Saturday, October 8, 2016

कारकालाचा गोमटेश्वर Karkala Bahubali भाग तिसरा....
कारकालाचा ४२ फूट वाहुबली..एका दगडात कोरलेली भव्य मूर्ती


मुडबीद्रीपासून पासून ३० कि.मी. अंतरावरच्या कारकाला डोंगरावरची बाहुवलीची ४२ फूट उंच एका दगडात कोरलेली भव्य मूर्ती पाहण्यासाठी निघालो..


चढत्या मार्गाने डोंगराकडे जाणारा निमूळता रस्ता गाडी आम्हाला घाटातून वर घेऊन जात होती.आधीच हिरवाई त्यातच पावसाने सर्वत्र तयार केलेली सुंदर हिरवळ..रस्त्याच्या दोन्ही बादुला केवळ झाडी..एका बाजुला पहावे तर खाली वसलेले सुंदर गाव दिसत होते.
वर जाऊन पोहोचलो तर खरोखरच..तिथला परिसर आणि तिथले पावसाचे ओझरते दर्शनच आमचे स्वागत करीत होते.. 

पोहोचल्यावर सगळ्यांनीच डोंगरावरून दिसणारे ते नयनसनोहारी दृष्य टिपून घेतले लांबूनच दिसणारी ती गोमटेश्वराची भव्य मूर्ती आमच्यासमोर मोठी होत होत आता आमच्या समवेत भव्य होत जात होती..
भव्य अशा सुंदर साकारलेल्या पटांगणातून जातानाही तिथल्या शांततेत काय ती आमची बोलाचाल त्या निरव शांततेला तडा देत होती.

समोरच्या त्या भव्य पताकाने आमचे मन प्रसन्न आणि भारावून  सोडले. 
 
आत जातानाही  तिथल्या मंदिरातली तिर्थकारांची भव्य प्रतिमा आणि त्यासमोर उभारला गेलेला भव्य ध्वज-पताका वातावरणात भारून राहिला होता.

 तिथल्या उंचावरच्या मंदिराभोवतालच्या वातावरणातून शांततेचा संदेशच  सा-यांना देत  होता..
कारकला येथील डोंगरावर स्थापित केलेली बाहुबली श्री गोमटेश्वराची ४२ फुट उंचीची अखंड दगडात कोरलेली मूर्ती हि दुसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे. राजा वीरवर्माने आपले गुरु कारकाला जैन मठाधिपती ललितकीर्ती यांचे आज्ञेवरून ह्या अतिभव्य आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या मूर्तीची  १३ फेब्रु.१४३२ रोजी प्रतिष्टापणा केल्याचा संदर्भ आढळतो. या मुर्तीपुढील ब्रह्मदेव स्तंभ आणि त्यावरील यक्षगणाची कोरीव मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे.

 आम्ही सारे तिथला इतिहास जाणून घेण्यास तप्तर होतो..म्हणूनच की काय तिथल्या त्या मंदिराच्या आचार्याने अगदी आपुलकीने सारे वर्णन आपल्या शब्दातून करविले.


मंदिराच्या भोवतीने एकेका कोप-यात असलेल्या त्या भव्यतेचे दृष्य टिपण्यासाठी डोळे आणि मोबाईल सरसावले गेले..असा ठिकाणावर आपले सारे शरीर तिथलेच एक होऊन त्या परिसराचा आनंद साठविण्यासाठी सज्ज झालेले असते.

 आम्ही आलो ते थेट वरच्या गाडीच्या रस्त्याने..पण डोंगराच्या एका बाजुला या गावातून वर येण्यासाठी पाय-यांची उत्तम सोय आहे..अर्थात तिथे आम्हाला दिसली ती पाय-ायंवर चढून चरायला येणारी गुरे..पण त्यामुळे त्य़ा गावाचे दर्शन तरी घेता आले.


 कुंद अशा वातावरणातच आम्ही तिथून पुढच्या टपप्यावर जाण्यासाठी त्या सा-या स्मृती बरोवर घेऊन निघलो.


 
 
सभोवर अवतरलेले हिरवेगार भूतल आणि त्यामध्ये नक्षीकाम  केल्यासारखी ती सुंदरशी घरे..

अनुभवच्या या सहलीचा आनंद घेताना बरोबरचे व्यवस्थापनातले सारे जण पर्यटकांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या तहान-भुकेची सारी पथ्ये सतत पाळत होती..


म्हणून तर लहान वसमधूनही प्रवास होऊनही ते सारे आरामदायी वाटत होते. 
तर मंडळी चला निघूया पुढच्या टप्प्यावर...बाय 


- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, October 6, 2016

मुडबीद्रीचे एक हजार खांबाचे जैन मंदिर Thousand Pillar Temple


कुर्ग सहल
भाग दुसरा..


मुडबीद्री हे गाव तसे मंगलोर पासून ३५ कि. मि. अंतरावर. जैन धर्मियांची काशी म्हणून ते परिचित आहे. निसर्गाने वेढलेला हा सारा परिसर ऐन पावसाळ्यात आपल्या समृध्द सौंदर्यीने नटलेला दिसला.. पावसाने तिथे आपले रूप थोडे दाखविल्याने हिरवाई अगदी दाडून आलेली दिसली..


आम्ही ज्या चौकात थांबलो होतो..ते तीथल्या एस टीच्या स्थानकाचा परिसर होता..त्यामुळे आसपास सारी निवासाची ठिकाणे दिसत होती. वाहनांची गर्दी नव्हती पण सतत वाहनांची आणि माणसांची येजा दिसत होती.
पंचरत्नमधला आमचा पाहुणचार आटोपल्यावर दुपारी आम्ही सारे तीन अनुभवच्या गाड्या घेऊन निघालो ते थेट..शहाळ्याच्या मारूतीमंदिरावरून एकहजार खांबांच्या जैन मंदिराकडे

मुडवीद्रीचे एक हजार खांबाचे भव्य जैन मंदिर

दुपारी  थोड्या विश्रांतीनंतर आमच्या अनुभवी दुर्गेश आणि आभिषेक यांनी आमची गाडी   मुडबीद्रीच्या दुगंबर जैन मंदिराच्या समोर गाडी उभी केली. एका बोळातून समोर दिसणा-या या मंदिराच्या भव्यतेविषयी ऐकले होते..पण ऐकणे वेगळे आणि प्रत्यक्ष पाहणे निराळे..

भव्य वास्तुकलेचा नमुना असलेला असलेले तिन भागात उभे होते..मुख्य प्रवेश द्वार..


मधला भव्य स्तंभ 


 आणि मंदिराचा गाभारा.एकहजार दगडी खांबावर चितारलेल्या भव्य प्राचिन मंदिराच्या गाभा-यात प्रवेश केला.. शांत वातावरणाची पुरेपूर साक्ष देणारी ती मूर्ती..तिथली शांतता.आणि त्यापरसरातले भारावलेले वातावरण मनाला खूप निराळे भासत होते. 

 केवळ दिसत असलेली वास्तू पाहणे आणि त्यामागे  असलेली प्राचिन परंपरा याचे भान सतत डोक्यात येत होते.
ती अतिभव्य चित्रांतून साकारलेली मंदिराची पूरातन वास्तू आमच्या मनात भरून राहिली.


 कोरीव काम केलेला प्रत्येक दगड या प्राचिन परंपरेचे दर्शन घडवित होता..

सारे जण तिथल्या मंदिरातल्या भव्य वास्तूशिल्पात आपापले चित्र काढण्यासाठी मोबाईल- कॅमेरे सज्ज होत होते..
 त्रिभूवन तिलक चूडामणी असेही म्हटले जाते..मूडबूद्रीतले हे भव्य प्राचिन मंदिरात  सहा फूट भव्य इसी चंद्रनाथां स्वामींची मूर्ती आपले मन प्रसन्न करते..पंधराव्या शतकातले  हे मंदिर. समोर पंधरा मिटर उंच भव्य स्तंभ उभारलेला आहे. 


मंदिरातल्या प्रत्येक खांबावरील कोरीव कामात विजयनगरच्या खूणा असलेले नक्षीकाम आढळते.

अगदी प्रवेश केल्यापासून मंदिरातला प्रत्येक खांब तुम्हाला आपल्या कलाकुसरीने आकर्षीत करतो.


मंदिराच्या छतावर कोरलेली ही भव्य कलाकुसर मन प्रसन्न करते
 
असेच एकेक स्थळाचे दर्शन घेऊन पुढे जात राहू..


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276
Wednesday, October 5, 2016

कुर्ग परिसर पुन्हा पुन्हा `अनुभव`ण्यासारखा Hills of Karnataka भाग पहिला... 
टूर निघाली.....


दहा दिवसांची कुर्गची पावसाळी हवा अनुभवून परतलो तरी तिथला निसर्ग, तिथले नयनरम्य वातावरण आणि मूख्य म्हणजे कधी मुसळधार पाऊस ....पुढच्या क्षणाला केवळ पावसाळी ढगांची संगत..
 खरे तर पाऊस संपून आल्हाददायक थंडीचा अनुभव मिळेल या आशेने सारे गेलो ते २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरच्या अनुभवच्या हिल्स ऑफ कर्नाटका या सहलीसाठी..पण प्रत्यक्षात वर्षा सहलीचा पुरेपुर आनंद घेऊन खूपच तृप्ततेने निसर्गाच्या सान्नीध्यात राहून आल्याचा आनंद घेतला..

 मला तर कुर्ग खूप आवडले..तिथल्या म्हणजे मडीकेरीतल्या कॅपिटल व्हिलेज या २७ एकरात उभारलेल्या निसर्गाच्या कुशीत असलेल्या अतिशय छान..स्वच्छ अशा परिसरामुळे..खरोखर मनाली आणि मुन्नार सारखे वातावरण..तरीही कुठेही अधुनिकतेची संगत नाही..रस्ते आहेत..पण महाबळेश्वरसारखे.. बाजारपेठ आहे..पण त्यात व्यवसायिकता कमी...आणि तिथे चहाचे मळे..तर इथे कॉफिची लागवड आणि ओक व़क्षांच्या सावलित वाढलेले मिरिचे वेल..

अनुभवच्या तिन १३ आसनांच्या वाहनातील ते रोजचे फिरणे आता नाही याची खंत पुण्यात आल्यानंतर तर फार बोचते..
दुर्गेश विरकर आणि अभिषेक जमादार या अनुभवच्या आमची काळजी घेणा-या दोन मित्रांची आठवण सतत येते..हे सारे शब्दात मांडणे खूप कठीण पण तरीही तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे..याचे महत्वाचे कारण   कर्नाटकात फारसे कुणाला माहित नसलेली ही ठिकाणे.

 तिथला निसर्ग आणि तिथे मनमुराद भटकण्याचा छंद असलेल्या तुमच्यासारख्यांनी तो आपल्या नजरेतून अनुभवावा ही इच्छा.


पुण्यातून भुसावळ रेल्वेने पनवेलला गेलो..तिथे कुर्ल्यातून निघालेली मत्सगंधा एक्प्रेस आम्हाला मेंगलोरकडे घेऊन गेली..आम्ही उडुपीच्या आधी येणा-या मुल्की स्थानकावर उतरलो..तिथे अनुभवच्या मंडळांची ओळख पटली.
.तेव्हापासूनच आमचा `अनुभव`सह प्रवास करण्याचा सुखकारक संवादच घडला गेला. त्यांनी आमच्या सामानाचा ताबा घेतला आणि दीडतास उशीरा येणा-या आमच्यासारख्या सर्व कर्नाटकातले हे डोंगरी भाग पाहणा-या सहप्रवाशांना आपल्या मीनी गाडीतून २८ कि.मी. वरील मुडबीद्रीच्या पंचरत्नमध्ये वास्तव्यास ४५ मिनिटात दाखल केले.अनुभवचे तिथले कप्तान होते  दुर्गेश वीरकर आणि त्याच्या जोडीला अभिषेक जमादार...दुपारचे भोजन करून सहज बाहेर पडलो तर प्रवासात वाटेतल्या माणगावपासून बाहेर दिसत असलेला पाऊस आमच्यासह प्रवास करीत आमच्यासोबतच होता...( अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत..)


रोज प्रवास असला तरी पुरेशी विश्रांतीची काळजी अनुभव घेत होता..रोज सकाळी साडेसहाला चहाची आरोळी..नंतर साडेआठला वेगवेगळ्या चवीचे पदार्थांचा नाष्टा..आणि दुपारी दीड तो दोन दरम्यान गरम गरम भोजनाता आस्वाद ..दुपारी चहा त्याबरोबर काही ना काही तोंडात टाकायला..आणि रात्री साडेआट-नऊला रात्रीचे भोजन  .हे सारे देण्याचे तंत्र कुठेही बिघडले नाही..त्यामुळे एक झाले..कुणाचीही तब्येत बीघडली नाही. 

उलट घरी नसलेली शिस्त अंगी भिनली गेली..त्यातही  आग्रहाचे असे सारे जण होतेच..म्हणतात ना पहिले समाधान होते..ते उत्तम भोजनाने..
पोट समाधानी तर मन प्रसन्न...

अनुभवच्या अरूण भटांंसह सिरसीला रहाण्याचा अनुभव असल्याने..तीच परंपरा या सहलीच्या सर्व वास्तव्यात सांभाळली गेली.. इतकेच नव्ह..तर जरा नको तितके ऱूचकरी भोजनाचा आस्वाद आणि भरपूर विश्रांती.


.आणि जिथे नेले ते उत्तम निसर्गातले सौंदर्य...सारेच अनुभवने अनुभवण्यास दिले.
मला वाटते हे अनुभव कर्नाटकात जिथे नेतात..ते सारे इतर फारसे कुणी नेत असतील असे वाटत नाही..कुणाचा अपवादही असू शकेल..


 ही झाली प्राथमिक सुरवात..खरी सहल तर पुढे सुरू गोत आहे..तोपर्य़ंत वाट पहा.

(- क्रमशः)
   -सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276