Friday, March 8, 2013

व्हायोलीन मैफलीतून जपल्या गजाननराव जोशींच्या स्मृती


सातत्याने दहा वर्ष आपल्या गुरुंचे स्मरण करणारा कलावंत म्हणजे..ज्येष्ठ व्हायोलीन वादक पं. भालचंद्र देव. नित्य वसा घतल्यासारखे ते एकट्याने आपल्याला झेपेल, पटेल आणि परवडेल अशा पध्दतीने त्यांचे गुरु पं. गजाननबूवा जोशी यांची जयंती ते फेब्रुवारीत साजरी करुन त्यांच्यास्मृतींना आपला कलेतून वंदन करीत असतात. त्यांच्या जीवनात गुरुंचे स्थान महान आहे.

रविवारी २४ फेब्रुवारी २०१३ला यंदाही त्यांना पुण्यात ही मैफल आयोजित केली. केवळ तेच नव्हे तर त्यांची कन्या आणि शिष्या सौ. चारुशीला गोसावी यांचेसह ते व्हायोलीन वादन सादर करतात.
आपल्या शिवाय दोन वर्षापूर्वी पं. रत्नाकर गोखले आणि यंदा सौ.निलिमा राडकर या व्हायोलीन  वादकांना त्यांनी या सेवेत रुजू करुन घेऊन आपला परिवार वाढता केला आहे.

यंदाची मैफल त्यांना निलिमा राडकर यांच्या वादनाने केली. राग पुरिया कल्याण सादर करुन व्हायोलीनचे सूर सांधत एक सुरेल सेतू त्यांना रसिकांच्या मनात झुलता ठेवला..


पं. भालचंद्र देव आणि सौ. चारुशीला गोसावी यांनी जुगलबंदीच्या स्वरुपात राग जनसंमोहिनी सादर करुन रसिकांना आपल्या वादनाने संमोहित केले, असे म्हटले तर ती अतिशयोक्ति होणार नाही.


पुन्हा एकदा मंचावर येऊन प्रथम पिलू रागातली धून आणि नंतर भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हे कानडी भजन आणि  जयोस्तुते उषा देवते ही वेगळ्या शैलीतले गीत हळूवार हातांतल्या नजाकतीने व्हायोलीनच्या सूरावटीतून निलिमा राडकर यांनी पेश केले.

यावेळी शास्त्रीय संगीताच्या जोडीला नव्हे तर त्यापेक्षा अधिक संख्येने भजन, नाट्यगीत आणि भावगीतांना या कार्यक्रमात स्थान लाभले.

लावली थंड उटी हे नाट्यपद, हे सुरांनो चंद्र व्हा हे भावगीत आणि तीर्थ विठ्ठल हा अभंग अशा तीन रुपात चारुशीला गोसावी यांनी आपल्या बहारदार वादनातून रसिकांना मोहवून टाकले.पं. देव यांनीही ऋणानुबंधाच्या, काटा रुते कुणाला आणि  निजरूप दाखवा हो हा अभंग सादर करुन स्वरबहारने आयोजिलेल्या मैफलीत रसिकांची वाहवा मिळविली.


सा-या कार्यक्रमाचे निवेदन राजय गोसावी यांनी केले तर तबल्याची साथ लाभली ती रविराज गोसावी या बुध्दीनिष्ठ कलावंताची..


पं. गजाननबुवा जोशी हे नाव शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात झळकले ते तेजःपुंज ता-या प्रमाणे.. त्यांचे शिष्यही हा वसा आपल्या परिने पेलण्याचा प्रयत्न करत त्यांचे नावही पुढच्या पिढापर्यंत नेताहेत हेच विशेष...सुभाष इनामदार, पुणे
 subhashinamdar@gmail.com
9552596276Thursday, March 7, 2013

तिने सोसले बहुत..


माझ्या डोळ्य़ासमोर आत्ता चित्रपट पहावा असा प्रसंग समोर घडतोय...
सकाळपासून सर्वांच्या आधी ऊठून घरसारवण्यापासून ..पाणी बोहरुन आणण्यापर्य़ंत सारी कामे बिनबोभाट चालायची..मुखी यायचे केवळ देवाचे नाम ययवेगवेगळ्या स्तोत्रातून..कधी ंयकटेश. तर कधी हनुमानाचे....
तोंडात राम आणि
कामात हात
आपल्याला या घरी दिल्याच्या कधी तरी तिली पश्चाताप व्हायचा.. मिळवायच्या नावाने बोंब..किती गोष्टी घालविल्या याची यादीच नाही...किती होते..

सोने-चांदी.पण ते सारे गेले ..
आता अगदी लंकेची पार्वती झाले

पण तो शब्द पुन्हा उगाळत नसे..पुढे काम सुरु..

वर्षाकाठी दोन लुगडी...बस्स

बाकी मागणी अशी नाहीच..
सारे झटायचे ते मुलांसाठी .घरासाठी...
अखेरपर्यंत...सोसले...घालविली संपत्ती..ती हताशपणे पहात आली...पण हालाखीतही माऊलीने माणसं राखली..स्वतःचा स्वाभिमान परकोटीने जपला...लोकांच्या घरी काबाडकष्ट केले..त्यांच्याकडचे शिळे पदराखाली घेऊन आम्हाला खाऊ घातले...

आज आठवले तरी डोळ्य़ात पाणी साठते..
पण त्याही काळातला आनंद माझ्या नजरेत कधीच कमी झाला नाही..
उलट त्या दिवसांनी मला संस्कारित केले...समाजाकडे पाहम्याची दृटी दिली....

आज सारे काही आहे..पण आई नाही....तिची आठवण या शब्दातून काढतो...
जागतिक महिला दिनाच्या दिवशी पुन्हा हेच स्मरण...त्या माऊलीच्या पोटी भरल्यापोटी..जन्म घतली..ही साठा उत्तराची कहाणी....आता कथा बनू पहात आहे..


स्मरते उरी सारे
तुझी आठवण भारी


खरच. स्पर्शातली जादू कुणाजवळ असेल ?
उत्तर एकच... आई !
ममता,माया आणि खरा आपलेपणा
ओलाव्याचा तो स्पर्श
अनेक समस्यांवरचा तो एकच उपाय
आईचा मायेचा स्पर्श !
आईशी भांडलो.. अबोला धरला
पोट बरोबर नव्हते तेव्हा आईने पोट चोळण्यासाठी हात फिरवला
आणि काय आश्‍चर्य इतके छान वाटले की बरे वाटायला लागले.
वय झाले .आकाराने वाढलो.
नोकरीत पद मिळाले
तरी आईच्या त्या हातातील जादूई स्पर्शाने ती किमया घडविली.

लहान होतो पण वजनही भरपूर होते.
सतत कुठेतरी पडायचो.
हाताला,पायाला जखम व्हायची.
एकदा तर रोज दवाखान्यात न्यावे लागायचे.
आईच्या कमरेवर स्वार होउन पट्टी करायसाठी जावे लागायचे.
त्या आठवणी आजही ताज्या होतात.आजही तीची आठवण होते
मन जाते भूतकाळात,रमतो मी स्पर्शात.
आईच्या त्या आठवतातून काळ उमटतो.
गरीबी दिसते पण टोचत नाही.
मिलोची भाकरी आणि पातळ आमटीत निवडून घ्यावेत अशीच डाळ असायची
पण त्या भाकरी-आमटीची चव कशालाच येणार नाही.
हे घडते त्याची किमयागार म्हणजे आई.
त्या मातेला वंदन,
तीच्या आठवांची सोबत आणि तीच्या स्पर्शाची महती
सारेच आनंददायी आणि अगणतीत असेच.
आई,आज नाही.पण मनात ..घराघराच्या चराचरात भरून राहिली आहे.
माते तुझ्या कुशीत मी धन्य झालो.
-सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
Sunday, March 3, 2013

दिनकराची साक्ष

दिनकराला साक्षी ठेऊन सारे काही घडत आहे
आजचे अधुरे उद्यातरी पुरे होणार आहे..
किती विवंचना..त्या वंचाना त्या किती रे केल्य़ा
आश्वासूनी शब्दांनी कितीक त्या विरुनही गेल्य़ा

जो भार डोईवरी टाकला तु रे
जडभार होई..अवजड भासे
एकला असे मी थकलो कारे
भुईभार होतसे कारे..

जातो निघुनी आता सत्वर
दावीत येतो तुला अंतर
घरट्यामधल्या त्या किरणांना
वेचित गेलो तरीही उरलो

संचित मनीचे आहे
किचिंत सांघतो आहे
दिवसामागूनी दिस चालला
धावतो मग तिथेच थांबला.....

-सुभाष इनामदार,पुणे