Thursday, December 25, 2014

प्रभातचा पडदा काळाआड गेला...हळहळले पुणे
आजच्या सा-याच वृत्तपत्रात  प्रभात..चित्रपटगृहाचा अखेरचा पडदा पडला..असे ठळकपणे प्रसिध्द झाले..आणि पुण्याच्या सास्कृतील क्षेत्रातले हे महत्वाचे केंद्रही नामशेष होणार याची खात्री पटली..आज यावर कितीही तोडगे दिसत असले तरी प्रभात ची परंपरा खंडीत झाली हा वस्तुस्थिती मानय करावी लागले.
आप्पा बळवंत चौक म्हटले की प्रभात..हे समिकरण होऊन बसले होते..मराठी चित्रपटसॉष्टीचा इतिहास रचणारी चित्रपट कंपनी प्रभात आणि एकेकाळी महाराष्ट्रातील यच्चयावत निर्माते प्रभातमध्ये आपला चित्रपट प्रथम प्रदर्शित व्हावा यासाठी धडपजत असत.
आज तो रुपेरी पडदा काळाने हिरावून घेतला आहे..
एखाद्या माणसासारखे या प्रभातचे अस्तित्व हेच मोलाचे होते..आजही हमखास मराठी चित्रपटांना इथे अग्रक्रम होता..इथे रौप्यमहोस्तव केलेले अनेक चित्रपट आपले भागय् घेऊन आले होते..आज काही प्रमाणात अनेक माध्यमातून चित्रपट घरोघर पाहिले जातात..तेव्हा थिएटरकडे ओढा कमी झाला आसला तरी..पूर्वा थिएटर हा एकच पर्य़ाय होता...

सारे दिग्गज निर्माते आपला चित्रपट या रुपेरी पडद्यावर दिसावा यासाठी आग्रही असत...आज जसे मुंबईत आणि एकाचे वेळी सा-या महाराष्ट्रात चित्रपट एकाचवेळी दिसतात.तेस तेव्हा नव्हते..
केवळ महाराष्ट्रातील पुण्या आमि तेही प्रभातमध्ये चित्रपट झळकत होते..
आता हे सारे इतिहास जमा झाले...आता उरल्या केवळ आठवणी..
किती कलावंतांना प्रभात आपले माहेरघर वाटायचे..आता माहेरपण संपले..आता उरली आहगे  ती केवळ वास्तु..त्यातल्या स्मृती आणि आठवणीत रहाती तिथे अनुभवलेले प्रसंग...


प्रभात थिएटर यापुढे डोळ्यांना दिसणार का, मराठी सिनेमे तिथे लागणार का, प्रभातचे काय होणार, असे असंख्य प्रश्न घेऊन रसिकांनी गुरुवारी प्रभातमध्ये पाऊल ठेवले. दामले यांच्या व्यवस्थापनाच्या प्रभातमधील शेवटचा 'शो' पाहण्यापूर्वी अनेकांनी सेल्फी आणि प्रभातच्या छबी टिपत मराठी सिनेमाच्या या पंढरीला सलाम ठोकला. 

प्रभात थिएटरचा दामले कंपनीशी असणारा करार संपल्याने हे थिएटर मूळ मालकांकडे परत जाणार आहे. नव्या वर्षातल्या दहा तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने त्याचा ताबा किबे यांच्याकडे दिला जाणार आहे. 

दोन्हीही सिनेमांचे शो हाऊसफुल नव्हते, पण थिएटरच्या आवारात चर्चा होती ती प्रभात असेच सुरू राहावे, याचीच. अनेकांनी साशंक मनाने प्रभात थिएटरचे, त्यासमोर स्वतःचे फोटो काढून घेण्यात धन्यता मानली. 

Friday, November 7, 2014

रंगशारदेच्या दरबारात गोखले आण्णांची पदे आजही दाद घेतातआजही संगीत नाटकातली पदे ऐकायला रसिक उत्सुक असतात..आणि तेही नाटककार-पत्रकार आणि साहिंत्यिक विद्याधर गोखले यांच्या लेखणीतून साकार झालेल्या बहारदार पंदांची बरसात होत असेल..तर निवारा वृद्दाश्रमाचे पुण्यातले सभागृह गुरुवारी ६ नोव्हेंबर २०१४ ला टाळ्यांच्या आनंदात त्या पदांचे स्वागत करते..वन्समोअरचा गलाकाही करते... आणि त्यातही आपल्या आवडीच्या लेखकांची स्मृती जपताना नव्या-जुन्यांच्या या संगमातून नव्याने काही कलावंत आजही ती पदे शिकतात आणि उत्तमरित्या सादर करताहेत..हा एक नजाराही इथे पहायला मिळाला.

पूर्णब्रम्ह...या किल्लेदारांच्या परिवाराच्यावतीने विद्याधर गोखले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आपल्या २२ व्या वर्षातल्या पदार्पणाचे निमित्ताने नीला किल्लेदार यांनी लोकसत्ताचे माजी संपादक आणि संगीत नाटकातून संस्कृती आणि संस्काराची उत्तम पेरणी करणारे नाटकाकार विद्याधर गोखले यांच्या पदांची निवड केली...गोखले यांच्या कन्यका सौ. सुनंदा दातार यांचा सन्मानाने सत्कार करून ही मैफल रसिली करुन सोडली. स्वतः किलेलेदारांनीही  (पुणेकरांच्या पोटापाण्यासाठी सुग्रास अन्न पुरविले आहे).. सुरगंगा मंगला हे जय जय गौरीशंकर नाटकातले पदही सादर केले.
त्यांच्या अभ्यासू लेखणीच्या स्पर्शाने आपल्या आयुष्यात अनमोल असे क्षण आल्याचे त्यांच्या सर्वच नाटकात भूमिका केलेल्या मधुवंती दांडेकर यांनी आवर्जुन सांगितले..आणि आपली नाट्यपदेही रंगविली..शैली मुकूंद यां अभ्यासू निवेदिकेने त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नसतानाही..
त्यांच्या साहित्याचा नाटकांचा अभ्यास करुन  शैलीदार शब्दातून .गोखले आण्णांचे पैलू उलगडत नेत बहारदार असा पदांना खुमासदार वाणीत गायकांना गाते केले..
स्वतः मधुवंती दांडेकर या तर गोखले यांच्या नाटकातून भूमिकाही करीत होत्या...रविंद्र कुलकर्णी यांनीही त्यांच्या काही नाटकातून भुमिका करुन त्या पदांची ओळख आधीच करुन घेतली आहे..

पण मंगला चितळे यां भजनांचे..भक्तीगीतांचे संस्करण करतात...पण त्यांनीही या वयात गोखलेंच्या नाटकातली काही पदे इतकी सुंरेल आणि ओघवती सादर केली की खरे तर त्यांच्याबद्दल खूप काही सांगावेसे वाटेल..आजही त्यांच्यासारख्या गायकांनीही ती म्हणाविशी वाटतात..आणि पेलता येतात..यातच त्यांचा मोठेपणा सामावलेला आहे..पदातले शब्द आणि नाटय्रदांना आवश्यक असणारी लयदार तानही त्यांनी उत्तमप्रकारे आपल्या गळ्यातून रसिकांसमोर सादर करुन स्वतःबरोबरच त्यांनाही आनंद दिला..

जय जय गोरीशंकर, सुवर्णतुला, मंदारमाला, स्वरसम्राज्ञी, मदनाची मंजीरी अशा लोकप्रिय झालेल्या विद्याधर गोखले यांच्या नाटकांची तसेच वसंत देसाई, छोटा गंधर्व, प. राम मराठे यांच्या संगीताने संपन्न झालेल्या पदांची पुन्हा आठवण नाट्यसंगीत जाणणा-या रसिकांना करुन दिली.  खरं तर काळाच्या ओघात ही संगीत नाटके केवळ होशी संच कधीमधी सादर करतो..काही प्रमाणात. स्वरसम्राज्ञी..शिलेदार सादर करतात..पण बाकी नाटके काळाच्या या गतीमान संगीताच्या युगात विसरुन जाऊ लागली आहेत..अशा कार्यक्रमांमुळे पुन्हा एकदा ही संगीत नाटके ज्यांना किर्लोस्कर..देवल..खाडीलकर..यांच्या परंपरेचे पंख आहेत..ती पाहण्याची उस्तुकता निर्माण होते...मधुवंती दांडकर, रविंदर् कुलकर्णी आणि मंगला चितळे यांनी ती सारी पदे रसरसून गायली...त्यातली सूरभाषा आणि शब्दातले सोंदर्य जसेच्यातसे  नव्हे काकणभर जास्त सुंदर नटविले...ही सारी पदे रसिकांना आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे या कार्यक्रमाला लाभलेले साथीदार,.,. निलिमा राडकर (व्हायोलीन)..माधव मोडक (तबला) आणि संजय गोगटे यांची ऑर्गनवरची साथसंगत..त्यांच्यामुळे पदांना साग्रसंगीत आणि तालसंगत सूर लाभले..


विद्याधर गोखले यांच्यावरच्या नाट्यपदांच्या अशा कार्यक्रमांना इतर शहरातही दाद मिळेल..हाच संच तिथल्या रसिकांनीही आवडेल..याचे पुन्हा पुन्हा कार्यक्रम व्हावेत...आणि गोखले यांच्या नाटकांचे पुनरूज्जीवन होऊन..एखादी सुनिल बर्वे ( ज्याने हार्बेरियमच्या माध्यमातून जुन्या नाटकांचे संदर प्रयोग सादर केले) इथेही पुढे यावा आणि अशा नाटकांची वेळेच्या मर्यादा ओळखून रंगावृत्ती करुन ही नाटके पुन्हा प्रेक्षकांना सुंदर नेपथ्यातून दाखविल  अशी अपेक्षा करतो..


पुन्हा एकदा किल्लेदार परिवारला गोखले यांच्या नाटकातली पदांची रंगत आणि त्यानाटकाल्या उत्तम नाट्यगीतांना रसिकांसमोर आणले याबद्दल मनापासून धन्य़वाद देतो...त्याबद्दल आनंद व्यक्त करतो..आणि इतरत्रही अशीच दाद मिळेल असा विश्वास देतो. -सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, September 21, 2014

आनंदाच्या गावी


आनंदाच्या गावी जावे
आयुष्य सारे वेचून घ्यावे

कणा कणाने रिते व्हावे
देता येईल देत फिरावे

धन संचया न रमावे
मनात सा-या उतरून जावे

कधी कुणाला सल्ला द्यावा
पैशापेक्षा नाती जपावी

होता होईल हसत रहावे
चिंतन आपुले करीत जावे

संस्काराचे बीज पेरावे
धन शब्दातून मांडावे

रिक्त मनाने जनी असावे
चिंता सोडून मस्त जगावे

जगणे सारे मोती व्हावे
शुभ्र चांदण्यासम झिरपावे

तृप्त मनाने वास करावा
आनंदाचा ध्यास घ्यावा


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Friday, September 19, 2014

एक विचार चिंतन..


आता आयुष्याच्या वळणार नवी वाट येत आहे
जी जुन्या स्मृतींना मागे टाकत नवा मार्ग शोधत आहे
रिकामे मन..रिकामा वेळ..रिकाम्या आयुष्याची रिकामी पोकळी भरून काढणार आहे
एका ठिकाणी उभे राहून मागे वळून पहाताना पुढे नवे घडणार याची जाणीव होत आहे

आपण नव्या आयुष्यातल्या नव्या जाणीवांना सामोरे जाणार आहोत
आपल्यातूव उणीवांना जाणून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत
सारे मन शुध्द करण्यासाठी आलेले मळभ दूर केले जाणार आहे
नव्या दिशांना सामोरे जाण्यासाठी वातावरणही पोषक होत जाणार आहे

तुमच्या चष्म्याची फ्रेम नवी करण्यापेक्षा नंबर बदलून पहा
जगाकडे नव्या दृष्टीने पहायला लागा
सारेच तुमच्याकडे पहात आहेत..हे मुळात डोक्यातून काढून टाका
तुमच्याकडे तुम्हीच पहात आहात..कुणाचे फारसे लक्षच नाही

जे मिळाले ते तुमचे होते..
जे मिळणार नव्हते ते तुमचे नव्हतेच
इतरांसाठी तुम्ही केले ते तुमचे कर्चव्य होते
इतरांनी तुमच्यासाठी केले ते ते करणारच होते

आता नवा मार्ग चालण्यात नवी शक्ती मिळवा
जगाकडे पहाण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदला
सूर्य तोच आहे..प्रकाशकिरणही रोजचेच आहेत
तुमच्या जिवनात आज प्रकाशाचे महत्व वेगळे असणार आहे...-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Tuesday, September 16, 2014

नटी..आशा भोसलेंच्या आवाजाची चिरतरुण जादू

पाश्चात्त्य संगीतात रंगलेल्या उडत्या चालीवरील गाण्यांवर भारतीय रसिकांना प्रेम करायला शिकवणारी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या गायकीचे अनेक रंग आजवर संगीतप्रेमींना पहिले आहेत. हिमलयाएवढ्या उंचीची कारकीर्द असलेल्या आशा भोसलेंनी नेहमीच विविध प्रकारची गाणी गायली आहेत. वयाची ८० वर्षे ओलांडलेल्या आशा भोसलेंचा आवाज आजही ऐन तारुण्यात आलेल्या नायिकेला शोभून दिसतो हे त्यांना लाभलेलं शारदामातेच वरदानच आहे. "नटी" या आगामी मराठी सिनेमात आशा भोसलेंच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा मराठी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 

सूर्यातेज प्रोडक्शन च्या बेनरखाली बनलेल्या निर्माते गिरीश भदाणे यांच्या "नटी" या सिनेमातील एका गीताला आशा भोसलेंचा सुमधुर स्वर लाभला आहे. "नटी" मधील "मी नटी…" हे शीर्षक गीत आशा भोसलेंनी आपल्या बहारदार आवाजात गायलं आहे। गीतकार दिपक अंगेवार आणि बाबा चव्हाण यांनी या गीताचे बोल लिहिले असून संगीतकार निखिल महामुनी यांनी हे संगीतबद्ध केल आहे. 

"नटी" हा ६०-७० वर्षांपूर्वीच्या मराठी नायिकेचा प्रवास पडद्यावर रेखाटणारा सिनेमा आहे. आपल करियर घडविण्यासाठी नातीची धडपड, तिची पेशन, तिची तडफ, तिचा अग्रेसिव्हनेस हा "नटी" च्या शीर्षकगीताचा मूळ गाभा आहे.हे सार गाण्याच्या माध्यमातून सदर करण्याची धमक आजही आशा भोसलेंकडे आहे.त्यांच्या आवाजाची रेंज, दम, परफेक्शन हे या  गीतासाठी अगदी अचूक असल्याने अशा भोसलेच या गीताला योग्य न्याय देऊ शकतील यावर संगीत दिग्दर्शकांपासून निर्माता-दिग्दर्शकांपर्यंत सार्याचंच एकमत झाल आणि"नटी" च शीर्षकगीत अशा भोसलेंच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलं. 


आशा भोसालेंसारख्या महान गायिकेसाठी संगीत रचना करण्याची संधी कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळातच लाभल्याने "नटी" चे संगीतकार निखिल महामुनी स्वतःला भाग्यवान मानतात. याबाबत निखिल उत्साहित होऊन सांगतात की, "नटी"च्या शीर्षकगीतासाठी एका दमदार आवाजाची गरज होती. आशाताईंनी आजवर हजारो गीतं गायली आहेत. आज त्या संगीताच्या मागे नव्हे तर संगीत त्यांच्या मागे धावतंय. त्यामुळे त्या आपलं गीत स्वीकारतील की  नाही याबाबत मनात प्रचंड धाकधूक होती, पण स्वतःच्या कामावर विश्वासही होता. आशाताईंना भेटल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितल की, मला जर गाणं, शब्द आणि चाल आवडली तर मी गाईन. मला गाणं आणि चाल पाठवा. त्यानुसार त्यांना गाणं  आणि चाल पाठवली. त्यांनी चार दिवसांनी फोन करायला सांगितलं, पण दोन दिवसांनी त्यांचाच फोन आला. गाणं  कधी रेकॉर्ड करायचंय? असं त्यांनी विचारताच आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळाली. गाण्यातील कंटेंट आणि चाल आवडल्याने त्यांनी गाणं  स्वीकारलं. त्यांच्यासोबत रेकॉर्डिंग करताना धम्माल आली. आपल्याकडचं चांगलं असेल ते दुसर्याला देण्याचा त्यांचा गुण त्यानिमित्ताने जाणवला. आपल्यासाठी एकूणच हा अविस्मरणीय अनुभव होता. प्रेक्षकांच्या मनालाही हे गीत भावेल अशी आशा निखिल महामुनी यांनी व्यक्त केली. 

१९ सप्टेंबर २०१४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार्या "नटी" सिनेमाच्या सदरकर्त्या सौ. नीता सुरेश देवकर असून सिनेमाची संकल्पनाही त्यांचीच आहे. दिग्दर्शनासोबत कथा व संवादलेखनही  दिग्दर्शक योगेश जाधव यांनी केलं आहे. सिनेमाची पटकथा नीता देवकर आणि योगेश जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे. बाबा चव्हाण, दिपक अंगेवार यांच्या व्यतिरिक्त मंदार चोळकर आणि चंद्रकांत गायकवाड यांनीही गीतं लिहिली असून ती आनंद शिंदे, डॉ. नेहा राजपाल, जावेद अली यांनी गायली आहेत. कोल्हापूरमधील लाईटमन प्रताप शिंदे यांची मुलगी सुलक्षणा शिंदे भोवती "नटी"च कथानक गुंफण्यात आलं आहे. ही भूमिका अभिनेत्री तेजा देवकरने साकारली आहे. याखेरीज सुबोध भावे आणि अजिंक्य देव मुख्य भूमिकेत असून किशोर कदम, नागेश भोसले, किशोरी शहाणे-विज, शशांक शेंडे, प्रिय बेर्डे, नेहा जोशी, जगन्नाथ निवंगुने, किशोर चौघुले, दिप्ती भागवत, ऐश्वर्या तूपे आदींच्याही यात भूमिका आहेत. कॅमेरामन सुरेश देशमाने, नृत्य दिग्दर्शन राजेश बिडवे आणि कलादिग्दर्शन संतोष संखद अशी "नटी"ची तांत्रिक टीम आहे.  
पाश्चात्त्या संगीतात रंगलेल्या उडत्या चालीवरील गाण्यांवर भारतीय रसिकांना प्रेम करायला शिकवणारी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या गायकीचे अनेक रंग आजवर संगीतप्रेमींना पहिले आहेत. हिमलयाएवढ्या उंचीची कारकीर्द असलेल्या आशा भोसलेंनी नेहमीच विविध प्रकारची गाणी गायली आहेत. वयाची ८० वर्षे ओलांडलेल्या आशा भोसलेंचा आवाज आजही ऐन तारुण्यात आलेल्या नायिकेला शोभून दिसतो हे त्यांना लाभलेलं शारदामातेच वरदानच आहे. "नटी" या आगामी मराठी सिनेमात आशा भोसलेंच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा मराठी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 

सूर्यातेज प्रोडक्शन च्या बेनरखाली बनलेल्या निर्माते गिरीश भदाणे यांच्या "नटी" या सिनेमातील एका गीताला आशा भोसलेंचा सुमधुर स्वर लाभला आहे. "नटी" मधील "मी नटी…" हे शीर्षक गीत आशा भोसलेंनी आपल्या बहारदार आवाजात गायलं आहे। गीतकार दिपक अंगेवार आणि बाबा चव्हाण यांनी या गीताचे बोल लिहिले असून संगीतकार निखिल महामुनी यांनी हे संगीतबद्ध केल आहे. 

"नटी" हा ६०-७० वर्षांपूर्वीच्या मराठी नायिकेचा प्रवास पडद्यावर रेखाटणारा सिनेमा आहे. आपल करियर घडविण्यासाठी नातीची धडपड, तिची पेशन, तिची तडफ, तिचा अग्रेसिव्हनेस हा "नटी" च्या शीर्षकगीताचा मूळ गाभा आहे.हे सार गाण्याच्या माध्यमातून सदर करण्याची धमक आजही आशा भोसलेंकडे आहे.त्यांच्या आवाजाची रेंज, दम, परफेक्शन हे या  गीतासाठी अगदी अचूक असल्याने अशा भोसलेच या गीताला योग्य न्याय देऊ शकतील यावर संगीत दिग्दर्शकांपासून निर्माता-दिग्दर्शकांपर्यंत सार्याचंच एकमत झाल आणि"नटी" च शीर्षकगीत अशा भोसलेंच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलं.
आशा भोसालेंसारख्या महान गायिकेसाठी संगीत रचना करण्याची संधी कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळातच लाभल्याने "नटी" चे संगीतकार निखिल महामुनी स्वतःला भाग्यवान मानतात. याबाबत निखिल उत्साहित होऊन सांगतात की, "नटी"च्या शीर्षकगीतासाठी एका दमदार आवाजाची गरज होती. आशाताईंनी आजवर हजारो गीतं गायली आहेत. आज त्या संगीताच्या मागे नव्हे तर संगीत त्यांच्या मागे धावतंय. त्यामुळे त्या आपलं गीत स्वीकारतील की  नाही याबाबत मनात प्रचंड धाकधूक होती, पण स्वतःच्या कामावर विश्वासही होता. आशाताईंना भेटल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितल की, मला जर गाणं, शब्द आणि चाल आवडली तर मी गाईन. मला गाणं आणि चाल पाठवा. त्यानुसार त्यांना गाणं  आणि चाल पाठवली. त्यांनी चार दिवसांनी फोन करायला सांगितलं, पण दोन दिवसांनी त्यांचाच फोन आला. गाणं  कधी रेकॉर्ड करायचंय? असं त्यांनी विचारताच आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळाली. गाण्यातील कंटेंट आणि चाल आवडल्याने त्यांनी गाणं  स्वीकारलं. त्यांच्यासोबत रेकॉर्डिंग करताना धम्माल आली. आपल्याकडचं चांगलं असेल ते दुसर्याला देण्याचा त्यांचा गुण त्यानिमित्ताने जाणवला. आपल्यासाठी एकूणच हा अविस्मरणीय अनुभव होता. प्रेक्षकांच्या मनालाही हे गीत भावेल अशी आशा निखिल महामुनी यांनी व्यक्त केली. 

१९ सप्टेंबर २०१४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार्या "नटी" सिनेमाच्या सदरकर्त्या सौ. नीता सुरेश देवकर असून सिनेमाची संकल्पनाही त्यांचीच आहे. दिग्दर्शनासोबत कथा व संवादलेखनही  दिग्दर्शक योगेश जाधव यांनी केलं आहे. सिनेमाची पटकथा नीता देवकर आणि योगेश जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे. बाबा चव्हाण, दिपक अंगेवार यांच्या व्यतिरिक्त मंदार चोळकर आणि चंद्रकांत गायकवाड यांनीही गीतं लिहिली असून ती आनंद शिंदे, डॉ. नेहा राजपाल, जावेद अली यांनी गायली आहेत. कोल्हापूरमधील लाईटमन प्रताप शिंदे यांची मुलगी सुलक्षणा शिंदे भोवती "नटी"च कथानक गुंफण्यात आलं आहे. ही भूमिका अभिनेत्री तेजा देवकरने साकारली आहे. याखेरीज सुबोध भावे आणि अजिंक्य देव मुख्य भूमिकेत असून किशोर कदम, नागेश भोसले, किशोरी शहाणे-विज, शशांक शेंडे, प्रिय बेर्डे, नेहा जोशी, जगन्नाथ निवंगुने, किशोर चौघुले, दिप्ती भागवत, ऐश्वर्या तूपे आदींच्याही यात भूमिका आहेत. कॅमेरामन सुरेश देशमाने, नृत्य दिग्दर्शन राजेश बिडवे आणि कलादिग्दर्शन संतोष संखद अशी "नटी"ची तांत्रिक टीम आहे.  
पाश्चात्त्या संगीतात रंगलेल्या उडत्या चालीवरील गाण्यांवर भारतीय रसिकांना प्रेम करायला शिकवणारी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या गायकीचे अनेक रंग आजवर संगीतप्रेमींना पहिले आहेत. हिमलयाएवढ्या उंचीची कारकीर्द असलेल्या आशा भोसलेंनी नेहमीच विविध प्रकारची गाणी गायली आहेत. वयाची ८० वर्षे ओलांडलेल्या आशा भोसलेंचा आवाज आजही ऐन तारुण्यात आलेल्या नायिकेला शोभून दिसतो हे त्यांना लाभलेलं शारदामातेच वरदानच आहे. "नटी" या आगामी मराठी सिनेमात आशा भोसलेंच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा मराठी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 

सूर्यातेज प्रोडक्शन च्या बेनरखाली बनलेल्या निर्माते गिरीश भदाणे यांच्या "नटी" या सिनेमातील एका गीताला आशा भोसलेंचा सुमधुर स्वर लाभला आहे. "नटी" मधील "मी नटी…" हे शीर्षक गीत आशा भोसलेंनी आपल्या बहारदार आवाजात गायलं आहे। गीतकार दिपक अंगेवार आणि बाबा चव्हाण यांनी या गीताचे बोल लिहिले असून संगीतकार निखिल महामुनी यांनी हे संगीतबद्ध केल आहे. 
"नटी" हा ६०-७० वर्षांपूर्वीच्या मराठी नायिकेचा प्रवास पडद्यावर रेखाटणारा सिनेमा आहे. आपल करियर घडविण्यासाठी नातीची धडपड, तिची पेशन, तिची तडफ, तिचा अग्रेसिव्हनेस हा "नटी" च्या शीर्षकगीताचा मूळ गाभा आहे.हे सार गाण्याच्या माध्यमातून सदर करण्याची धमक आजही आशा भोसलेंकडे आहे.त्यांच्या आवाजाची रेंज, दम, परफेक्शन हे या  गीतासाठी अगदी अचूक असल्याने अशा भोसलेच या गीताला योग्य न्याय देऊ शकतील यावर संगीत दिग्दर्शकांपासून निर्माता-दिग्दर्शकांपर्यंत सार्याचंच एकमत झाल आणि"नटी" च शीर्षकगीत अशा भोसलेंच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलं. 

आशा भोसालेंसारख्या महान गायिकेसाठी संगीत रचना करण्याची संधी कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळातच लाभल्याने "नटी" चे संगीतकार निखिल महामुनी स्वतःला भाग्यवान मानतात. याबाबत निखिल उत्साहित होऊन सांगतात की, "नटी"च्या शीर्षकगीतासाठी एका दमदार आवाजाची गरज होती. आशाताईंनी आजवर हजारो गीतं गायली आहेत. आज त्या संगीताच्या मागे नव्हे तर संगीत त्यांच्या मागे धावतंय. त्यामुळे त्या आपलं गीत स्वीकारतील की  नाही याबाबत मनात प्रचंड धाकधूक होती, पण स्वतःच्या कामावर विश्वासही होता. आशाताईंना भेटल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितल की, मला जर गाणं, शब्द आणि चाल आवडली तर मी गाईन. मला गाणं आणि चाल पाठवा. त्यानुसार त्यांना गाणं  आणि चाल पाठवली. त्यांनी चार दिवसांनी फोन करायला सांगितलं, पण दोन दिवसांनी त्यांचाच फोन आला. गाणं  कधी रेकॉर्ड करायचंय? असं त्यांनी विचारताच आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळाली. गाण्यातील कंटेंट आणि चाल आवडल्याने त्यांनी गाणं  स्वीकारलं. त्यांच्यासोबत रेकॉर्डिंग करताना धम्माल आली. आपल्याकडचं चांगलं असेल ते दुसर्याला देण्याचा त्यांचा गुण त्यानिमित्ताने जाणवला. आपल्यासाठी एकूणच हा अविस्मरणीय अनुभव होता. प्रेक्षकांच्या मनालाही हे गीत भावेल अशी आशा निखिल महामुनी यांनी व्यक्त केली.
१९ सप्टेंबर २०१४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणारा"नटी" सिनेमाच्या सदरकर्त्या सौ. नीता सुरेश देवकर असून सिनेमाची संकल्पनाही त्यांचीच आहे. दिग्दर्शनासोबत कथा व संवादलेखनही  दिग्दर्शक योगेश जाधव यांनी केलं आहे. सिनेमाची पटकथा नीता देवकर आणि योगेश जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे. 
बाबा चव्हाण, दिपक अंगेवार यांच्या व्यतिरिक्त मंदार चोळकर आणि चंद्रकांत गायकवाड यांनीही गीतं लिहिली असून ती आनंद शिंदे, डॉ. नेहा राजपाल, जावेद अली यांनी गायली आहेत. 

कोल्हापूरमधील लाईटमन प्रताप शिंदे यांची मुलगी सुलक्षणा शिंदे भोवती "नटी"च कथानक गुंफण्यात आलं आहे. ही भूमिका अभिनेत्री तेजा देवकरने साकारली आहे. याखेरीज सुबोध भावे आणि अजिंक्य देव मुख्य भूमिकेत असून किशोर कदम, नागेश भोसले, किशोरी शहाणे-विज, शशांक शेंडे, प्रिय बेर्डे, नेहा जोशी, जगन्नाथ निवंगुने, किशोर चौघुले, दिप्ती भागवत, ऐश्वर्या तूपे आदींच्याही यात भूमिका आहेत. 

कॅमेरामन सुरेश देशमाने, नृत्य दिग्दर्शन राजेश बिडवे आणि कलादिग्दर्शन संतोष संखद अशी "नटी"ची तांत्रिक टीम आहे.  


मन एक पाखरू..नवा मराठी अल्बम


मनाचे विविध भावरंग घेऊन लवकरच मराठी भावगीतांचा एक नवाकोरा रोमँटिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, बेल शेंडे, राहुल सक्सेना अशा प्रथितयश गायक-गायिकांबरोबरच गोव्याच्या प्रसिद्ध गायिका रचला अमोणकर यांनी या अल्बममधील गीते गायली आहेत. 

पुण्याच्या "मायक्रो क्रिएशन्स" प्रस्तुत राजेश पवार निर्मित अल्बम "मन एक पाखरू", 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप' या संगीत क्षेत्रातील नामवंत कंपनीद्वारे हा अल्बम रसिकांसमोर येत आहे. कवी प्रमोद कोयंडे यांनी या अल्बमसाठी गीतलेखन केले असून मनाचे विविध रंग उलगडून दाखविणाऱ्या या गीतांना गोव्याच्या तरुण संगीतकार सुनील केरकर यांनी संगीत दिले आहे. तर आजवर अनेक अल्बम्सना संगीत संयोजन केलेल्या निरंजन जामखेडकर यांनी "मन एक पाखरू" चे संगीत संयोजन केले आहे. 

मन या विषयावर आधारित या अल्बम मध्ये एकूण नऊ गाणी असून प्रत्येक गीतामध्ये मनाचा एकेक कप्पा उलगडण्यात आला आहे. प्रेम, आनंद, दुःख, मनस्वीपणा अशा मनाच्या विविध छटा असलेली गाणी रसिकांच्या मनाचा नक्कीच ठाव घेतील, विशेषतः तरुणाईला भावतील. "मन एक पाखरू" हे या अल्बममधील शीर्षकगीत शंकर महादेवन यांनी गायले असून गीतातील शब्द आणि त्याला दिलेले संगीत याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. बेल शेंडे, महालक्ष्मी अय्यर, प्रचला अमोणकर, आणि राहुल सक्सेना यांनीही उत्तम गाणी गायला मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. 

पाऊसधार कोसळत असताना आणि त्यात चिंब भिजावेसे वाटत असतानाच "मन एक पाखरू"द्वारे स्वरधारांमध्ये चिंब होण्याचा योग रसिकांना मिळणार आहे. 

Saturday, August 30, 2014

कलोपासनेकडे ध्येय्यवादाने पहायला हवे

डॉक्टर श्रीराम लागू...

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांच्या कुशलमार्गदर्शनाखाली १९७८ साली मुंबईत रविंद्र नाटय् मंदिरात नाट्य प्रशिक्षण शिबीरासाठी गेलो असताना..प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती केली.. एका रविवारी डॉ. श्रीराम लागूं सोबत शुटिंगलाही गेलो.
..ते विचार लेख स्वरुपात पुण्याच्या दैनिक तरुण भारत मध्ये जून १९७८ मध्ये प्रसिध्द झाले होते...या जुन्या मुलाखतीचे हे दर्शन या इथे देत आहे..अगदी तेच शब्द...यातून डॉक्टरांचे विचारदर्शन उलगडत जाईल..एवढीच अपेक्षा..ही आठवण आयुष्याची साठवण ठरली आहे..

------------------------------------------------------------------------------------------------------------------------


चला आपण चांदिवलीच्या स्टुडिओत जाऊ, तिथे निवांत गप्पा मारता येतील, पांढरा शुभ्र लेंगा, तांबडा गुरु शर्ट, डोळ्यावर चष्मा अशा वेशातले हे तरतरीत व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. श्रीराम लागू. ते मला सांगत होते. वरळीच्या हिंगोरानी हाऊसच्या डॉक्टरांच्या फ्लॅटवर मी त्यांची मुलाखत घेण्य़ास गेलो होतो..पण डॉक्टर साहेब निघाले होते `दोस्त दुश्मन`च्या सेटवर.
एका जंगलाप्रमाणे भासणा-या आवारात फाटकातून गाडी बैठ्या घरापाशी थांबते. हीच आमची मुलाखतीची जागा आणि इथेच आज राज कोहलींच्या दिग्दर्शनाखाली रॉय फिल्मच्या `दोस्त दुश्मन` सेटवर डॉक्टरांचे आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे शॉटस् घेतले जाणार होते. शत्रुसाब अजुन आले नव्हते.
प्रत्यक्ष प्रमाणाचा फायदा घेऊन मी विचारतो, हे श्रेष्ठ समजले जाणारे नट वेळ पाळण्याबाबत असे गहाळ का ?
“ तुम्ही आम्ही प्रेक्षक मंडळी त्यांना डोक्यावर चढवून ठेवतो. त्यामुळे हे लोक स्वतःविषयी मोठेपणाच्या काही कल्पना करून बसतात. लहरीपणा,वेळ न पाळता इतरांना ताटकळात लावणं यातच ते मोठेपणा मानतात”, बोलण्याच्या ओघात एक अजबच बात समजला. डॉक्टरसाहेबांना चष्म्याशिवाय़ जवळचेही फारसे नीट दिसत नाही आणि डॉक्टर स्टेजवर तर या अवस्थेत काही नाटकात त्यांचे काम अप्रतिम झालेले आपण पाहिले आहे..मग हे कसे काय?  मी विचारले.
“त्यांचं असे आहे मी तालमी मी चष्मा लावूनच करतो. सरावाने सारे काही पक्के होते. मग प्रत्यक्ष स्टेजवर चष्मा न लावता काहीच अडचण वाटत नाही.”
पण प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून नटाला हुरुप येतो. त्यांच्या अभिनय कौशल्याला उत्तेजन मिळते ..असे म्हणतात ना? मी आपली शंका प्रदर्शित केली.

“माझ्या बाबतीत नेमके उलटे आहे. प्रेक्षकांना मी पाहूच शकत नाही त्यामुळे त्यांच्या भल्याबु-या नजरांचा माझ्यावर परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. उलट प्रेक्षक चार असले काय किंवा चार हजार असले काय. माझा अभिनय तोच रहातो. नूर पालटण्याची वेळ येत नाही कधी!”
दृष्टीदोष हा कधीकधी वरदान ठरू शकतो, त्याचेच हे बोलके प्रतीक.
असेच काही विषय चर्चमध्य़े य़ेतात. दरम्यान शत्रू साब हाजीर झालेले. शॉटस,सुरु, ओ.के. अनपेक्षित असा तोही आनंद मिळून गेल्याने मन उल्हसित झालेलं.
याच ओघात बोलताना डॉक्टरांनी जी मोलाची माहिती दिली त्यावरुन.. १८८५ ते १९२० हा मराठी रंगभूमिचा सुवर्णकाळ असे त्यांचे मत दिसले. त्याआधी रामलीला, भारूड, लळीत यातूनच नाट्याविष्कार होत होता, उसनवारीच्या आरोपाचा परामर्श घेताना त्यांनी म्हटले की, इंग्रज, मुस्लीम यांच्या संपर्काने परकीयांचे अनुकरण अपरिहार्य होते. भाषा, विचार, रहाणी, सवयी यांचा परिणाम घडणे स्वाभाविकच होते. पण विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमिला कलाटणी दिली. विशिष्ष्ट वळण दिले आणि नवी शक्तीही दिली. जे चांगले आहे ते परकीयांचे असले तरीही स्वीकारायस हरकत नाही.
आजच्या मराठी रंगभूमिचा विचार करताना अन्यभाषिक रंगभूमिचे रंगरूप विचारात घेणे योग्य वाटते.. त्यासंदर्भात लागू म्हणाले, मुंबईत सादर होणारी गजराथी नाटके मराठी नाटकांची भाषांतरेच असतात. मूळ गुजराथी नाटके येत नाहीत. मराठीइतका प्रेक्षकवर्ग गुजराथी रंगभूमीशी निगडीत नाही. मराठी प्रेक्षकांपेक्षा बंगाली लोकांची नाटकांची आवड जास्त असावी. तसेच आपल्या आत्ताच्या प्रायोगिक नाटकांपेक्षा उडीया रंगभूमीवर धाडसी प्रयोग होत आहेत. लेखन, दिग्दर्शन, कलावंत व तांत्रिक या सर्वच बाबतीत मराठी रंगभूमी आघाडीवर आहे. जाणकार प्रेक्षक ही मराठी रंगभूमीवर असलेली कायम ठेव असल्याचे ते अभिमानाने सांगतात.

रंगभूमीवर आपण अनुकरण करतो व ते दिसते शिस्तीचे. काळानुसार समस्या बदलत असतात. नाटक, कविता, कादंब-या, ललित लेखन यांचेही असेच. जे वरवरचे होते ते टिकून राहणार नाही. काळाबरोबर वाहून जाईल व जे चांगले आहे ते टिकून आहे व राहीलेही , हे गडकरी देवल यांच्याक़डे पाहता लक्षात येईल. एखादे नाटक वाईट अथवा चांगले हे काळच ठरवितो. आपल्यापुरता आपण विचार करावा. मात्र उत्तेजन देऊन जे त्यातले चांगले आहे ते वाढविले पाहिजे. थांबवता किंवा आडवता कामा नये..असा विचार पूर्वीची व आत्ताची नाटके या संदर्भात बोलताना त्यांनी मांडला.
याच अनुषंगाने आजच्या प्रायोगिक रंगभूमीकडे चर्चेचा ओघ वळला. १९३२ सालापासून या प्रायोगिक या प्रकाराला सुरवात झाली. `आंधळ्यांची शाळा` पहिला यशस्वी प्रयत्न होता. `घाशीराम कोतवाल` व `अजब न्याय वर्तुळाचा` ही नाटके मला जास्त प्रिय वाटतात.
आजची प्रायोगिक म्हणविणारी नाटके एकमेकांचे अनुकरण करणारी आहेत. ते नविन प्रयोग नाहीत. असेच जर पुढे चालू राहिले तर नाटक त्याच अजब वर्तुळात फिरून मरून जाईल अशी भिती डॉक्टरांनी व्यक्त केली.
ठराविक साचा मोडून केलेले ते सर्व प्रायोगिक अशी सुटसुटीत व योग्य व्याख्या त्यांच्या मते हवी. अमूक तेच प्रायोगिक समजले पाहिजे. असे लेबल आपण लावू शकत नाही. प्रत्येक काळात प्रायगिक ची व्याख्य़ा बदलत जाईल. कालचे चे प्रायोगिक ते आजचे व्यावसायिक असले तरी आजचे व्यावसायिक उद्याचे प्रायोगिक राहणार नाही, असे विचार त्यांनी मांडले.

नाटकाचा आशय व तो सादर करण्याची पध्दत या दोन्हीबद्दल त्यानी चिंता दर्शविली. १९६० ते १९७० च्या दरम्यान हा प्रवाह मंदावला,. तेंडूलकर, कानिटकर यांच्यासारखे विशिष्ट वळणाचे लेखक आहेत. खानोलकरांप्रमाणे गूढ लेखन करणारेही आहेत. पण सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यासारखे लेखक आज निर्माण व्हायला पाहिजेत. तसे झाले नाही तर ह्या प्रायोगिकतेला खिळे बसेल.
आजच्या संगीत रंगभूमीवर नवीन प्रयोग होत नाहीत याबद्दल खेद व्यक्त करुन ते म्हणाले, गाण्याकरीता गाणे हाच प्रकार आजच्या संगीत नाटकात पहायला लागतो. `घाशीराम कोतवाल`ची जात संगीत नाटकाची आहे. संगीत हा यातील अविभाज्य भाग आहे. सबंध समाजावर संगीत नाटकांचा परिणाम घडवायला गाणारे नटच राहिलेले नाहीत. संगीत नाटकाची परंपरा टिकविणे हा संगीत नाटककारांचा उद्देश असावा. केवळ नाटक संगीत असावे म्हणूनच गाणी त्यात टाकायची अशा स्वरुपाच्या विद्याधर गोखले यांच्या मंदारमाला, सुवर्णतुला इत्यदि नाटकांवरुन दिसून येते, असे परखड मत डॉक्टरांनी मांडले. संगीत नटांची उणीव निर्माण झाल्यामुळे जे आत्ता आहे तेच चांगले होत आहे असे मानावे लागते, याचा खेद त्यांच्या बोलण्यात आढळला.

दिग्दर्शक हा नाटकात भूमिका करणारा नसेल तर नाटकाचा पहिला प्रयोग हाच केवळ दिग्दर्शकाचा असतो. नाटकात दिग्दर्शक काम करत असेल तरच व नाटक दिग्दर्शकाचे मानले जावे..नाटक अयशस्वी झाले तर  दिग्दर्शकाच्या माथ्यावरच  याचे खापर फोडले जाते व त्याला जबाबदार धरले जाते..याबद्दल त्यांना खेद वाटतो.
संस्था-संस्थामध्ये सामंजस्याची भावना हवी. त्यामुळे नटावर एकाच प्रकारचे संस्कार न होता निरनिराळे चांगले संस्कार होतील, अशीही एक मार्मिक सूचना त्यांनी केली. प्रत्येक कलाकाराला स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्यात पूर्ण स्वातंत्र्य कुठल्याही संस्थेत आवश्यक असते, अशी भुमिका त्यांनी मांडली.

स्वतः डॉक्टर असूनही आपल्याला कलेसाठी पूर्ण वेळ द्यायला हवा म्हणून डॉक्टरांनी तो व्यवसाय सोडून ते नाट्य-चित्रपटाच्या क्षेत्रात आले. तिथे ते अभ्यासू वृत्तीने सर्वस्व ओतत आहेत. कुठलीही कला पूर्णवेळ देऊनच केल्यास तिचा खरा आविष्कार होतो व भूमिकेला योग्य न्य़ाय मिळतो. केवळ हौस म्हणून या कलेकडे पहाणारेही आहेत. पण ही अभ्यासाची कला आहे,असे त्यांचे प्रांजल मत आहे.
आजच्या नाट्य व्यवसायातील ९५ टक्के कलाकार अन्य ठिकाणी नोकरी करणारे आहेत. अन्य व्यवसायिकांच्या खांद्यावर उभी राहिलेली आजची व्यावसायिक रंगभूमी आहे . हे डॉक्टरांचे निरिक्षण आहे.
अस्सल कलावंताना उतेजन मिळत नाही. कलोपासनेकडे धेय्यवादाने कोणी पहात नाही याची कारणमिमांसा करताना डॉ. श्रीराम लागूंनी एक वेगळीच भूमिका मांडली. ते म्हणाले, `सिनेमा व नाटक  यामध्ये  सिनेमाकडे आज जास्त प्रेक्षकवर्ग ओढला गेलेला आहे. हा प्रेक्षक कलेकडे कला या दृष्टीकोनातून पहात नाही. करमणूक व आनंद इतक्या मर्यादित हेतूनेच आजचा प्रेक्षक अभिनयाकडे पहातो. आणि त्यातूनच सिनेमाकडे त्याचा ओढा वाढतो आहे. यामुळे आवश्यक तेवढ्या गांभिर्याने कलोपासनेकडे पाहिले जात नाही, त्याला उत्तेजन मिळत नाही.

स्वतः इंग्रजी दुसरीत असताना स्टेजवर पहिला अभिनय करमारे आणि आजवर अनेकविध नाटकातून आणि असंख्य चित्रपटातून आपल्या अंगच्या अभिनय कोशल्याने विविधपैलू चमकदारपणे दाखविणारे डॉक्टर श्रीराम लागू यांचे वरील विचार `आधी केले आणि मग सांगितले` या उक्तिप्रमाणे अधिकारवाणीने बोलले गेलेल आहेत म्हणूनच त्यांना तपश्चर्येचे आणि कर्तृत्वाचे नैतिक पाठबळ आहे.


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Monday, August 18, 2014

नगरच्या क्षीरसागर मठात रंगला भक्तिसंगीताचा सोहळाअहमदनगरच्या क्षीरसागर महाराजांच्या मठातल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या दत्तमंदिरातल्या भव्य मंडपात काल रविवारी पुण्याच्या राजेंद्र दिक्षित आणि सौ. जयश्री कुलकर्णी यांच्या भक्तिस्वरांनी भाविकांच्या मनात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ , संत भानुदास महारांच्या रचना सादर झाल्या. काल तिथे होता रात्री १२ वाजता..श्रीकृष्ण जन्मोत्सव..त्यानिमित्त ही सेवा दत्तात्रयांच्या मूर्तिसमोर सादर करताना वेगळ्याच वातावरणाने सारेच भारून गेलो होतो..

नगरच्या त्या सुमारे चार एकराच्या परिसरात विस्तारलेल्या मठात क्षिरसागर महाराजांच्या पावन स्पर्शामुळे मनात एक वेगळीच चेतना जाणवते. पुण्यातले आम्ही कलाकार तिथे अभंग, गवळण सादर करीत वातावरणात आनंद निर्माण करीत होतो.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे गाण्याची रितसर रियाज केल्यानंतर राजेंद्र दीक्षित आपले स्वतंत्र अभंगवाणीचे आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम सादर करतात.राम कृष्ण हरी च्या सुरवातीच्या गजरा पासून कान्होबा तुझी घोंगडी पर्य़त मोजके पण नेमके अभंगरचना सादर करून  त्यांनी आपले कसब सिध्दज करुन भक्तांकडून शाबासकी मिळविली..

बार्शीच्या व्यंकटेश बुरली यांचेकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेल्या जयश्री कुलकर्णी यांनी काही गवळणी गाऊन आपली सेवा सादर केली.

संगीताला योग्य असा भक्तिरसाची आवड असणारा भाविक मिळाला की गाणा-या कलावंताला उत्साह येतो..काल तसेच झाले होते. या रचनातून देवाला शोधण्याचे,त्याच्याशी संवाद साधायचे माध्यम उपलब्ध झाले.. काल सारेच जण त्या मोहमयी सामाधानी वातावरणात भावभक्तिची उपासना करत होते.श्री दत्त देवस्थानचे शिस्तशीर कार्य आणि तिथल्या पदाधिका-यांची वागणूक यामुळे पहिल्यांदाच मठात गेलेले आम्ही सारे समाधानी होऊन परतलो. मुख्य असलेले प्रधान काकांनी सर्वांचा प्रसाद देऊन सत्कारही केला.. 

सुयश बलकवडे (पखवाज), विनित तिकोनकर (तबला), मंदार गोडसे (हार्मोनियम), आनंद टाकळकर (टाळ) आणि सौ. चारुशीला गोसावी (व्हायोलीन) याच्या सुविद्य साथीने गाण्याला ताल.लय आणि नादमयता लाभली..ती इतकी की सारे तन्मय होऊन..अभंगरचनेला टाळ्यांनी दाद देत आस्वाद घेत राहिले. कार्यक्रमाच्या निवेदनाची बाजू यावेळी सुभाष इनामदार यांनी सांभाळली..अशा वातावरणात अभंगवाणीचे संस्कार त्यापरिसरात वेगळीच भावीकता निर्माण करत होते हे नक्की.

Monday, August 11, 2014

`दिल की बात` ला.. बहुत अच्छे..ची दाद...


पुण्यात गजल गायनाचे विविध कार्यक्रम होतात. त्या गायनाची गजलचे अर्थ उलगडून स्वरांच्या सुरील्या मैफलीतून उमटविणा-य़ा अशाच एका संस्थेने `साज`ने `दिल की बात` द्वारे स्त्री गजल गायिकांचे पुनःस्मरण केले..श्रुति करंदीकर आणि गायत्री सप्रे ढवळे या दोन गायिकांनी त्या सादर केल्य़ा आणि रसिकांकडून तोंडभरुन कौतूक करुन घेतले. हे सांगायला तसा बराच उशीर झालाय कारण तो कार्यक्रम २ ऑगस्टला पुण्यात पत्रकार संघात होऊन गेला..परंतू देरसे आये ..दुरुस्त आये,,असच काहीसे म्हणतात ना त्याप्रमाणे.
ये इश्क नही आसॉं, दूर है मंजिल, गुलोंमे रंग भरे, आणि नुकताच झालेला तसव्वूर..असे गजलांचे कार्यक्रम करून त्यात आपली मुशाफिरी जगजाहिर करणा-या `साज` या संस्थेने मागच्या पीढीतल्या पाच नामवंत गजलगायिकांना या कार्यक्रमातून मानाचा कुर्निसात केला..तोही जाहिरपणे..

सुरवात झाली फरिदा खानम यांनी गायलेल्या गालिब च्या इब्ते मरियम हुआ करे कोई..या गजलने. रागेश्री रागावर आधारित गजलचा डौल पूर्णपणे शास्त्रीय ढंगाचा होता. इथूनच मैफलीत रंग भरायला सुरवात झाली. श्रुततति करंदीकर यांनी तेवढ्याच समरसतेने ही गजल सादर केली.
सर्वांना परिचित अशी मेहदी हसन यांनी गायलेली मुहबत करनेवाले कम न होंगे.. ही गजल सुरु होताच श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. गायत्री सप्रे-ढवळे यांनी ती गजल सादर केलीही उत्तम..त्यातल्या सा-या अर्थाला समजून ती गायली गेल्याने प्रेक्षकांनी नंतरही टाळ्यांनी कलावंतांना प्रोत्साहन दिले..
मधुरानी यांच्या दोन गजला श्रुति कंरदीकर आणि गायत्री सप्रे-ढवळे यांनी एकामागोमाग एक पेश केल्या. न वो बात कर मेरे हमनावा आणि वो जो हममे तुममे करार था..या गजलनी वातावरण तयार झाले. रुपक तालातल्या वेगळ्या वजनाच्या या दोन गजलांचा रसिकांना भरभरुन आनंद घेतला.

सर्वांत शेवटी आबिदा बेगम यांनी गायलेल्या जबसे तूने मुझे दिवाना बन रखा है या भैरवीतल्या गजलला पेश केले ते दोन्ही गायिकांनी एकसुरात  यामुळे हा सहगजल गाण्याचा वेगळा प्रयोगही आकर्षक होता.
दोन गायिकांनी एकाच बैठकीत गजल गायन करण्याचा पुण्यातला हा एक दुर्मिळ योग होता...हे नक्की..
कार्यक्रमात हार्मानियमची साथ केली ती कुमार करंदीकर यांनी..ती नुसती साथ नव्हती तर या वाद्यातून ते गातही होते..इतके ते तंतोतंत बरोबर संगत करीत गायनाला रंगत चढवित होते. ताल म्हणजे तबल्यातून बोलत आपल्या बोटांनी ते अरुण गवई..हिंदी आणि उर्दुची जाण ज्यांच्या निवेदनातून क्षणोक्षणी दिसत होती..त्या नीरजा आपटे...


एकूणच ही दिलकी बात अशीच चालू रहावी आणि श्रोत्यांनी बहुत अच्छे..म्हणून दाद देत रहावी अशी ही मैफल होती ..

Monday, July 28, 2014

संगीतातले अस्सल हिरे-अजय-अतुल


-अजय-अतुल यांच्याबद्दल भास्कर चंदावरकरांचे मत
ज्येष्ठ संगीतकार , ज्येष्ठ सतारवादक आणि संगीताचे अभ्यासक पं. भास्कर चंदावरकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनामित्ताने आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांची मुलाखत होती..त्या प्रसंगी त्यांच्या पत्नी मीना चंदावरकरांनी आपल्या कलाकार पतीबद्दलचे मनोगत व्यक्त केले..त्यातून काही प्रमाणात चंदावरकर आणि त्यांचे कर्तृत्व कळेल..म्हणून मुद्दाम तेच त्यांचे विचार तुमच्यापर्य़त थेट पोचविण्याचा हा प्रयत्न...

ही पाचवी आणि शेवटची स्मृतीमाला आहे. हे वाचून काहीजणांना आश्चर्य आणि वाईट वाटेल. त्यांनी तसं मला पत्रानं किवा फोन करुन कळवलही. संगीताशी संबंधित असलेल्या आणि विशेषतः चंदावरकर यांना ज्यांचे संगीत फार प्रिय होत असा व्यक्तिंना बोलावण्याची ही संधी आम्हाला घालवायची नव्हती. त्यांना काही संगीतरचनाकार फार प्रिय होते. ते म्हणायचे संगीतरचनाकर आणि चाली पाडणारी माणसं यात जमीन आसमानचा फरक असते. कंपोजर आणि ट्यूनमेकर हे निराळेच असतात.
त्यांना अजय-अतुल यांच्या रचना अतिमनःपूर्वक आवडायच्या. त्या दोघांच्या सांगितिक प्रतिभेबद्दल आणि सर्जनशीलतेबद्दल त्यांना खूप कौतूक आणि आदर वाटत असे. ते आम्हाला माहित होतच. चंदावरकरांना आवडणारे संगीतकार म्हणजे सलील चौधरी, मदन मोहन, सी.रामचंद्र, पं. रवीशंकर, एस.डी.बर्मन, आर.डी.बर्मन तसेच मराठीतले वसंत पवार आणि राम कदम . संगीत सागरात अवगाहन करून सांगितिक विचारांची रत्न आपल्यापर्यंत पोचविणारे संगीतरचनाकार हा त्यांचा मानसिक, वैचारिक विसावा होता. एस. डी बर्मन आणि अजय-अतुल यांच्यामध्ये चंदावरकरांना एक साम्य आढळत असे. सहा वर्षाच्या मुलापासून ते साठी-सत्तरीच्या वृध्दांपर्यत सर्वांना बर्मनदांचं आणि अलीकडे अजय-अतुल यांचे संगीत त्यांच्या तालावर आणि नादावर डोलायला लावत असे.
याचा प्रत्यक्ष अनुभव मला आणि माझ्या सहकारी शिक्षकांनी चांगलाच आला. शेकोटीसाठी रात्रीच्या वेळी सहा वर्षांची दोनएकशे मुले शाळेत बोलावली होती. शेकोटी झाली. खाणं झालं. खेळ झाले. थोडसं झोपाळलेला एक मुलगा साधारण साडेदहा अकराच्या सुमारास अगदी ताला-सुरात म्हणाला...` टिचर, जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा...` मग काय इतरांनीही त्याच ठेक्यात सुरु केले....वाजले की बारा..  चंदावरकर जे म्हणत असत, त्याची प्रत्यक्ष प्रचिती आम्हा सर्वांना इथे आली.
अजय-अतुल यांच्या रचना ऐकल्यानंतर त्यातली सौदर्यस्थळं, पार्श्वसंगीतात वापरलेल्या साजांमधून, त्या रचनेला लाभलेलं वेगळं अस्तित्व आणि पुन्हा त्याचं त्या रचनेत मिसळून जाणं. काही खास जागा, काही अनवट संगीतक्षण. वाद्यांचा अचूक आणि परिणामकारक वापर आणि विशिष्ठ प्रकारे लावलेल्या स्वरांमधली जादू.. यातील संगीतसौदर्य़ चंदावरकर आम्हाला विश्लेषण करुन सांगत.त्यानं आमचही सांगितिक उन्नयन होत असे.
इथल्या मातीतला गंध..संगीतात आलाय..
ते म्हणायचं, ही पोरं संगीतातले खरे आणि अस्सल हिरे आहेत. इथल्या मातीतला गंध, मूलतत्वं आणि बाज त्यांच्या लोकसंगीतात मुरलेली आहेत. असं संगीत बांधणारे पहिले लोकसंगीतकार वसंत पवार. दुसरे आमचे रामभाऊ कदम. त्यांनंतरचे तिसरे म्हणजे अजय-अतुल. आपल्या ह्दयातून, भावभावनांमधून, जोशामधून, आवाजामधून आणि रचनाकौशल्यामनधून रसिकांच्या मनात शिरणारे आणि थेट ह्दयात घुसणारे आजय-अतुल. त्यांच्या संबंधात चंदावरकर म्हणत असत..बंदो मे है दम..!
रचनाकार हा बुध्दिमानच असतो अशी चंदावरकरांची खात्री होती. आपल्या देशात कित्येक वर्षे लोकसंगीत हे गावकुसाबाहेर, देवळा बाहेरच राहिलं आणि त्यामुळे हे साधक, शैक्षणिक परिघाबाहेर राहिले. दुर्दवाने त्यांची क्षमता इतर कुणाला फारशी लाभलीच नाही आणि या संगीतकारांना सामाजिक प्रतिष्ठाही लाभली नाही. त्यामुळे संगीतकार बुध्दिमान असतो, त्याचा सांगितिक स्वतंत्र विचार शब्दांनी नसेल, तर त्याच्या स्वरातून, रचनातून मांडू शकतो हे कळण्याची क्षमताच आपल्यातल्या असांगेतिकतेमुळे नष्ट झाली. पं. भीमसेन जोशी म्हणायचे, `गाणं हे माझे काम. ते विचार बिचार काय असेल ते तुम्ही बघून घ्या.`........ ते बुध्दीमान आणि विचारवंत नव्हते असं कोणी म्हणू तरी धजेल काय?

एकांडे शिलेदार
चंदावरकर जरा एकांडे शिलेदारच होते. त्यांनी लोकसंग्रह कधी केलाच नाही. ते त्यांना जास्त आवडतही नव्हतं किंवा जमलही नसेल. त्यांच्यात तो एक चांगला गुणच नसेल असं मी म्हणते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची गूढता, व्यासंगी वृत्ती आणि प्रखर बुध्दिवाद होता. त्यांचा गुरुबाजीवर आजिबात विश्वास नव्हता. लोकांनी त्यांच्या फार जवळ येणे त्यांना आवडत नसावं. त्यात दोन अपवाद... अरुण खोपकर आणि ऋषीतुल्य रामकृष्णबाब नाईक.
ब-याच लोकांनी तुम्ही आम्हाला..मला तुमच्याजवळ का येऊ देत नाही अशी तक्रार त्यांच्याजवळ किंवा कधी माझ्याकडेही केली होती. माझ्या मते त्यांचं कारण असं आपण किती संवेदनाशील आहोत ते कुणाला..म्हणजे कधीकधी आम्हालासुध्दा.. कळू नये अशी त्यांची तीव्र इच्छा असे.
आपलं  शारीरिक आणि मानसिक दुःख कोणाजवळ बोलावं हे त्यांना मानवतच नसे. त्यांची तीव्र संवेदनशीलता emotionality लोकांपर्य़त पोचावी, त्यांना ती कळावी असं वाटणे म्हणजेच एक प्रकारचं मानसिक दौर्बल्य आहे असं त्यांना वाटे. मी काही त्याचं psychologsis   करु मागत नाही . परंतु अशा वागण्यामुळे लोकांना ते शिष्ट, तुसडे किंवा अहंकारीसुध्दा वाटत. अर्थात ती सगळी मानसिकता, त्यांची सर्जनशीलता, आंतरिक तळमळ त्यांच्या कलेमधून रसिकांपर्य़त, निदान ब-याच रसिकांपर्य़ंत पोचली असे मला वाटतं.
एका बाजुला चंदावरकर, उत्तम रसिक, खूप आनंदी, सतत खळखळाची हास्य करणारे, इतरांना हसवणारे, स्वच्छंदी आणि तीक्ष्ण विनोदबुध्दीचे होते. परंतु त्यांचा गाभा सखोल बुध्दिमत्तेचा, सर्जनशीलतेचा, सतत वैचारिक सत्य धुंडाळण्याचा होता.
ते खेळकर होते. वाडीया कॉलेजच्या विजयी टीमचे कप्तान आणि Fast pace opening बोलर होते. टेबलटेनिसचे triple crown winner होते. ते नखचित्रं काढत. Paintings  करीत आणि रोज रात्री सतारिचा रियाज करीत. त्यांनी सितारीते ४०  दिवसांचे दोन चिल्ले केले होते.  त्यांना केलेली दगडी आणि इतर शिल्पं आमच्या घरी आहेत
आमच्या घरासमोरचा शंभऱ फुटी रस्ता वयाची ७१ वर्ष पूर्ण होईपर्यंत रोज ते झाडत असत. ६५ वयापर्य़ंत घरातलं सगळ प्लबींग तेच करत. झाडांना रोज पाणी घालणं हा पुण्यात असताना त्यांचा सकाळचा उद्योग होता. आमच्या घरच्या चित्रासाठीच्या जवळजवळ सगळ्या लाकडी फ्रेम त्यांनी लाकूड विकत आणून स्वतःच्या हाताने बनविलेल्या आहेत. मणीपूर, केरळ, किरगीस्तान पर्य़ंत खाल्लेले पदार्थ घरी बनवून घरच्यांना किंवा खास पाहुण्यांना खाऊ घालायचा छंद त्यांना होता., या सगळ्यांच्यावर त्यांना गप्पा मारायची मोठी हौस होती. एकीकडे मी त्यांना एकांडा शिलेदार म्हणते आणि गप्पा मारण्याची होस होती असही म्हणते. माणसं अशीच असतात, विरोधाभासापूर्ण, या गप्पांमुळेच त्यांच्या हातून एकच ( आणि माझ्या हातूनही एकच)  पुस्तक ( वाद्यवेध) लिहलं गेले. आमच्या गप्पांची गोष्ट तर अविश्वसनीय आहे..
त्यांच्या मोठ्या सांगितिक कामाबद्दल त्यांना recongnition मिळालं नाही किंवा ज्यांनवा opus work म्हणावं असा त्यांच्या संगीतरचना लोकांना ऐकायला मिळाल्या नाहीत याची मला खंत आहे. अर्थात सगळ्या लहान किंवा मोठ्या कलाकारांच्या बायकांना तशी ती असतेच. विशेष म्हणजे ती खंत त्यांना मुळीच नव्हती. त्यांचे संगीत कुणी उचलून वापरलं तर त्यांना काहीही वाटत नसे,  म्हणायचे `ते चांगलें आहे असं वाटलं म्हणून ते आपल्या नावावर खपवतात, म्हणजे बरचं आहे ना.. निदान स्वतःच्या मनात तरी ते उचले तसं कबूल करत असतील.`
चंदावरकरांना आतून, मनातून स्वतःच्या रचनांबद्दल एक कलातम्क आत्मविश्वास वाटायचा. त्यांच्या काही उत्तमोत्तम रचना, मोठी कामं लोकांपर्य़त पोचली नाहीत किंवा पोचूनही कळली नाहीत याची खंत आम्हाला वाटायची. तेव्हा शांतपणे ते आम्हला म्हणायचे, `लोकांना आवडो न आवडो. तुम्हाला आवडली ना? मग झालं!` अशी कलंदर वृत्ती त्यांच्यात होती . ` यावेळी नाही माझ्या हातून चांगलं संगीत झालं..`असं म्हणायचा प्रांजळपणाही होता..

-मीना चंदावरकर, पुणे