Thursday, January 31, 2013

शब्दातून आयुष्याचा नवा अर्थ


रोज नव्या शब्दातून आयुष्याचा नवा अर्थ  उमजताना दिसतो..तो माझ्या फोसबुकच्या मित्रांबरोबर मी शेअरही करत असतो..
पण तो एकत्रित करुन तुमच्यासमोर मांडावा यासाठी हे सारे...

तुम्ही ते गो़ड मानून घेता..म्हणूनच हे धाडस

अपला,

सुभाष इनामदार, पुणे


-----------------------------------------
नव्या पानावर नवा थेंब पडावा
आयुष्यातला नवा दिवस नवे तेज घेऊन यावा..
नवे ते शिकवावे
ते आठवणीत साठवावे
मागचे वाईट सारे काही एका क्षणात पुसून जावे

सारे काही आरशासारखे कोरे असावे
जे चित्र दिसेल ते सारे नवेच असावे
कोरुन काढलेल्या त्या चित्राला स्वतःचे विश्व असावे
सांधलेल्या प्रत्येक बांधावरुन रोज नवे पाणी वहावे


खरं तर देवासाठी नमस्कार करण्यासाठी असा एखादाच दिवस का असावा...

मनात असेलल्या आणि जनात वावर असलेल्या देवाच्या नावाचा ध्यास
सतत अंर्तमनात असतो..
मग असे देवाचे दिवस घालून त्यांना असे एकाच दिवशी का अधिक आळवता...


ध्यानी , मनी, चित्ती
तुझीच मूर्ती..
अनंदाने करतो ध्यान
लाभे मला सारे समाधान

...


माझा अमृतकुंभ रिता व्हावा
सारे अमृत माझ्या मित्रांना प्राशन करता यावे
रिती झालेला कुंभकलश पुन्हा पुन्हा भरत रहावा
आयुष्याच्या वाटेवरती आनंदाचे कंद फुटावे
सारे क्षण टिपताना आजही स्वप्नवत् भासावा
उद्याची चिंता करण्याला वेळ अपुरा पडावा..

भास नको ही सत्त्यात उतरावी
दिसलेले सारे प्रत्य़क्षात यावे...
----दिवस चोरणारा एक लबाड महिना म्हणजे फेब्रुवारी
एक तर तो मार्चच्या बजेटची आठवण करुन देतो.
तुम्ही सरकारी कर भरला की नाही याची खातरजमा करतो.
मात्र नोकरदारांना अपेक्षित असी दोन-तीन दिवसाची सवलत देतो..
नवीन वर्षाची आठवण तो अधिकवेळा करुन देतो..
करकपातीमुळे घराच्या खर्चावर टाच आणतो.
विशेषतः बजेटसाठी झटणा-या अर्थतज्ञांना पुन्हा एकदा उजाळा देतो.
थंडीचे मान कमी करतो..
उन्हाळ्याचा चटका देतो..
वसंताची चाहूल देतो.
खरेदीला विश्रांती देतो..

असा लाडका फेब्रुवारी महिना ..


----------------

आईच्या उबदार साडीतली उब
प्रेमाचे भरते देते
जगातल्या सा-या दुःखाची थंडी
तेव्हाच गायब होते...
त्या साडीची दुलई बनवा
आणि पांघरा तुमच्या मुलांना
पहा
त्यांनाही तसेच वाटते का नाही..;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

भिजलेल्या वाटेवर एकदा सहज पाय पडला
अंगावरुन वीज जावी तसा जीव गुदमरला
धपकन धाडकन पुरता सपाट झालो
आजुबाजूला पहाणारे तसेच धावत गेले


------------------------

जुने सारेच काही वाईट नसते...
मन मोहरुन गेले असे सारेच काही साठवून ठेवायचे नसते..
जगात वावरताना स्वतः कधीही विसरायचे नसते..
स्वतःसाठी जगताना इतरांचे भान ठेवणे सोडायचे नसते..-----------------------------------


प्रेम दाखवावं लागतं...
होय आधी ते उमलावं लागतं.
अंकुर फुटून पाझर फुटावा तस ते वहावं लागतं.
दोन मनांना ते पटावं लागतं
एकांतात रुजावं लागत.
समाजात रुजावं लागतं..
दुःख पांघरून उबदार करावं लागतं...

होय प्रेम दाखवावं लागतं...


--------------------------------

चेहरे अनेक फसवतात
हसवतातही...
चेह-यावरुन भावना पसरुन राहतात
विरुनही जातात,,
हेच चेहरे आयुष्यात बोलायला लागतात
खरं सारं..सागंत जातात..


------------------------

रात्री झोपताना शरीर जमीनीवर टेकते
मन मात्र अवकाशात भरारी घेत फिरते


-----------------------------------------प्राजक्ताची ओंजळ घेऊन तुला द्यायला आलोय
बघ ते सारे विसरलेले पुन्हा साठवायला आलोय
 


 

      
- सुभाष इनामदार, पुणे
९५५२५९६२७६
 

 subhashinamdar@gmail.com

No comments: