Friday, January 10, 2014

असे व्यक्तिमत्व होणे नाही..

दाजीकाका गाडगीळ...व्यायामानंतर ज्वारीची भाकरी आणि दूध यांची न्याहरी करुन नेहमी शाकाहारी भोजन घेणारे दाजीकाका..नेहमी सांगत आरोग्य चांगले रहायचे असेल तर स्वतःच्या शरीरीची , मनाची अधिक चांगल्या पध्तीने जोपासना करायला हवी..माझ्या माहितीप्रमाणे व्यायाम आणि योगासने नियमीत करून आपले शरीर त्यांनी तंदुरुस्त ठेवले. व्यावसायाची धुरा मुलगा, मग नातू यांचेकडे सूपूर्त करुन ते स्वतः आनंदी आयुष्य जगत आले. 
सोन्यासारखी परंपरा असणारे अवघे ९८ वर्षांचे दाजीकाका गाडगीळ गेले..ही खरी न वाटणारी गोष्ट आहे...पु ना गाडगीळ ही पेढी पुण्यात घेऊन येभन तिची महती सा-या जगाला दाखविणारे पुण्याचे भूषण मह्णजे हे दाजीकाका होते. काळ्या मर्सीडीस मधून ठरलेल्या वेळी हजर राहून सर्वांना आशीर्वाद देताना कैतुकाची थाप देणारे...ते अधुनिक काळातले दानशूरच होते..
केवळ सोन्यासारखे शरीर एवढेच नव्हे तर ते कुठेही गेले तरी काहीना काही घेऊन..बक्षीसी देऊन वर खास भरपेट आशीशही देत...
काळा टोपी.तलम धोतर..आणि पांढ-या शर्टावर काळा कोट अशी प्रसन्न मुद्रा घेऊन ते वावरत..त्यांचे येणे म्हणजे मैफलीला, सभेला प्रसन्नचित्त करीत...


संगीत नाटक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय..बालगंधर्वांची नाटके त्यांनी सांगलीला भरपूर पाहिली...पुण्यातही बालगंधर्वांवर जेव्हा सुबोध भावेंना घेभन नितिन चंद्रकांत  देसाई यांनी चित्रपट काढायचे ठरले..तेव्हाही मूहूर्ताच्या चित्रिकरणाला ते स्वतः आनंदाने सहभागी होऊन..आपण पाहिलेले बालगंधर्व याबद्दल सांगितले होते. शिलेदारांच्या मराठी रंगभूमीवरही तेवढाच जीव होता..
नाट्यसंगीत आणि संगीत नाटकांना ते जोपर्यत जाणे शक्य होते तोपर्यंत जात आणि शेवटपर्यंत निरागसपणे संगीत आकंठपणे पिऊन घेत..
व्यवसायावरही तेवढीच निष्ठा...आलेल्याग्राहकांशा आपुलकीने बोलून त्यांच्या पौटात शिरुन त्यांनी धंद्याचा जम बसविला..सचोटीने व्यवसाय करण्याचे ब्रीद त्यांनी आपल्या कुटुंबीयांना दिले..त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहूनच इतरांना खूप छान वाटे.

गेली पाच- सात वर्षं तर नियमित ते कुठेना कुठे दिसत...आमची मुलगी गोड आजोबा म्हणूनच त्यांचे नाव घेत होती...
नियमित आहार..नियमीत विश्रांती ...आणि सतत चांगल्या विचारांचे बीज पेरणारे हे व्यक्तिमत्व पुणेकरांचे लाडके झाले होते...आता ते दिसणार नाहीत...
त्यांच्या जाण्याने सुवर्णकाळ पुणेकरांवर पांघलेला ऊबदार ज्येष्ठ धीरोदात्त व्यक्तित्व हरविल्याची हूरहूर आहे.. त्यांच्या जाण्याने पुण्याचे भूषण निखळले..त्यांची स्मृती जतन करावी ती मनोमनी..

सा-या माध्यमांनी त्यांच्यावर अखेरचा लेख लिहून त्यांची दखल अतिशय उत्तम घेतली...आता असे व्यक्तिमत्व होणे नाही..हिच खंत..आणि हळहळ देखील..त्यांना हिच माझी शब्दांजली..


- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: