्थेचा उद्देश स्पष्ट केला..तर राजेंद्र कंदलगावकर यांनी आनंद भाटेच्या कारकीर्दीविषयी आपले निरिक्षण नोंदविले.

तात्यासाबेह नातू फौंडेशनच्या वतीने बोलताना शारंग नातू यांनी यापुढे आम्ही हा पुरस्कार सुरु ठेवणार असून यापुढे कथ्थक नृत्यातील कलावंतासाठी स्वतंत्र पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी केली. अपरिचित कलावंतांचे कार्यक्रम करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे उद्दीष्ट स्पष्ट केले.

दोन दिवसांच्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला सोहळा आणि त्यानंतरचे कलावंताचे गायन यातूनच संस्थेची काटेकोर शिस्तही नजरेतून सुटली नाही..खरं तर यामुळेच हा यशस्वी झाला म्हटले तरच ते योग्य ठरेल.




सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com

9552596276



-------------------------------------------------------------------------

सूरांनी जोडलेली नाती वाढावित...

डॉ. प्रभा अत्रे




आज माझ्या नात्यातले कोणी नाही..पण सूरांनी जोडलेल्या नात्यातल्या मंडळींनी माझा वाढदिवस असा करावा याचा अधिक आनंद आहे..हीच नाती अधिक वाढावित हिच इच्छा...किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका स्वरप्रभा डॉ. प्रभा अत्रे यांनी शनिवारी टिळक स्मारक मंदिरात आपल्या भाषणाच्या आरंभी सांगितलेल्या दोन शब्दांनी सारे रसिक तर भारावलेच पण सारे साधक कृतार्थ पावले..


संगीतामुळे गुणी आणि ज्ञानी माणसांचा सहवास मिळाला. शाश्वरताची जाणीव आणि पूर्णत्वाकडे जाणारा मार्ग कधी न संपणारा असतो, याचे भानही संगीतानेच दिले. हा सांगीतिक प्रवास रसिकांच्या प्रेमामुळेच यशस्वी झाल्याची भावना ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली.



"गानवर्धन' संस्थेतर्फे त्यांचा ८१व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अतिशय भावमधूर आणि स्वरांच्या चाहत्या रसिकांच्या साक्षिने त्यांना जेव्हा मंत्रोच्चाराच्या गजरात सुवासिनींनी ओवाळले तेव्हा तो सोहळा पाहणा-या रसिकांचे मनही गहिवरुन गेले..


तुमच्या गाण्याने सरस्वतीच्या वीणेवरही रोमांच उभे राहतात ...अशा पवित्र स्वरांना आणि त्या स्वरप्रतिभेचा गौरव होताना पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे आम्ही सारे धन्य झालो. स्वर हा किराणा घराण्याचा ईश्वर होता आणि या ईश्व्राची आराधना करून रसिकांना आनंद देण्याचे काम डॉ. प्रभा अत्रे यांनी केल्याचे विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी म्हटले. शिवशाहिरांनी त्यांना अशाच गात रहा असा आशिर्वाद दिला. तर उल्हास पवार यांनी त्यांच्या सुरेल मैफलीचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याच्या आठवणी सांगितल्या..



सुचेता भिडे-चाफेकर यांनी धवल अशा फुलांच्या आणि मोजक्या शब्दातून प्रभाताईंना शुभेच्छा दिल्या. तात्यासाहेब नातू फौउंडेशनच्या वतीने शारंग नातू यांनी २५ हजार रुपयांचा चेक देऊन प्रभाताईंचा सन्मान केला.

गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृ. ग. धर्माधिकारी यांनी आपल्या संस्थेच्यावतीने शिवशाहिरांच्या हस्ते त्यांच्या आत्तापर्य़च्या सुरेल प्रवासाची साक्ष असणा-या शब्दातून सन्मानपत्र अर्पण केले..



सत्कार समारंभानंतर ख्यातनाम गायक उल्हास कशाळकार यांनी आपल्या सुरेल स्वरातून डॉ. प्रभा अत्रे यांना स्वरांची फुलेच अर्पण केली..त्यांच्या जोरदार तानांनी आणि नादमय बंदिशीतून मल्हार रागाच्या आलापीतून विविध छटांचे दर्शन घडले. दीड तासाच्या या मैफलीची साथही तशी उत्तम साथिदारांनी कमालीची रंगवीली. तबला साथ केली ती पं. सुरेश तळवलकर यांनी तर हार्मानियमची संगत डॉ. अरविंद थत्ते यांची होती...

स्वरातून बहरलेल्या मैफलीतून नादब्रम्हाची ती सुरेलता अवघ्या मंदिरात अखेरपर्यत निनादत होती..



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

(यातील सारी छाय़ाचित्रे आहेत नव्यानेच छायाचित्रांच्या व्यवसायात आलेल्या नचिकेत सुरेश जोग यांची..)

Sunday, September 16, 2012

लोक कोळसा प्रकरणही विसरतील.....

सुशीलकुमार शिंदे


"लोक बोफोर्ससारखे प्रकरण विसरले. त्याचप्रमाणे कथित कोळसा प्रकरणही विसरायला वेळ लागणार नाही,'' अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री व लोकसभेचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज कोळसा प्रकरणावर टिप्पणी केली..




अशी प्रकरणे करणारे आणि त्यात सामिल असलेले लोक यांचे यामुळेच फावते..
खर सांगा माननीय शिंदेजी,लोकांना केवळ मतांचा अधिकार आहे..ते त्यातुन या प्रश्नाची उत्तरे देतात..पण हे सरकारी पक्षाचे लोक हे विसरतात..की त्यांना मतदारांचे प्रश्न आणि देशापुढीस अडचणी आणि आर्थिक संकटात सापडलेल्या ..महागाईच्या खाईत बुडालेल्या नागरीकांनी त्यांच्यासाठी निवडून पाठविले आहे...


अण्णा हजारेंसारखे नेते लोकांची निदर्शने करुन संसदेला जागे करतात...तरीही देशातील सत्ताधारी पक्ष याकडे लक्ष देत नाहीत. सातबारा देण्यावरून पुण्यातील संबंधित अधिकारी पैसे घेताना रंगे हाथ पकडला जातो..अनेक प्रकरणे करणारे मंत्री ,सरकार सत्ता भोगित राहते...काय करु शकतो...


शिंदे साहेब लोकांच्या लक्षात सारे असते...
पण ते लक्षात आहे हे दाखविण्यासाठी त्याच्याकडे मार्गच नाही...
म्हणून तर सारे घडते..हे तर दुदैर्व..

दुसरे काय ?


आम्ही सारे विसरतो
म्हणून तर यांचे फावते
जनतेच्या पैशावर उड्या मारणारे
त्यांच्याच खिशात हात घालतात..
तेही डोळ्यादेखत...
आम्ही फक्त पहातो..टिपतो...
पण हेच आम्ही पेटून उठू..
हे ही ध्यानी ठेवा...
ज्वालामुखी निद्रिस्त आहे..
त्याला तसाच ठेवा..




subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276


"लोक कोळसा विसरून जातील,' असे विधान गमतीने केल्याचे सांगून "कधी कधी गंमत अंगलट येते' असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी कराड सांगितले.
शिंदे येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले, ""मी नुकताच एका ठिकाणी गमतीने बोललो होतो, की लोक कोळसा विसरून जातील. रात्रीच्या शाळेत माझ्याबरोबर शिकलेल्या मित्राच्या सत्काराच्या वेळी त्याने कोळशावर टीका करून लोकांना हसवले होते. त्यावर मी "हात धुतले, की काळे डाग निघून जातात,' असे बोललो होतो. मात्र, कधी कधी गमतीचा भागही अंगलट येतो.''