Friday, February 15, 2013

आयुष्यभर शोधतोय

माझ्या मनात अपार माया
शरीरात अगणीत उर्जा
कानठळ्या बसतील असा तीव्र आवाज
तुम्हाला ऐकू न येणारा

दाही दिशातून एकच नाद
एकच आशा
चाहुल फार..
चांदण्यात चालताना बनविन माझे घर
सूर्याच्या तळपत्या किरणांनी झळाळून जाईल
वर्षा ऋतुच्या चिंब ओल्यातही गळणार नाही
कडाक्याच्या थंडीतही दव पडणार नाही
वादळे आली तरी घर माझे
शाबूत आहे..एक ऋषींच्या तपा इतके
ते अढळ आहे..

आज सांगो कुणी
त्यांचा पत्ता
आयुष्यभर शोधतोय
मीच त्या क्षितीजाचा तो बिंदू
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: