Sunday, August 4, 2013

मैत्री म्हणजे ...

आज मैत्री दिवस साजरा केला जातो..खरे मित्र कोण जो संकटाच्या वेळी उपयोगी पडतो...असे वस्तुतः म्हटले जाते..पण या मैत्री दिवसाचे वर्णन करणारी ही रचना ...मैत्री म्हणजे नाही केवळ गाणे फक्त क्षणांचे 
मैत्री म्हणजे दो -हदयातील नाते युगायुगांचे..

मैत्री म्हणजे तरल मुलायम मोरपिस हळुवार
 मैत्री म्हणजे दोन मनांचे पंख मनांच्या पार..

मैत्री म्हणजे रंगवनातील झुळझुळणारे वारे 
सुख-दुःखाच्या पलिकडे ती जाणून घेते सारे ..

मैत्री असते नाजुक सुंदर भाषा डोळ्यांची 
शब्दाविणही पटते ओळख हळव्या प्रेमाची.. 

मैत्री हसते ,मैत्री रडते ,मैत्री जपते मित्र 
अशा मैत्रीचे चल रेखू या गोड गुलाबी चित्र...

-संगीता बर्वे, पुणे
1 comment:

आशा जोगळेकर said...

मैत्रीचं हे वर्णन प्रेमाला ही तंतोतंत लागू पडतंय ।