Monday, May 26, 2014

नवा अध्याय लिहला जातोय...



भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणारा असा हा नवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने दिल्लीच्या तख्तावर विरजमान झाला आहे.
भारतासारख्या मोठ्या लोकशाही नांदत असलेल्या देशात विरोधात राहून सुमारे साठ वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंदुत्वाची कास धरणारा..धर्म, संस्कृती आणि संस्कार यांना मानणारा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या रुपाने सरकारात आला आहे,,हे फार मोठे महत्वाचे पाऊल देशातली जनता उचलत आहे.
गेली काही वर्ष घराणेशाहीचा शाप लागलेला राजकीय पक्ष देशावर आपली मालकी सांगत होता..आपल्याशिवाय देशाला तरणोपाय नाही असे दाखवित होता..पण भारताच्या विविध जातींच्या लोकांनी पहिल्यांदाचा त्यांचे हे आशावादी भविष्य साफ बदलून टाकले आणि गुजरातचे मुख्यमंत्री असलेले आणि विकासातून राज्याला आघाडीवर नेणारे नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन त्यांच्या भारतीय जनता पक्षाला पुर्ण बहुमत मतदानाच्या पेटितून दिले.

आता आज तुम्ही शेजारी निवडू शकत नाहीत  पण त्यांच्याशी सलोखा निर्माण करु शकता...हे कृत्तीतून दाखवून सार्क देशांच्या राष्ट्राध्यक्ष, पंतप्रदान यांना नरेंद्र मोदी सरकारने निमंत्रण दिले हिच मोठी घटना आहे.
सुमारे साडेचारहजार निमंत्रितांच्या समवेत मोदींचा शपथविधी पार पडणार आहे. कमीत कमी मंत्री आणि अधिकाधिक मंत्रालये एकत्र करण्याचा हा मानस घेऊन अवघे ४५ मंत्र्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या या सोहळ्यात ते पार पडला..

देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शाही सोहळ्यात शपथ घेतली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 
 'टीम मोदी'मधील २३ कॅबिनेट, १० राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि १२ राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि पेंशन, अणु ऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, इतर महत्त्वाची धोरणे आणि प्रकरणे तसेच वाटप न झालेल्या खात्यांचा प्रभार
केंद्रीय मंत्री 
1.     राजनाथ सिंग गृह व्यवहार
2.     सुषमा स्वराज विदेशी व्यवहार, परदेशस्थ भारतीय व्यवहार
3.     अरुण जेटली वित्त, कॉर्पोरेट अफेअर, संरक्षण
4.     एम. व्यंकय्या नायडू शहरी विकास, गृह आणि शहरी दारिद्रय निर्मूलन, संसदीय व्यवहार
5.     नितीन गडकरी रस्ते दळणवळण आणि महामार्ग, नौकावहन
6.     सदानंद गौडा रेल्वे
7.     उमा भारती जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनर्जिवीकरण
8.     नजमा हेपतूल्ला अल्पसंख्यक व्यवहार
9.     गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास, पंचायत राज, पेयजल आणि सॅनिटेशन
10. रामविलास पासवान ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण
11. कालराज मिश्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम
12. मनेका गांधी महिला आणि बालविकास
13. अनंत कुमार रसायन आणि खते
14. रवी शंकर प्रसाद संदेशवहन आणि माहिती तंत्रज्ञान, कायदा आणि न्याय.
15. अशोक गजापती राजू पुसापती नागरी उड्डाण
16. अनंत गीते जड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
17. श्रीमती हरसिम्रत कौर खाद्य प्रक्रिया उद्योग
18. नरेंद्र सिंग तोमर खाण, पोलाद, कामगार आणि रोजगार
19. ज्यूएल ओरम आदिवासी कल्याण
20. राधा मोहन सिंग कृषी
21. थावरचंद गहलोत सामाजिक न्याय आणि प्रोत्साहन
22. स्मृती झुबीन इराणी मानव संसाधन विकास
23. डॉ. हर्ष वर्धन आरोग्य आणि कुटुंब कल्याण
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
1.     जनरल व्ही. के. सिंग उत्तर-पूर्व भागाचा विकास, विदेशी व्यवहार, परदेशस्थ भारतीय व्यवहार
2.     राव इंद्रजित सिंग योजना, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, संरक्षण
3.     संतोष गंगवार-वस्त्रोद्योग, संसदीय व्यवहार, जलस्रोत, नद्या विकास आणि गंगा पुनर्जिवीकरण
4.     श्रीपाद नाईक सांस्कृतिक, पर्यटन
5.     धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
6.     सर्बानंद सोनोवाल कौशल्य विकास, उपक्रमशीलता, युवक कल्याण आणि क्रीडा
7.     प्रकाश जावडेकर माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि वातावरण बदल तसेच संसदीय व्यवहार
8.     पीयूष गोयल ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीनतम ऊर्जा
9.     डॉ. जितेंद्र सिंग विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि पेंशन, अणु ऊर्जा विभाग, अंतराळ 
10. निर्मला सितारामन् वाणिज्य उद्योग, वित्त, कॉर्पोरेट अफेअर
राज्यमंत्री
1.     जी. एम. सिध्देश्वरा नागरी उड्डाण
2.     मनोज सिन्हा रेल्वे
3.     निहाल चंद रसायने आणि खते
4.     उपेंद्र कुशवहा ग्रामीण विकास, पंचायती राज, पेयजल, सॅनिटेशन
5.     राधाकृष्णन पी. जड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग
6.     किरेन रिजीजू गृह व्यवहार
7.     कृष्णन पाल रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकावहन
8.     डॉ. संजीव बालियन कृषी आणि खाद्य प्रक्रिया उद्योग
9.     मनसुखभाई वसावा आदिवासी कल्याण
10. रावसाहेब दानवे ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण
11. विष्णू देव साई खाण, पोलाद, कामगार आणि रोजगार
12. सुदर्शन भगत सामाजिक न्याय आणि सबलीकरण


जनतेच्या आकांक्षा आणि अपेक्षांची पूर्ती हे मोदी सरकार करेल यावर विश्वास ठेऊया.
आपण सारे जागरुक नागरिक या दिवशी मोदींच्या मागे उभे राहून त्यांच्या कार्य़ाला शुभशकूनाचा टिळा लावू या...वंदे मातरम्...
जय हिंद..



सुभाष इनामदार ,पुणे

9552596276

No comments: