Saturday, December 17, 2016

पं.प्रभाकर जोग यांची चार कलावंताना शिष्यवृत्ती



चार तरूण कलावंतांना स्वरगंध प्रतिष्ठान ची शिष्यवृत्ती
तुझ्यात कला आहे..तू नोकरी करू नकोस. असे सांगून १९४७-४८च्या सुमारास मला गाय़क बबनराव नावडीकरांनी ५० रुपये महिना पदवी प्राप्त करण्यासाठी मदत केली..ते ऋण समजून मी माझ्या वतीने चार कलावंताची निवड करून त्यांना पुढच्या कलेच्या प्रगतीसाठी आज शिष्यवृत्ती देत आहे..
ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांनी स्वरगंध प्रतिष्ठानच्या कलावंतांनी पुण्यात एका छोट्या समारंभात शिष्यवृत्ती प्रदान केली.

शनिवारी १७ डिसेंबरला पुण्याच्या उपाध्ये व्हायोलीन अॅकॅडमीच्या सभागृहात दौलत विठ्ठल खंडझोडे ( सातारा), राखी वसंत राणेकर ( बालघाट-मध्यप्रदेश) यांना गायनासाठी तर दिविजा योगेश जोशी (पुणे) प्रकाश सुखदेव चव्हाण (बडोदा) या दोघांना व्हायोलीनच्या पुढच्या शिक्षणासाठी एका वर्षासाठी सहा हजार रूपयांची शिष्यवृत्ती प्रभाकर जोग यांनीआपल्या स्वहस्ते देऊन त्यांना भविष्यासाठी आशीर्वाद दिला.

गेल्या जून मध्ये त्यानी स्वरंगंध प्रतिष्ठान हा ट्रस्ट स्थापन केला आणि त्यानंतर  कलावंतांकडून अर्ज मागवून त्यांची चाचणी घेऊन त्यांना सहा महिन्यात ही शिष्यवृत्ती देण्यात आलीअमेय जोग, शिरीष आणि अतुल उपाध्ये आणि स्वतः जोग यांनी ह्या कलावंतांची निवड केली.

आर्थिक परिस्थितीमुळे कलावंताला आपली कला पुढे अभ्यासता येत नाही..किंवा पुढे त्यात पारंगत होताना अडचणी येतात..हे स्वतःच्या अनुभवातून आपण पाहिले..म्हणूनच त्यांना पुढे शिकता यावे यांसाठी माझ्यापरिने हा प्रयत्न केला असल्याचे प्रभाकर जोग म्हणाले.

चार कलावंतांच्या वतीने राखी राणेकर यांनी आपण नक्की यांतून आपली कला पुढे प्रगतीकडे नेवू अशी खात्री याप्रसंगी दिली.
समारंभात उपस्थितांचे स्वागत करून शिरीषकुमार उपाध्ये यांनी जोग यांच्या कामाचा झपाटा वयाच्या ८४ व्या वर्षी किती आहे ते सांगितले.

तर विश्वस्तांपैकी सुरेश रानडे यांनी निवडीमागची पार्श्वभूमि सांगितली. आणि संगीतकार व्हायचे मनाशी ठरवून तात्यांनी केवळ संगीताशी बांधिलकी कशी ठेवली याविषयीचे विचार व्यक्त केले. संगीतकार असतानाही सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून त्यांनी हा शिष्यवृत्तीचा मार्ग निवडला, असे रानडे सांगतात.

विनोद बापट वकीलांनी शिष्यवृत्ती मिळालेल्या कलाकारांची ओळख करून दिली.



स्वरगंध प्रतिष्ठानचे विश्वस्त रविंद्र आपटे यांनी शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.




- Subhash Inamdar, Pune
subhashinbamdar@gmail.com
9552596276

No comments: