Saturday, November 17, 2012

असून सारे दिप आज महाराष्ट्र अंधारात बुडालाविझवून सारे दिप
आज महाराष्ट्र अंधारात बुडाला
केवळ आठवणीत ऊरून
मराठी माणसांना जागे करुन
स्वतःचे अस्तित्व नाहीसे करुन
साहेब, तुम्ही निघून गेलात...


तुमच्यामुळे मराठी माणसाला ताठ कणा मिळाला..
अंगात बळ आले
बाहूत ताकद आली.
मस्तकात सत्त्याविरुध्द चिड आली..

तुमच्यामुळे भाव वाढला
तुमच्यामुळे स्फुरण चढले
तुमच्या अस्त्तित्वाने सारेच भरून पावले
आज तुम्ही कायम सोडून गेलात
सारा महाराष्ट्र पोरका झाला
सारा मराठी मुलूख दुःखात बुडाला

अश्रुंना आवरुन आम्ही तुम्हाला आठवू
तुमची स्वप्ने खरी होण्यासाठी
 प्राणप्रणाने लढू..
तुम्ही फक्त एकच आशिर्वाद मुखी ठेवा..
लढत रहा...-सुभाष इनामदार, पुणे


Thursday, November 15, 2012

नाती ..नाती रक्ताची ती चिकटतात
न मागताच
ठरवून मागीतली तरी न मिळणारी
कधी हळवी.. तर कधी आधाशी
सारे काही त्याच्या हातात
तुम्ही फक्त स्विकारत जायचे
काही दिसतात तशी वागतात
काही दाखवतात आणि वागतात मात्र वेगळेच
नातीबंधने झुगारून देता येत नाहीत
ती अखेरपर्य़ंत तुमची सावलीसारखी पाठराखण करतात
स्वतःसाठी न मागणारी नाती सर्वांना मिळू देत
हिच प्रार्थना..त्या अस्तित्वात नसणा-या ईश्वराकडे...


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276