Wednesday, May 22, 2013

मनोरंजनाच्या दालनात दिमाखदारपणे मिरविणार.. खो खोसिध्दार्थ जाधवसह अनेक पूर्वज च्या आपल्या जुन्या वाड्यात रहायचे..त्या वाड्यात त्यांचा वंशज असलेला श्रीरंग देशमुख रहायला येतो..आणि एकेक पीढीचे एकेक पूर्वज आपला खेळ खेळू लागतात...
 लोच्या झाला रे... या नाटकावर आधारीत हा सिनेमा काही विलक्षण दृष्य़े..पारंपारिक पिढी बरोबर चालत आलेले लोकसंगीत आणि त्याला लाभलेला अभिनयासह नृत्याचा थाट...केदार शिंदे यांच्या तीन वर्षाच्या खंडानंतर एक जंगी मराठी सिनेमाचा खेळ ते घेऊन येताहेत...खो खो...

हा सिनेमा हा पूर्वसुरींच्या साम्राज्यात जावून काही त्या त्या पिढ्यांचा घटना आणि प्रसंग  वेगवेगळ्या सिनेमॅटिक पध्दतीने यात दिसतात.. सारी खास दृष्ये तुमची नजर आणि मन प्रसन्न करतील..


 या महिन्याच्या ३१ तारखेला हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट वेगळीच गंमत मराठी प्रेक्षकांना या चित्रपटातून दाखविणार आहे. त्यांना प्रेक्षक आपला हा चित्रपट मनोरंजनाचा नवा खजाना म्हणून नक्कीच अनुभवतील याची खात्री वाटते.  पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खास या चित्रपटाच्या प्रसिध्दी साठी उषा उत्थप यांनी तयार केलेले गीत ऐकविले..निर्मात्या शोभना देसाई यांनीही केदारच्या नेतृत्वाखालील ही टीम यांनी खो खो तून तयार केलेली कलाकृती मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा आशावाद व्यक्त केला.
सिध्दार्थ जाधव यांनी एकही संवाद नसलेली भूमिका करताना केदारच्या दिग्दर्शनातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगितले.. माझ्या थोरल्या भावासारखा असलेला  भरत जाधव मोठा कलाकार तर आहेच पण आपल्या इतर सहका-यांनीही प्रत्यक्ष चित्रिकरणात पंचेस सांगून प्रसंग खुलवितो.हे ही स्पष्टपणे सांगितले.

विजय चव्हाण यांची भूमिका काही प्रसंगातून नक्कीच प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आणेल इतकी उत्तम सादर केल्याचे प्रशस्तीपत्रक भरत जाधव यांनी दिले. त्याच्या मते केदारच्या गोष्टीत गंमत असते. त्यात तो परिपूर्ण असतो. गोष्ट स्वतःची असल्याने त्यात अनेकविध गोष्टीची भर सहजपणे पडते...आणि सर्वात महत्वाचे म्हणचे त्याच्या चित्रपटात काम करणे म्हणजे  उत्साहाला अधिक वेगळा आकार मिळतो..
सुवासिनी या मिलिकेत दिसलेली पुण्याची प्राजक्ता माळी हिचेही या चित्रपटाद्वारे पहिले पदार्पण आहे.तिच्या मते...केवळ चांगले दिसणे..छान कपडे घालून मिरविणे नाही..यात अभिनयाला भरपूर जागा आहे..केदार शिंदे यांनी अनेक प्रसंगी `वाह क्या बात है` असे स्पष्टपणे सांगावे उत्तमपणे सादर केले आहेत. माझ्याबरोबर सारीच मोठी कलावंत मंडळी यात असूनही त्यात माझा नवखेपणा  कधीच निघून गेला..मला खूप आवडले या चित्रपटात काम करायला.. प्राजळपणे प्राजक्ता बोलत होत्या..भन्नाट कथानक...उत्तमोत्तम तांत्रिकता ..ओठांवर रेंगाळावीत अशी गाणी..आणि सुरेश देशमाने यांचे छायाचित्रण..शशांक पोवार यांचे संगीत आणि चेतन देशमुख यांचे स्पेशल इफेक्ट...सारेच खो खो या चित्रपटाला मनोरंजनाच्या दालनात दिमाखदारपणे मिरविणारेच आहे..


पाहू या ३१ मे ला प्रत्यक्ष चित्रपटगृहात...
-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276No comments: