Friday, May 24, 2013

देवल क्लबच्या मंचावर गाणार....व्हायोलीन

चारुशीला गोसावी यांचं....


पुण्याच्या नावारुपाला आलेल्या एक व्हायोलीनवादिका सौ. चारुशीला गोसावी...यांनी साधारणपणे वर्षापूर्वी आपल्या स्वतंत्र कार्यक्रमाला सुरवात केली. सतंत्र स्वतःचे सोलो वादनाचे कार्यक्रम त्यांनी यापूर्वी खूप केलेत. सुमारे ३००० विविधरंगी गाण्यांच्या कार्यक्रमाला साथही केली आहे.. पण शेवटी स्वतःचा ठसा ..आणि वाद्यावरची आपली तयारी रसिकांच्या  पसंतीस उरतावी यासाठी संच तयार केला ..आजकालच्या प्रसिध्दीच्या जंजाळात त्यांच्या इतर वादनाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही..तरीही त्यांनी व्हायोलीन गाते तेव्हा..चा कार्यक्रम सुरुच ठेवला. यात हिदी मराठी विविधढंगी गाणी त्या व्हायलीनवर सादर करतात.

रविवारी २६ मे २०१३ ला कोल्हापूरला याचा सहावा प्रयोग सादर होत आहे.



१२ फेब्रुवारी २०१२ ला पुण्यात हेमलकसातल्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याला मदतीसाठी पहिला प्रयोग सादर केला..सांस्कृतिक पुणे या सुभाष इनामदार यांच्यामार्फत व्हायोलीन गाते तेव्हा..ला भरघोस दाद मिळाली.. त्यातून जमा झालेली रक्कम सुमारे ७० हजार रुपये आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करणा-या आमटे कुटंबियांच्या कार्याला देऊन झाले.

कलेसाठी कला हे जरी खरे असले तरी आपल्या कलेची पावती या ना त्या परीने मिळावी अशी सर्वच कलावंतांची सुप्त इच्छा असते.

व्हायालीन गाते तेव्हा..य़ा कार्यक्रमात
चांदणे शिंपीत जा`, `अशी पाखरे येती`..नंतर बरसलेले `श्रावणात घननीळा`ने वन्समोअरची दाद मिळते `काहो धरीला मजवरी राग` सारखी बैठकीची लावणीही रंगत जाते. `जांभुळ पिकल्या झाडाखाली` या जैत रे जैत सारख्या अवघड शब्दांना लिलया व्हायोलीनवर झुलवकत गोसावी ते रंगवत जातात...तेव्हा श्रोते त्यांच्या वादनातल्या कौशल्याने भारावून जावून दाद देतात.  `बोलो रे पपी`, `बैय्या ना धरो.`.`बाबुजी धीरे चलना` गाण्यांवर  ठेका धरायला रसिक उत्सुक असतो...त्या सुरांवटींच्या हिंदोळ्यावर असेच तरंगत रहावे असेही वाटू लागते.
पं. भीमसेन जोशी ( माझे माहेर पंढरी) या भारतरत्नांच्या तोंडून गायल्या अभंगाला पेलण्याची ताकद गोसावी यांच्या वादनातून प्रकटपणे दिसते.
शेवची एवढेच म्हणावेसे वाटते..



व्हायोनीन गाते तेव्हा...
टाळ्यातून प्रतिसाद उमटतो ..
लोक डोलू लागतात..
भारावलेल्या मनातून सहजपणे दाद येते..
कलावंताचे कौतूक होते..
शब्दांचे सूर बनून ते बोलू लागतात.
ताल आणि लयींचा एकजीव होतो..
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...




सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, May 23, 2013

विविध पैलू असलेली कला आणि कल्पकता


 एकमेव नाव म्हणजे कृष्णदेव मुळगुंद...


कृष्णदेव मुळगुंद सरांची जन्मशताब्दी २७ मे पासून सुरू होत आहे. यानिमित्तानं त्यांच्याविषयीच्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 



मनात असते सदैव त्यांच्या

कलागुणांची आस

विकास होतो सहजी त्यांचा

प्रयत्न करिता खास


कृष्णदेव मुळगुंद सरांच्या ड्रॉइंगच्या तासाला त्यांनीच फळ्यावर लिहिलेल्या या ओळी तीन वर्षं मी रोज वाचत असे. रोज वाचून त्या पाठही झाल्या होत्या; पण आता इतक्‍या वर्षांनंतर त्यांचं आकलन होत आहे. त्या वेळी त्या शब्दांचा अर्थ समजला होता; पण त्यामागची मेहनत, ध्यास, झपाटलेपणा आता कुठं लक्षात येत आहे. सरांच्या आयुष्यात ते एक झपाटलेपण होतं! मी या व्यवसायात 35-40 वर्षं काढल्यावर सरांचं ते झपाटलेपण आज मला कळतंय...!

मी सरांच्या सान्निध्यात आले ती शाळेमध्ये. साधारणतः सातवी-आठवीत असताना आमचाच एक वर्ग असा होता, की ज्याला गायन, वादन आणि चित्रकला यांपैकी एक विषय निवडायची मुभा होती. मी चित्रकला या विषयाची निवड केली. तिथं ते आमचे ड्रॉइंगचे शिक्षक होते. माझ्याकडं नृत्याचं अंग आहे, हे सरांना ठाऊक असल्यामुळं त्यांनी मला, "बालनाट्यात काम करशील का?' असं विचारलं. "मंतरलेले पाणी' या नाटकात मला तीन नृत्यं होती आणि भूमिका होती राजकन्येच्या मैत्रिणीची - झुलारीची. या नाटकात ससे, कबूतरं असे खरेखुरे प्राणी-पक्षी स्टेजवर असायचे. त्यांच्याशी खेळताना, त्यांना हातात घेताना खूप छान वाटायचं. प्रेक्षकांनाही त्यांचं भारी अप्रूप असे. या नाटकाच्या तिसऱ्या अंकातला एक प्रसंग अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. तो एक ड्रीम सिक्वेन्स होता. त्यात ढग, तारे, नानाविध माळा, पऱ्या आणि बरंच काही होतं. अशा कल्पकतेनं केलेल्या सजावटीमुळे संपूर्ण स्टेज जणू स्वर्ग असल्यासारखंच दिसत असे आणि प्रेक्षागृहातून तर "अय्या।।' "कित्ती मस्तंय...' "व्वा...' "ही।।' "आ।।।' अशा प्रतिक्रिया आम्हाला स्टेजवर ऐकू येत असत. खासकरून मुलांसाठी तर ती एक मोठी पर्वणीच होती. त्यानंतर "जादूनगरीतील राजकन्या' या नाटकात माझी भूमिका नव्हती; पण मी नृत्यात सहभागी होते. अशा प्रकारे नाटकात माझं मन रमलं. "जंगलातला वेताळ', "असा मी काय गुन्हा केला?' अशी काही नाटकंही केली. राजन मोहाडीकर, दीपक माहुलीकर, दिलीप जोगळेकर, मोहन जोशी, शिंदगीकर, लक्ष्मण मंकणी, मनोहर यादव, उदयसिंह पाटील, सुधीर साने...आणि बरीच मुलं... आमचा छान ग्रुप जमला होता.

आपल्या विद्यार्थिदशेत आई-वडील आणि आपले शिक्षक हेच आपल्या सर्वांत जास्त जवळ असतात. माझ्या आई-वडिलांसोबतच मुळगुंद सर आणि बाई हे माझे दुसरे आई-वडील झाले होते. सर माझ्या घरापासून अगदीच जवळ राहायचे; त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा तालमींसाठी सरांच्या घरी नियमितपणे जाणं-येणं सुरू झालं. बाईंबरोबर स्वयंपाकघरातही लुडबुड सुरू झाली. सरांचं घर हे माझ्यासाठी जणू दुसरं घर होतं. आता या सगळ्याचं खूप नवल वाटतं... सरांचा संसार तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नटला होता. वाड्यात शिरल्या शिरल्या गेटच्या उजवीकडं बैठकीची एक खोली. पुढं गेल्यावर वाड्यात स्वयंपाकघर आणि वाड्यात अंगणाच्या डावीकडं जिन्यावरून पहिल्या मजल्यावरती अभ्यासाची खोली. ती खोली म्हणजे "अलिबाबाची गुहा'च होती. इथं सरांचा हरहुन्नरी स्वभाव जवळून पाहायला मिळाला.



सरांचं अक्षर तर सुंदर होतंच, तसंच त्यांचं लेखनही. त्यामुळं नाटकाचं संपूर्ण स्क्रिप्ट पाठ व्हायचं. सरळ, सोपी तोंडात बसणारी भाषा. इतकंच नाही तर नाटकाचे सर्व दागिने, अगदी मुकुट, गळ्यातले हार, मनगट्या, कंबरपट्टे सर्व सरांनीच हातानं बनवलेलं असायचं आणि त्याला सामग्री काय, तर पुठ्ठे, बेगड, तऱ्हेतऱ्हेची पदकं, ब्रश, सोडावॉटरचे बिल्ले...! पण तो "दागिना' तयार झाला, की इतका मस्त दिसायचा! जणू खराखुराच आहे की काय, असं वाटे. एकीकडं शिक्षक, चित्रकला, नाट्यलेखन, नृत्य, नृत्याचं गीतलेखन, वेशभूषा अशी विविध पैलू असलेली कला आणि कल्पकता सरांनंतर कुणामध्येच एकत्रितरीत्या पाहायला मिळाली नाही.

खरं तर सर मूळचे चित्रकार आणि नर्तक. ते नृत्य बसवायचे आणि आमची शाळा "फोक डान्स कॉम्पिटिशन'मध्ये नेहमी पहिली यायची. सरांनी मणिपुरी, नागा, सिलोनी, रशियन, कोळीनृत्य, कातकरी, भिल्लनृत्य अशा साधारणतः 30 लोकनृत्यांचं काव्यलेखन, त्यांची वेशभूषा आणि दिग्दर्शनही केलं होतं. त्यातल्या काही गीतांना राम कदम, दादा चांदेकर, मनोहर केतकर यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी चाली बांधल्या होत्या. पुण्यात मुलींच्या भावे स्कूलमध्ये (म्हणजे आत्ताची रेणुका स्वरूप शाळा) प्रवेश करण्यापूर्वी मी सरांची लोकनृत्यं पाहिली होती. त्यामुळं हायस्कूलमध्ये येताना माझ्या मनात त्याचं मोठं आकर्षण होतं. पण मी ज्या वर्षी पाचवीत गेले, त्याच वर्षी आमच्या शाळेनं स्पर्धेत भाग घेणं बंद केलं. त्यामुळे माझा विरस झाला होता; पण सुदैवानं नाटकात काम करायची संधी मिळाली आणि मला वेगळी दिशा मिळाली. मी शाळेच्या शेवटच्या वर्षात पोचले. त्यानंतर मॅट्रिक, कॉलेजमध्ये सायन्स शाखा, एनसीसी. त्यामुळे वेळ कमी मिळायला लागला. पुढं मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात गेले. पुण्याला येणं कमी झालं आणि सरांकडं जाणंही कमीच झालं. सरांचे सगळे विद्यार्थी पुढं गेले. आपापली वाटचाल करू लागले; परंतु "सर कुठं असतील? काय करत असतील?' याचा विचार माझ्या मनात यायचा. मात्र, माझ्या कामाच्या वाढत्या व्यापामुळं, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळं मनात असतानाही सरांशी पुढं तितका संपर्क राहिला नाही. आता सर नसताना मात्र त्याची जास्तच जाणीव होत आहे आणि सरांशी पुढं आपला संपर्क तेवढा राहिला नाही याचा सल राहून राहून मनाला बोचत आहे; पण बालपणात जे आपल्याला मिळतं, ते आयुष्यभर पुरतं. बालपणात माझ्या मनावर जे चांगले संस्कार झाले, त्यात मुळगुंद सरांचा वाटा मोलाचा आहे.

सरांनी "घाशीराम कोतवाल', "जाणता राजा' या नाटकांसाठी नृत्यदिग्दर्शन केल्याचं कळलं होतं, तेव्हा मला खूप बरं वाटलं. त्यांना त्यांच्या आवडीचं काम करायला मिळालं; पण ते प्रसिद्धिपराङ्‌मुखच राहिले. सरांनी जी नृत्यं बसवली त्या नृत्यांचं किंवा त्या स्टेप्सचं कुणीच कुठंही डॉक्‍युमेंटेशन केलं नाही. त्यामुळं पुढच्या पिढ्यांचं बरंच नुकसान झालं, असं मला वाटतं. मात्र, त्यांचा नातू कवी-गीतकार वलय मुळगुंद हा आजोबांचं भरीवकार्य समाजापुढं आणत आहे, नव्या पिढीपर्यंत पोचवत आहे. 



-रोहिणी हट्टंगडी, मुंबई
( `सकाळ, सप्ततरंग`  च्या सौजन्याने)

 

Wednesday, May 22, 2013

मनोरंजनाच्या दालनात दिमाखदारपणे मिरविणार.. खो खो



सिध्दार्थ जाधवसह अनेक पूर्वज च्या आपल्या जुन्या वाड्यात रहायचे..त्या वाड्यात त्यांचा वंशज असलेला श्रीरंग देशमुख रहायला येतो..आणि एकेक पीढीचे एकेक पूर्वज आपला खेळ खेळू लागतात...
 लोच्या झाला रे... या नाटकावर आधारीत हा सिनेमा काही विलक्षण दृष्य़े..पारंपारिक पिढी बरोबर चालत आलेले लोकसंगीत आणि त्याला लाभलेला अभिनयासह नृत्याचा थाट...



केदार शिंदे यांच्या तीन वर्षाच्या खंडानंतर एक जंगी मराठी सिनेमाचा खेळ ते घेऊन येताहेत...खो खो...





हा सिनेमा हा पूर्वसुरींच्या साम्राज्यात जावून काही त्या त्या पिढ्यांचा घटना आणि प्रसंग  वेगवेगळ्या सिनेमॅटिक पध्दतीने यात दिसतात.. सारी खास दृष्ये तुमची नजर आणि मन प्रसन्न करतील..


 या महिन्याच्या ३१ तारखेला हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट वेगळीच गंमत मराठी प्रेक्षकांना या चित्रपटातून दाखविणार आहे. त्यांना प्रेक्षक आपला हा चित्रपट मनोरंजनाचा नवा खजाना म्हणून नक्कीच अनुभवतील याची खात्री वाटते.  पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खास या चित्रपटाच्या प्रसिध्दी साठी उषा उत्थप यांनी तयार केलेले गीत ऐकविले..निर्मात्या शोभना देसाई यांनीही केदारच्या नेतृत्वाखालील ही टीम यांनी खो खो तून तयार केलेली कलाकृती मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा आशावाद व्यक्त केला.
सिध्दार्थ जाधव यांनी एकही संवाद नसलेली भूमिका करताना केदारच्या दिग्दर्शनातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगितले.. माझ्या थोरल्या भावासारखा असलेला  भरत जाधव मोठा कलाकार तर आहेच पण आपल्या इतर सहका-यांनीही प्रत्यक्ष चित्रिकरणात पंचेस सांगून प्रसंग खुलवितो.हे ही स्पष्टपणे सांगितले.

विजय चव्हाण यांची भूमिका काही प्रसंगातून नक्कीच प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आणेल इतकी उत्तम सादर केल्याचे प्रशस्तीपत्रक भरत जाधव यांनी दिले. त्याच्या मते केदारच्या गोष्टीत गंमत असते. त्यात तो परिपूर्ण असतो. गोष्ट स्वतःची असल्याने त्यात अनेकविध गोष्टीची भर सहजपणे पडते...आणि सर्वात महत्वाचे म्हणचे त्याच्या चित्रपटात काम करणे म्हणजे  उत्साहाला अधिक वेगळा आकार मिळतो..




सुवासिनी या मिलिकेत दिसलेली पुण्याची प्राजक्ता माळी हिचेही या चित्रपटाद्वारे पहिले पदार्पण आहे.तिच्या मते...केवळ चांगले दिसणे..छान कपडे घालून मिरविणे नाही..यात अभिनयाला भरपूर जागा आहे..केदार शिंदे यांनी अनेक प्रसंगी `वाह क्या बात है` असे स्पष्टपणे सांगावे उत्तमपणे सादर केले आहेत. माझ्याबरोबर सारीच मोठी कलावंत मंडळी यात असूनही त्यात माझा नवखेपणा  कधीच निघून गेला..मला खूप आवडले या चित्रपटात काम करायला.. प्राजळपणे प्राजक्ता बोलत होत्या..



भन्नाट कथानक...उत्तमोत्तम तांत्रिकता ..ओठांवर रेंगाळावीत अशी गाणी..आणि सुरेश देशमाने यांचे छायाचित्रण..शशांक पोवार यांचे संगीत आणि चेतन देशमुख यांचे स्पेशल इफेक्ट...सारेच खो खो या चित्रपटाला मनोरंजनाच्या दालनात दिमाखदारपणे मिरविणारेच आहे..


पाहू या ३१ मे ला प्रत्यक्ष चित्रपटगृहात...




-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276







Tuesday, May 21, 2013

विनया देसाई-फुलं गोवणारा धागा



सौ. विनया देसाई..



गेली २५ वर्षे त्या शब्दांचे पूल बांधतात..त्यावरुन रसिक आणि गायक, वादक, साहित्यिक सहजपणे कार्यक्रमाला सामोरा जातो. ही शब्दांची किमया अभ्यासपूर्ण रित्या त्यांनी जोपासली..आणि आपल्य़ाच सोप्या, साध्या आणि सात्वीक शैलीत त्यांनी आकार दिला...


तसे प्रत्येक क्षेत्र तुमची परिक्षा घेणारे..तरीही हे अधिक ..चोखंदळ आणि संवेदनाशील..
इथे काही काळ तुमची स्त्वपरिक्षा असते...ती रसिकांसमोर..ती जिंकलात तर टाळ्या..निराश केले तर मात्र तिटकारा...
भाषेकडे लक्ष. संर्दभाची जाण.. मागच्या गीताची गेलेली आठवण साठवत पुढील दृष्यात्मक  भागाकडे आकर्षीले जाईल असे..भाष्य....त्यात प्रत्येकाची नावे यथायोग्य सांगायची जबाबदारी...



एकूणच निवेदक वा सूत्रसंचालकांचा दबावही असतो आणि दाबही..








एका लेखात त्या लिहितात...
समोरच्या रसिक प्रेक्षकांना आनंद देण्याचा हा सोहळा मी अनेकदा अनुभवलाय. सरीवर सरी बरसल्या अशा गाण्यांची  मैफल असो किंवा मोगरीच्या फुलांप्रमाणे उमललेली ताजी टवटवीत जुनी भावगीतं असो..त्यात निवेदनाने रंग भरला. फुलं ओवायला धागा हवा तसं गाण्यांची फुलं गोवणारा धागा झाले. ...



सूत्रसंचालनातला आनंद तर शब्दात न मावणारा. प्रमुख पाहुणे, अध्यक्ष या नात्यानी किती दिग्गज भेटले..याची गणतीच नाही..







एकूणच या क्षेत्रात कोट्यावधी हशें आणि तेवढ्याच कानात साठवाव्यात एवढ्या टाळ्या मिळविले..ते काम स्वतःसाठी नाही ते त्या सादरकर्त्य़ा कलावंतांसाठी..साथीदारांसाटी..साहित्यिकांसाठी..

मूक-बधीर अशा मुलांच्या ज्ञातात विज्ञान रुजविण्याची कामगिरी..बीएससी नंतर निवडली..याही क्षेत्रात शब्दावीना संवाद करायची जादू उमटवली .त्या क्षेत्रातली त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

केवळ शब्दांनी कार्यक्रमाची बहारदारता वाढविली असे नाही..तर साहित्य वाचता वाचता स्वतःही साहित्यिक बनल्या...त्यांच्या नावावर आठ पुस्तकांच्या नोंदी आहेत. तशा मितभाषी असल्या तरी मनातून सतत बोलत असतात..घर-संसार-शाळा आणि उरलेल्या वेळात निवेदनाची जबाबदारी पेलताना घरच्यांचं तेवढेच मोलाचं पाठबळ उभे आहे...त्या सा-यांना याचा अभिमान आहे...आम्हालाही आहे..



हे सारे करताना स्वतःमधला कलावंत जागविला.. अनुभवांचे संचित ``आनंदयात्री` या एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने त्यांनाच अर्पण केले.. आज त्याचेही चारशेच्यावर कार्यक्रम झालेत.
२२ मे २०१३ ला संध्याकाळी त्यांच्या या कर्तृत्वाचा जागर होणार आहे... देताना जे दिले..त्यातले कांही अनेकांच्या उपस्थितीत पुढे दिसणार आहे...
आज आपण सारे या निवेदन क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलेला सलाम करुया...हिच उमेद..हेच संचित घेऊन..अखेरपर्य़ंत आयुष्याच्या मैफलीत अनेक धागे गुंतवित..त्यातला एक धागा आपणही आळवूया...




जमविलेले सारे
आज डोळ्यासमोर दिसते आहे
घडलेल्या सा-या क्षणांचे
चित्र स्पष्ट उमटले आहे
संवादाने साधलेली किमया
आज पुढे ठाकली आहे
विनयाने..अभिमानाने
वाटचाल तर पुढेच करायची आहे..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
95525926726