Thursday, April 17, 2014

अमृतमय गीतांची स्मृती

ज्योत्स्ना भोळे..


मला वाटते हिंदी चित्रपटसृष्टीत कुंदनलाल सैगल साहेबांच्या काळातले गीत जसे शब्दांना वजन प्राप्त होऊन रसिकांच्या मनी विहरत रहात होते..त्याकाळी म्हणाजे केशवराव भोळे यांच्या,,केशवराव दाते..विष्णुपंत पागनीस यांच्या काळातही तेच मराठी मध्ये घडत असावे..
याचा पुनःप्रत्यय येण्याचे कारण म्हणजे काल बोला अमृत बोला..च्या निमित्ताने पुन्हा एकदा ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेली पदे आणि भावगीते ऐकली..
काही त्यांच्या अमृतवाणीतून आणि काही  त्यांची कन्या वंदना खांडेकर यांनी गुरूवारी १७ एप्रिलला योजलेल्या यशवंतराव चव्हाण नाटयगृहातल्या कार्यक्रमात..
ज्योत्स्ना भोळे जन्मशताब्दी निमित्ताने वर्षभर काही उपक्रम राबविले जाणार आहेत..त्यापैकीच हा एक होता.

अनुराधा कुबेर, अमृता कोलटकर, सानिका गोरेगावकर आणि वंदना खांडेकर यांच्यासह डॉ. कोल्हटकर दांपत्याला `तुझे नी माझे जुळेना `,हे युगल गीत सादर करण्यासाठी  इथे खास बोलावले गेले..त्यांनी चक्क पुन्हा एकदा ते म्हणावे असा रसिकांनी आग्रह केला...

राजीव परांजपे, राजू हसबनीस आणि चारुशीला गोसावी यांची हार्मानियम, तबला आणि व्हायोलीनची साथ मिळाल्याने गातातले सूर आणि तालातही मौज अधिक प्रेक्षकांपर्यत पोहोचली. भावगीतातील शब्द आणि त्यांच्या सूरांची..तानांची जागा बरहुकूम घेत पुन्हा एकदा त्या काळात या सा-यांनी नेऊन बसविले.

पण खरे पुनःप्रत्य मिळाला तो सुधीर मोघे यांनी दिग्दर्शित केलेल्या `अमृतवाणी `या लघुपटामुळे..
गोव्याच्या पार्श्वभूमिवर कोळेकरांच्या घराण्यात जन्मलेल्या दुर्गेला नवे नाव प्राप्त झाले ते सिनेमात...ज्योत्स्ना...आणि गाणे शिकविताना भाव सादर करताना त्या तन्मय झालेल्या केशवराव भोळे यांच्या पत्नी झाल्या आणि गाण्याला खरी प्रतिष्टा मिळाली..

मराठी संगीत रंगभूमीवर तोपर्यंत पुरुषच स्त्रीयांची भूमिका करीत होते..पण केशवराव भोेळे यांच्यामुळे त्या रंगभूमीवर आल्या आणि आंधळ्याची शाळा...कुलवधू..मराठी रंगभूमीवर अवतरली..
विजया मेहता, डॉ. श्रीराम लागू, वंदना खांडेकर, डॉ.वि.भा. देशपांडे, मंगेश तेंडूलकर, स्नेहल भाटकर, देवकी पंडीत, वीणा देव, प्रसाद सावकार, अशोक रानडे, बबनराव हळदणकर इत्यांदीच्या ज्योत्स्ना भोळे यांच्याबद्दलॉच्या आठवणीतून हा पट साकारला आहे..तेव्हाचा सारा काळच याचा अमृतमय सूर घेऊन येतो....आंधळ्याची शाळा..कुलवधू...यानंतरही इतर संगीत नाटकात भूमिका करुनही त्यांची खंत ती शास्त्रीय संगीतातली त्यांची मेहनत त्याआड दडून गेली..ही इथे व्यक्त झाली..

एकूणच ज्योत्स्ना भोळे नावाचे वलय केवढे होते आणि त्यांच्या `क्षण आला भाग्याचा`ने रसिक कसा मोहराला गेला हा सारे इथे पाहताना काही काळ त्यापर्वात आपण सारे जातो...हे सारे पहायला मिळाले..हे कलावंत अनुभवता आले हे सारे आपले परमभाग्यच आहे..



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552595276


कोल्हटकर दांम्पत्याने तुझे नी माझे जमेना हे गीत असे सादर केले
कोल्हटकर दांम्पत्याने `तुझे नी माझे जमेना `हे गीत असे सादर केले
ज्योत्स्ना नावाचे गाणे..कार्यक्रमात अमृता कोलटकर गात असताना..
ज्योत्स्ना नावाचे गाणे..कार्यक्रमात अमृता कोलटकर गात असताना..
अनुराधा कुबेर..ज्योत्स्ना भोळे यांचे गीत सादर करताना डोळ्यासमोर त्याच उभ्या करतात..तीच सूरातील आवर्तने..मोहकपणे समोवर येण्याचे कसब सारेच..
अनुराधा कुबेर..ज्योत्स्ना भोळे यांचे गीत सादर करताना डोळ्यासमोर त्याच उभ्या करतात..तीच सूरातील आवर्तने..मोहकपणे समेवर येण्याचे कसब सारेच..
निवेदक रविंद्र खरे गाण्याची पार्शभूमा सांगताना रसिकांना त्या काळाची आठवण करुन देतात..
निवेदक रविंद्र खरे गाण्याची पार्श्वभूमी सांगताना रसिकांना त्या काळाची आठवण करुन देतात..
आईची कांही गाणी वंदना खांजेकर यांनी सादर केली..तेव्हाचा हा क्षण
आईची कांही गाणी वंदना खांडेकर यांनी सादर केली..तेव्हाचा हा क्षण
राजीव परांजपे आणि राजू हसबननीस आणि चारुशीला गोसावी यांच्या साथीमुळे रंगत वाढत गेली
राजीव परांजपे आणि राजू हसबनीस आणि चारुशीला गोसावी यांच्या साथीमुळे रंगत वाढत गेली
विगंतून गायक साथीदारांचा एक चेहरा यातून समोर येतो
विंगेतून गायक साथीदारांचा एक चेहरा यातून समोर येतो

No comments: