Monday, May 27, 2013

कोल्हापूरात रसिक डोलू लागतात..

व्हायोलीन गाते..तेव्हा..


कोल्हापूर- आयपीएलची अंतीम फेरी असुनही काल कोल्हापूरातील संगीत रसिक चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलीनवरची  किमया पहायला आवर्जुन हजर होते...आणि दादही अशी दिली..की क्या बात है...
क-हाडे ब्राह्मण संघ या कोल्हापूरच्या रौप्यमहोत्सवा निमित्ताने ही खास मैफल देवल गायन समाजच्या सभागृहात दोन तास रंगत गेली...रविळवारी २६ मे २०१३ ला कोल्हापूरला याचा सहावा प्रयोग सादर झाला.

कोल्हापूरच्या पुढारीने म्हटले ..थेट काळजाला भिडणा-या व्हायोलीनच्या सुरांनी गीतांमध्ये गुंफून  पुण्यातल्या   व्हायोलीनवादक चारुशीला गोसावी यांनी रसिकांना ऐन ऊन्हाळ्यात सुरांच्या मैफलीत चिंब होण्याचा  आनंद दिला.

त्यांच्या कार्यक्रमाचा आरंभ श्री रागाच्या वादनाने झाला. नंतर लाकप्रिय मराठी- हिंदी गीतांनी रसिकांना आवडतील अशा  एकाहून एक सरस गीतांच्या सूरांवटींनी रसिकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.


संपूर्ण कार्यक्रमाने निवेदन पुण्याचे आनंद देशमुख यांनी केले..त्यानी सूरामागच्या शब्दांतून भावनांची आंदोलने कशी आहेत याची सूत्रबध्द मांडणी करत कार्यक्रमात अधिक रंगतता आणली.
चारुशीला गोसावी यांना तबला आणि ढोलकीची सुरेल साथ केली त्यांचे चिरंजीव रविराज गोसावी यांनी. सिंथेसायझरवर इतर वाद्यमेळ आळविला तो अमृता दिवेकर यांनी..तालवाद्याची नाजूकता जपली ती राजेंद्र साळुंके आणि मधुरा गोसावी यांनी.


पुण्याच्या नावारुपाला आलेल्या एक व्हायोलीनवादिका सौ. चारुशीला गोसावी...यांनी साधारणपणे वर्षापूर्वी आपल्या स्वतंत्र कार्यक्रमाला सुरवात केली. सतंत्र स्वतःचे सोलो वादनाचे कार्यक्रम त्यांनी यापूर्वी खूप केलेत. सुमारे ३००० विविधरंगी गाण्यांच्या कार्यक्रमाला साथही केली आहे.. पण शेवटी स्वतःचा ठसा ..आणि वाद्यावरची आपली तयारी रसिकांच्या  पसंतीस उरतावी यासाठी संच तयार केला ..आजकालच्या प्रसिध्दीच्या जंजाळात त्यांच्या इतर वादनाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही..तरीही त्यांनी व्हायोलीन गाते तेव्हा..चा कार्यक्रम सुरुच ठेवला. यात हिदी मराठी विविधढंगी गाणी त्या व्हायलीनवर सादर करतात.

क-हाडे ब्राह्मण संघाचे पदाधीकारी आणि देवल गायन समाजचे खास रसिक या प्रयोगाला मुद्दाम उपस्थित होते.

१२ फेब्रुवारी २०१२ ला पुण्यात हेमलकसातल्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याला मदतीसाठी पहिला प्रयोग सादर केला..सांस्कृतिक पुणे या सुभाष इनामदार यांच्यामार्फत व्हायोलीन गाते तेव्हा..ला भरघोस दाद मिळाली.. त्यातून जमा झालेली रक्कम सुमारे ७० हजार रुपये आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करणा-या आमटे कुटंबियांच्या कार्याला देऊन झाले.

कलेसाठी कला हे जरी खरे असले तरी आपल्या कलेची पावती या ना त्या परीने मिळावी अशी सर्वच कलावंतांची सुप्त इच्छा असते.

व्हायालीन गाते तेव्हा..य़ा कार्यक्रमात
  जीवलगा कधीरे येशील तू`,अशी पाखरे येती`..नंतर बरसलेले `श्रावणात घननीळा`ने वन्समोअरची दाद मिळते `काहो धरीला मजवरी राग` सारखी बैठकीची लावणीही रंगत जाते. `जांभुळ पिकल्या झाडाखाली` या जैत रे जैत सारख्या अवघड शब्दांना लिलया व्हायोलीनवर झुलवकत गोसावी ते रंगवत जातात...तेव्हा श्रोते त्यांच्या वादनातल्या कौशल्याने भारावून जावून दाद देतात.  , `बैय्या ना धरो.`.`बाबुजी धीरे चलना` गाण्यांवर  ठेका धरायला रसिक उत्सुक होते....त्या सुरांवटींच्या हिंदोळ्यावर असेच तरंगत रहावे असेही वाटू लागावे इतकी ती उत्तम रसिकांनी कौतुकाने दाद दिली.
 


कार्यक्रमाची अखेर जरी लागा चुनरीमे दाग ह्या गीताने झाली..तरीही प्रेक्षकांच्या आग्रहाखातर चारुशीला गोसावी यांचे गुरु  आणि वडील पं. भालचंद्र देव यांच्या भैरवीने झाली..तोही एक अनोखा मोळ होता...तेच सूर साठवत कोल्हापूरकर रसिक फुन्हा एकदा हा कार्यक्रम ठेवा आम्ीह नक्की येऊ असे आश्वासन देत एकामागून एक आपापल्या दिशेने निघून गेले..


व्हायोनीन गाते तेव्हा...
टाळ्यातून प्रतिसाद उमटतो ..
लोक डोलू लागतात..
भारावलेल्या मनातून सहजपणे दाद येते..
कलावंताचे कौतूक होते..
शब्दांचे सूर बनून ते बोलू लागतात.
ताल आणि लयींचा एकजीव होतो..
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...






सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276