Monday, February 18, 2013

मदत

 

मदत करणारे हात आज आसुसलेत
त्याची किंमत समजणारे मात्र आक्रसलेत


मागितल्याशिवया केलेली मदत
कदाचित आवडणार नाही
तुमचा हेतू त्यांना कधी कळणारही नाही...

रोज भोवती असंख्य प्रश्न
निवडीचा आहे तुमचा यत्न


हात देतानाही जरा सावध रहा
स्वतःवर तेव्हाही विश्वास हवा

मदत कधी तोंडून सांगू नका
घेतला वसा कधी टाकू नका
तुमचा विश्वास तुमच्यावर खास

मदतीसाठी आहे एकच ध्यास

धन हे केवळ जतन करु नका
ज्याला गरज 
त्याला हात पसरवायला लावू देऊ नका


 

इति- सुभाष इनामदार,पुणे

No comments: