Friday, June 13, 2014

मनात रुंजी घालत गेला...रानफुले

मला वाटते तुझ्या निळाईमध्ये विरावे, ' 'एक रंगीत पक्षी येतो माझ्या अंगणात', 'दवभरल्या रानात ऊन मधाळ हसते ', 'जा दूर दूर मेघा ', 'गेलीस कुठे चिमणबाय' या सगळ्याच अगदी सोप्या शब्दांच्या आणि पाणी, पक्षी, डोंगर, पाऊस, झाडे ही निसर्गातली प्रतीके वापरून केलेल्या कविता..आपल्या रोजच्या जगण्याचे प्रतिबिंब त्यात होते. त्यामुळे लोकांना ते भावत होते. त्याला जोड होती आकर्षक नृत्याची. विदुला कुडेकर यांनी केलेल्या नृत्यदिग्दर्शनात अगदी साध्या, पण डौलदार हालचाली करणार्‍या मुलींनी शब्दातला अर्थ नेमकेपणाने प्रेक्षकांपर्यंत पोचवला.


साध्या शब्दातून पर्यावरणाची होणारी होनी मोठ्यांपासून अगदी लहानांपर्यत व्हावी..तिही कवीतेमधून ही किमया साधली ती गुरुवारी १२ जुनला पुणे मराठी ग्रंथालयातल्या रानफुले या कार्यक्रमात...

 'मला वाटते व्हावे फूल, मला वाटते व्हावे झाड' किंवा 'पानावरती थेंब वाजती, माती मधूनी कोंब फुटती. ' अशा साध्या सोप्या शब्दांतून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले जात होते. आणि ऐकणारे लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळेच त्यात अगदी रमून गेले होते. ठेक्याने कवितांना साथ देत होते. 


त्यातले शब्द तेही उत्तम संगीतकारांच्या संगीत संयोजनातून फुलत गेले..सोबत होता एक सुंदरसा आणि सहज नृत्याविष्कार...कुठेही आपण वेगळे करतोय याची जराही जाणीव नव्हती..ते सारे सहजी घडत गेले आणि  सभागृहातला सारा रसिक अगदी उस्फूर्तपणे टाळ्यांचा गजर करत ती ऐकत होता...त्यातली ती भाषा मनापर्यत घेत रसास्वाद टिपत होता..म्हणूनच तो वेगळा होता..


पर्यावरणाच्या र्‍हासामुळे जग किती बदलते आहे, याची चर्चा नेहमी होते. पण, यातील गंभीरता जाणवली नाहीये असेच वाटत राहते. या सगळ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा व लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना कळेल अशा सोप्या भाषेत पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा 'रानफुले'हा कार्यक्रम नुकताच सादर झाला. डॉ. संगीता बर्वे यांची संकल्पना, काव्य आणि दिग्दर्शन असलेला हा कार्यक्रम रंगला तो त्यातल्या अर्थगर्भ शब्दांमुळे, ते पोचवणार्‍या छोट्या कलाकरांमुळे आणि त्यांना साथ देणार्‍या नृत्यांगनांमुळे. वाघाने केलेली काळविटाची शिकार सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेली. तेही फक्त चेहर्‍यावरील हावभावांनी. 

आदित्य लेले, पूर्वा घोटकर, प्रांजली बर्वे व रेवा चित्राव या कलाकारांनी कविता अतिशय समजून, उमजून सादर केल्या. विशेषत: रेवाचा ठसका उल्लेखनीय होता. या सगळ्यांना रोहन भडसावळे याने तबला आणि प्रतीक भडसावळे याने सिंथसायझरवर छान साथ दिली. साध्या पण अतिशय आत्मीयतेने सादर केलेल्या कार्यक्रमाने पोचवले असे म्हणावे लागेल. 


प्रभाकर जोग, आनंद मोडक, सलील कुलकर्णी, राजीव बर्वे, ऋषिकेश रानडे या संगीतकारांनी चालींना ओघवती स्वरमयी ..गुणगुणावी अशी ..म्हणूनच हा कार्यक्रम हे निसर्गायन रुजवित ,,मनात रुंजी घालत गेला...

- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, June 12, 2014

`गाणारी वाट` प्रत्येक रसिकांनी अनुभवावी





सहा जूनला संध्याकाली साडेसात वाजता पुण्यातल्या भरत नाट्य मंदिराचा मखमली पडदा उघडला तो कविराज सुधीर मोघे यांच्या एकापेक्षा एक रचनांची गाणी उलगडत आणि इतिहास रचत गेला कवीने त्यांच्या आयुष्यात काय काय आणि कसे वेचले यांचे दाखले देत ....दिस येतील दिस जातील....हे खरे पण असा सर्व कलात फुलपाखरासारखा विहरणारा.. स्वच्छंदी जगणारा...एका कुठल्याही कोषात फार काळ न अडकणारा...सुधीर मोघे यांच्यासारखा कलंदर माणूस..गाणारी वाट मध्ये ..

मंजिरी मराठे यांनी सुधीरी मोघे यांच्या आयुष्यातली नेमकी वळणे टिपून त्यांच्या कवीतांचे टप्पे करुन त्याचे सुरेल सादरीकरण करुन गाणारी वाट...आखीव..रेखीव आणि ऐकत रहावी अशी सादर केली..खरं तर तो कविराज सुधीर मोघे यांच्या आयुष्याचा स्वरमयी पटच होता..

 हा कार्यक्रम फेब्रुवारी १३ला मुंबईत पहिल्यांदा केला गेला...तेव्हा सुधीर मोघे..आमि संगीतकार आनंद मोडक यांनी ते पाहिला आणि माझ्यावर कार्यक्रम करणे कठीण असतानाही माझ्या वाटचालीचा हा सुंदर आलेख आहे..असे ते स्वतः म्हटल्य़ाचे इथेही ध्वनिचित्रफितीतून स्पष्ट झाले...पण ते गेल्यानंतर काही दिवसांनी...

खरं तर हा कवी मनस्वी होता..मन मनास.. न उलगडणारा..तरीही आई-वडिलांच्या संस्काराच्या मुशीत..किलोस्करवाडी कारखान्याच्या परिसरात बालपण घालविलेला हा काळ...पण मोठेपणी एकदा आपल्या गावाचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेच्या दारात उभे राहून निदान गावाच्या स्टेशनचे..गावच्या त्या भूमिचे पुन्हा एकदा याची डोळा अनुभव घ्यावा यासाठी ताटकळत असलेल्या कवीला गावाचे अंधुकशेही दर्शन झाले नाही..ही खंतही इथे व्यक्त होते..

खरं तर प्रत्येकाच्या मानात आपल्या त्या गावाचे ..घराचे..दडलेले स्वप्न असते..ते पुन्हा एकदा अनुभवावे असे वाटते पण खर तर ते अशक्य असते...आपण फक्त वाटेवर चालत रहायाचे...मागच्या आठवणी मनात ठेवायच्या...पुढचे आयुष्य चालत रहायचे...

मंजिरी मराठे आणि विजय कदम या दुरदर्शनवर दिसणा-या उत्तम निवेदकांनी ही कविराजांची वाट रसिकांना अगदी लख्ख प्रकाशात उजळून दाखविली..त्यांच्या निवेदनातल्या ओघवत्या शब्दातून..प्रसंगी अनेकविध आठवणीतून..

सुधीर मोघे यांच्यावरच्या कार्यक्रमातच संगीतकार आनंद मोडक आणि पॉपगायक नंदू भेंडे यांनाही पुन्हा एकदा ताजे केले..त्यांच्या काही रचना आणि गाण्यातून..

आपले नशीब उजळीत पुण्यात आलेल्या कविराजांना पहिली संधी दिली ती आकाशवाणीने..राम फाटक यांनी..सुधीर फडके यांच्या आवाजात `सखी मंद झाल्या तराका आता तरी येशील का..`.शब्द होते सुधीर मोघे यांचे...तर संगीतकार राम फाटक...इथे ते सादर केले..ते चैतन्य कुलकर्णी यांनी..

काही मालिकाच्या शिर्षक गीतातून सुधीर मोघे रसिकांच्या मनात रुजत गेले..त्याची आठवण करुन दिली वर्षा भावे आणि प्रियंका बर्वे यांनी...

सुरेश भट यांची रचना..संगीत सुधीर मोघे..आणि ते सादर केले ते वर्षा भावे यांनी..`रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा`...`

शापीत` चित्रपटातल्या `दिस जातील..दिस येतील`..सादर केले केतन पटवर्धन आणि सायली महाडिक यांनी..

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,,सादर केले ते चेत्य कुलखर्णी यांनी..

सुधीर मोघे यांच्या जीवनातील घटना आणि प्रवासात असलेल्या विविध बदलांची निवेदनातून स्थानके दाखवित कार्यक्रम पुढे जात असताना..मधुनच `कविता पानोपानी`तून स्वतः सुधीर मोघे  साकार होत होते..त्यांच्या काही अप्रकाशीत अशा सीडींचाही उल्लेख झाला..ज्यातली आठ गाणी सुधीर मोघेंच्या आहेत..संगीतकार आहेत आनंद मोडक आणि ती गायली आहेत. मुकुंद फणसळकरांनी... त्यांची आठवण करुन देणारे गीतही इते सादर झाले.

`गुरु एक जगी त्राता.`..हे वर्षा भावे यांनी तर `दयाधना`याचा इतिहास सांगत त्यांची उजळणी केली ती चैतन्य कुलकर्णी यांनी..

`हे अपार हे असिम हे चिरंतन हे`..कै. आनंद मोडक यांनी संगीत दिलेल्या गीताला भैरवीच्या सूरांचे वलय प्राप्त झाले आहे...मात्र इथे वर्षा भावे यांनी कार्यकमातले शेवटचे गीत म्हणून सादर करुन कार्यक्रमाचा शेवट केला. 
हे सारे आमचेपर्य़ंत अतिशय सुरेल आवाजाच्या माध्यमातून पोहचविणारे आमचे मित्र प्रदिप माळी यांचाही उल्लेख इथे आवर्जुन करायला हवा..

सुरेल वाद्यमेळ..तेवढेच डोळ्यांना सुखावेल असे नेपथ्य..आणि मनाला पुन्हा अनुभवावे असे ओजस्वी निवेदन...खरोखरीच सुधीर मोघे यातून पुरेपुर उतरतात..दिसतात..आणि आपल्यातच भासतात....हिच खरी पावती या `गाणारी वाट` या `कलांगण` प्रस्तूत आणि मंजिरी मराठे यांनी निर्मित केलेल्या कार्यक्रमाची... कारण संकल्पना, संहिता आणि निवेदन सारेच मंजिरी मराठे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण तयार केले होते...

केवळ सुधीर मोघे न म्हणता..कविराज सुधीर मोघे जर समजावून घ्यायचे असतील तर ही रंगमंचीय गाणारी वाट प्रत्येक रसिकांनी अनुभवावी अशीच आहे..


गीत गायना ..गात रहावी..
प्रत्येकाच्या मनी रुजावी
कविराजांची महती गावी..
अशीच ही गाणारी वाट...


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276