Saturday, October 15, 2016

होसनाडू कोड्याडकची अन्नपूर्णश्वरी Hosanadu Kodyadka Annapoorneshwari

Hosanadu Kodyadka Annapoorneshwari मंदिर

भाग चवथा..hills of karnataka



कारकालाच्या गोमटेश्वराच्या प्रसन्न परिसरातून बाहेर पडताना निसर्गाच्या सान्निध्याची आस लागून राहिली होती..आमच्या अनुभवच्या तीन गाड्यांचा ताफा निघाला पुढच्या प्रवासाला..तो होसनाडूच्या अन्नपूर्णेश्वरीच्या मंदिराकडे..



चार एकरात पसरलेल्या विस्तिर्ण अशा या मंदिराच्या प्रवेशद्वारातून  जेव्हा आम्ही आत गेलो..तेव्हा तिथल्या सौंदर्याची ..तिथल्य़ा  भव्यतेची आणि विविधतेने नटलेल्या मूर्तींची साक्ष पटली.







आत प्रथमच दिसते ती संत पुरंदरदासांचा भव्य असा संतवचन सांगतानाचा पुतळा.














पुढे दिसते ते कोरीव..सुबक मंदिर..यात दिसते ती साईवावांची आशिर्वाद देतानाची संगमरवरी मूर्ती




थोड्याच अंतरावरची भव्य अशी मारूतीची ही प्रतिमा मान उंच करून पाहवी लागते.. ७१ फूट संजीवन हनुमंताची मूर्ती ...त्यातले सारे रूप श्रीरामाच्या भक्तीचा भुकेला असा तो हनुमान आपल्या भक्तांना असेच दर्शन घडवितो..











कुठे कुठे असा सुबक मूर्ती कोरीव लेण्यासारख्या देखण्या दिसत होत्या..तर कुठे पृथ्वी..सुंदर जलाशय..तर कुठे नयनरम्य अशा प्रकाश योजनेत साकारलेली बाग..सारेच देखणे आणि बघत रहावे असे..आणि हो  एक हत्ती आम्ही शिरताच नमस्कारासारखी आपली सोंड हलवित स्वागत करीत होता..




जयराम हेगडे यांनी या मंदिराची उभारणी केली..३ मे १९९६ ला तिथे पंचधातूंनी तयार केलेली ६२ इंचाची देवीची मूर्ती प्रतिष्ठापित केली. पेज्वरा मठ, उडुपीचे श्री विश्वतिर्थ स्वामीजी यांच्या हस्ते तिची विधीपूर्वक स्थापना करविली..

मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही सारे उत्सुक होतो..



मंदिराच्या परिसरातही फिरताना तिथल्या इतर छोट्या गाष्टींची ओळख पटते..आतल्या गाभा-यातल्या मूळ मूर्तीचे फोटो काढणे शक्य नव्हते तरीही परिसरात असलेल्या इतर भक्तिमय गोष्टींचे रूप टिपण्यासाठी माझा मोबाईल सिध्द होता..


इथला दरवर्षी होणारा कार उत्सव १ मेला साजरा होतो..तेव्हा सारा परिसर प्रकाशदिपांनी सजविला जातो..आत्ता पावसाच्या सरी कोसळूनही मंदिराचे गोपूर किती आकर्षक दिसते ते इथे समजेल.


संध्याकाळच्या प्रकाशात उजळून निघालेल्या या मंदिराचे पडसाद आपल्या मनावर कायम उमटतात..ते तिथल्या पवित्र असा वातावरणामुळे..
















इथे जाण्यासाठी मेंगलोर वरुनही जाता येते..हे अंसतर अवघे ३५ कि.मि. आहे. आम्ही कारकाला डोंगरावरून आलो..ते अंतर केवळ २२ कि.मी. होते..अवघ्या अर्ध्या तासात इथे आम्ही पोहोचलो.


आलेला प्रत्येक भक्त इथल्या वातावणाने भारावून जातो..तिथे अजुन थोडा वेळ घालविता आला उत्तम..हे त्याला पदोपदी जाणवते..पण दिलेल्या मुदतीत ठरलेल्या ठिकाणांना जाणे हे पर्यटक व्यवस्थापनाचे मूळ असल्याने अन्नपूर्णेश्वरीची ही मूर्ती मनात साठवून या परिसराला आम्ही विराम देत...गाडीकडे चालू लागतो..




https://www.youtube.com/watch?v=SVFv3H5aPG4




-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmsil.com
9552596276