Thursday, February 14, 2013

खरा माझा मैत्रीचा दिवस

आज सकाळी टिळक रोडवरच्या मासेमारीजवळ आमचा जुना मित्र रमेश भाटकर फिरायला जाताना दिसला..त्याचे लक्ष नव्हते पण मीच थाबविले..सध्या कामं काही फार करत नाही..एक चित्रपट केलाय..आता धावपळ फार नको वाटते...वगैरे गप्पा झाल्या..

 
हा मराठी अभिनेता असल्याचे जाणारे कित्येक जण म्हणत आमचेकडे पहात होते..एक मुलींचा ग्रुप जात होता..त्यातली एक मुलगी तुम्हीच ना रमेश भाटकर..
तो म्हणाला..हो
तुम्ही असे सहजपणे का चाललाय.. तुम्ही जरा वेगळे ..
तो म्हणाला, आम्ही काय रस्त्यानं चालू नये...आम्हीही तुमच्यासारखेच आहोत..असे चाललो म्हणून काय झाले?
सर, मला तुमचा फोटो काढायचाय..
तो म्हणाला , मग काढा ना..
त्याने झटकन स्टाईलबाज पोज दिली.
तिने फोटो काढला.
तो घोळका दिसेनासा झाला..
पुढे चालतच रमेश भाटकर टिळक रोडच्या दिशेने चालू लागले..
ते दशभुजा गणपतीपासून सारसबागेपर्य़ंत सकाळी चालत आले होते...खरं म्हणजे तो मुंबईत असतो.पण खरा तो आणि तीही ..आता ती हायकोर्टाची न्यायाधीश आहे...मृदुल भाटकर..त्यामैत्रीचा धागा अजून जोडला गेलाय...तो असा..साक्षात उभा ठाकला...
खरा माझा मैत्रीचा दिवस असा साजरा झाला....


सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com

9552596276

1 comment:

Yashodhan Walimbe said...
This comment has been removed by the author.