Monday, February 4, 2013

निवृ्त्तीचा काळ

निवृ्त्तीचा काळ
घरच्यांना भार
आधीच हिटलर
आता आणखी धार...

पूर्ण वेळ घरात
बराच वेळ स्वयंपाकघरात
नुसते बसून होतात
आताची तुमची लुडबूड फार..

जरा बाहेरही जात चला
दुपारीही आराम करा
थोडी घरचीही कामे करा
घराला थोडा आधार बना..

कमाई होती..तेव्हाही मजा नाही केली
आत्ता तरी थोडा हात ढिला सोडी

सगळ्य़ांत मिसळून जा
आपले बनून जा...

बघा काय होईल गंमत
जगण्य़ात येईल बघा जंमत..
सगळ्य़ांना आपलेसे वाटाल..
जीवनच काय घर हसते राखाल..


सुभाष इनामदार,पुणे

No comments: