Tuesday, June 20, 2017

शब्द आणि व्हायोलीन सूरात भिजविलेली साहिरची संध्याकाळ


हिंदी चित्रपटसृष्टीतले सोनेरी दिवस मानाने मिरविणारे गीतकार साहिर लुधियानवी. 
आपल्या असंख्य गीतातून आपल्या सर्वांच्या मनातील भावना कागदावर उमटविणारा हा गीतकार..कवी..गजलकार.. त्यांच्या रचनांवर आधारित अनेक गीतांना पुण्यातल्या संजय चांदेकर, अभय आगाशे, निलिमा राडकर आणि चारुशीला गोसावी यांनी आपल्या व्हायोलीनच्या सुरावटीतून सोमवारी पुणेकर रसिकांना खेचून भरत नाट्य मंदिराच्या आसनांवर दोन तास खिळवून ठेवले.

सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांना खालचे प्रेक्षागृह भरले म्हणून बाल्कनीत प्रवेश द्यावा लागला..एवढी दर्दी रसिकांची दाटी झालेली.. 

आनंद देशमुख यांनी साहिरच्या आठवणी..त्याचे बालपण, त्याचे कवीमन आणि त्यांच्या अनमोल असा रचनांचा आस्वाद शब्दातून बोलका केला..की ते ऐकत पुढचे गीत केव्हा येते याची उत्सुकता शिगेला पोहोचत होती..दोन तास कमी पडून पुढे अर्धातास वाढवूनही साहिर ऐकायचे बाकी राहिले..या गितांची महती इतकी होती आणि ती सादर करणारी ही खरं तर या क्षेत्रात धडपडणारी व्हायोलीन वादक..ती काही व्यावसायीक नव्हती..पण त्यांनी जी कसदार सुरेलया या गीतातून उमटून ती रसिकांच्या मनात असी काही उमटवीत ठेवली की प्रत्येक गाण्याला ..फिरसे..असा लटका शिक्का रसिकांनी मारला. अल्ला तेरो नाम ने सुरवात करत.. तोरा मन दर्पण कहलाए,  जिंदगी भर नही भुलेगी, आणि खास  गरजत बरसत सावन आयो रे,  

 मै जिंदगी का साथ निभाता चला गया,  तसवीर से बिगडी तकदीर बना ले.  मै पल दोपलका शायर , निगाहे मिलाने को जी जाहता है,  जो वादा किया है ,  रेशमी सलवार कुर्ता जाली का,  जिवन के सफर मे राहि.. अशा उडत्या आणि शास्त्रीय संगीतातल्या रागावर आधारित हिंदी गाण्यांची बरसात रसिकांवर होत होती..तेव्हा सभागृहात बसलेल्या शेकडो रसिकांनी तेच गाणे पुन्हा ऐकायला हवे होते.. 


त्यातही त्या गाण्याची पार्श्वभूमि सांगत जेव्हा साहिरच्या आय़ुष्याची कहाणी सांगत  शब्दातून  आनंद देशमुख रसाळपणे रसग्रर्हण करत राहिले तेव्हा तर ते गाणे कधी ऐकतो याची उत्सुकता येत राहिली..
ते बोलत राहिले , वेळ निघून गेला..गाणी शिल्लक राहिली मग अधिक वेळ घेऊन काही गाणी सादर झाली..आणि  चलो एक बार फिरसे ..हे कार्यक्रमाचे शिर्षक गीत कधी आले ते कळलेच नाही.  
अखेर पुन्हा साहिरच्या प्रेमापोटी आणि कलाकांराच्या नादमधुरतचेचा आस्वाद घेणारी  रसिक मंडळी अतृप्ततेच..अभी ना जावो छोडकर..ये दिल अभि भरा नही ....म्हणत सभागृहाबाहेर पडली.
मात्र रसिकप्रिया व्हिओलिना.. या संस्थेच्या मदतपेटीत आपला  वाटा टाकत असे कार्यक्रम तुम्हा अवश्य करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे कृतीने सांगत घरोघरी पांगली.
सभागृहात नजर टाकली तर ही रसिकमंडळीचे वय पन्नास ते साठ होते..त्यांची दाद देण्याची वत्ती होती..चांगलं ऐकण्याच त्यांना रस होता असे दिसले.


गेली बारा वर्ष संजय चांदेकर आणि अभय आगाशे पुढाकार घेऊन जागतिक व्हायोलिन दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम करताहेत..गेली दहा वर्ष निलिमा राडकर आणि चारुशीला गोसावी त्यांच्यात सहभागी  आहेत.

 आता हा चार व्हायोलिन वादकांचा एकमेळ झाला असून हे सारे पदरमोड करून हा उपक्रम राबवित आहेत. पुणेकर रसिक या कार्यक्रमाची वाट पहात असतात.


मनोज चांदेकर, विनित तिकोनकर, मनिष विप्रदास यांची तालवाद्यावरची संगत. की बोर्डवर अनुजा आगाशे, हर्षवर्धन चांदेकर यांची सफाई. आणि गिटारची प्रसाद जोशी यांची साथ.. कार्यक्रमाची रंगत वाढवित असतात.. सागर खांबे आणि त्यांचे सहकारी ध्वनीव्यस्थेने हे सारे सूर रसिकांच्या ह्दयापर्य़त पोहचवितात.
यंदा साहिरच्या गाण्यांच्या संगतीला आनंद देशमुख यांचे उत्तम रसग्रहण ऐकता आले..ते अधिक भावले.त्यातले संदर्भ अभ्यासू तर होतोच पण ती सांगण्याची शैलीही बेमिसाल अशी होती.


.शब्द , कवीता आणि व्हायोलीन सूरात भिजलेली ही संध्याकाळ पुन्हा ऐकायला जावेसे वाटणे यातच कार्यक्रमाची  य़शस्वीता आहे.

-सुभाष इनामदार, पुणे
9552596276

No comments: