Monday, July 31, 2017

संगीतातून साहित्याचे आदानप्रदान होऊन त्यातून कलाकृती बाहेर येते





कीर्ती शिलेदार यांचे अनुभवातून आलेले काव्यविषयक विचारदर्शन

मल्हार कवीता..या कार्यक्रमाची सुरवात रविवारी  पुण्यात साहित्या परिषदेच्या सभागृहात कीर्ती शिलेदार यांच्या सन्मानाने झाली.. रंगत संगतचे प्रमोद आडकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या जेष्ठ भगिनी दिप्ती किरण भोगलेही व्यासपीठावर होत्या..

तेव्हा रंगत संगत प्रतिष्ठानच्या वतीने केलेल्या सन्मानाचा मान राखत त्यांनी संगीत नाटक आणि पदांचे महत्व..यातून काव्य आणि साहित्य यांच्या आदानप्रदानातूनच उत्तम संगीत नाटक वा साहित्य बाहेर येते ते आपल्या मनोगतातून बोलून दाखविले..



संगीत नटालाही नायकातील पदांचा अर्थ उमजून मग त्यावर अभिनय करायचा असतो..नाटकातील रचना ही गेयच असावी लागते..आणि त्यातून अभिनयही करता यावा लागतो..



खाडीलकराच्या रचना थोड्या अवघड पण अर्थाने समऋध् होत्या आजही नाच्यसंगीतात खाडीलकरांच्या पदांची निवड केली जाते..असे सारे कीर्ती शिलेदार आपल्या विचारात स्पष्ट करतात..



त्याचा हा सारांश..



मी संगीत नाटकात काम करताना लक्षात येते की संगीत नाटकात जेवढे महत्व गद्याला आहे तेवढेच महत्व पदालाही  आहे..संगीत नाटकातली रचना ही गेय असावी लागते.. शब्दांचा अभ्यास करणे ही संगीत नटाची पहिली जबाबदारी असते.

संगीत नाटकात किर्लेास्कर मंडळींपासून हिच शिस्त नटांना आहे की काव्याचा भावार्थ आधी समजून घ्या मग नंतर  त्यावर तुम्हाला अभिनय करता येईल. त्यामुळे पदांचा अर्थ कळाल्याशिवाय गायचे नाही हा दंडक नाना आईंनी किर्लोस्कर मंडळींपासून पाळला..तिच शिकवण आमच्या पिढीपर्य़त आली.

आम्ही कवींनी केलेल्या कवीतांपासून जरासे लांब असू पण नाटकामध्ये नाटककारांनी केलेल्या कवीतेशी आमचा खूप जवळचा संबंध आहे. आमच्याकडे राम गणेश गडकरींसारखे काव्यप्रभू होते.  देवल आहेत, किर्लास्कर आहेत, खाडीलकर आहेत. बाळ कोल्हटकरांसारखा कवी, लेखक मराठी रंगभूमीवर आले्ला आहे.  कवीवर्य रा. ना. पवार, चिं.त्र्य़ं. खानोलकर, गंगाधर महांबरे हे सारे आमच्याकडे राहिलेले आहेत..त्यामुळे शब्दांची साधना हे लाकं किती करतात. हे आम्ही ते अगदी जवळून अनुभवलेले आहे.

खानोलकरांचे अनुभव तर फारच  ग्रेट. निळकंठबुवा अभ्यंकर आणि खानोलकर यांच्या चर्चा व्हायच्या त्यातला क्षणन क्षण कानात साठवून ठेवला आहे. आमचे बुवा शब्द गेय हवा यावर ठाम असत.. खानोलकर एकही शब्द इकडचा तिकडे करायला तयार नसत. येतो येतो सजणा सवतीचा वास तुझ्या वसना.. ही त्यांची शब्दरचना होती..बुवा म्हणाले वास म्हटल्यावर हे जरा विचित्र वाटते. हा शब्द बदला ना कवीराज.. बुवा म्हणाले. खानोलकर म्हणाले गंध चालेल..चालेल म्हटल्यावर ते पद झाले..येतो रे येतो सजणा..  सवतीचा गंध तुझ्या वसना..असे पद कायम झाले. नांदिच्या पदातला  कळा हा शब्द बदलालया मात्र खानोलकरांनी ठाम नकार दिला.. त्यांच्या मते.. कला सादर होत असताना नटाला आसंख्य कळा अनुभवाव्या लागतात तेव्हा तुमची कला पोहोचते. अशा चर्चेतून  आमचे जीवन समृध्द होऊन गेले..अभोगी नाटकाच्या तालमीमुळे.. अभोगी नाटकाने यश जरी दिले नसेल पण आमचे जीवन अगदी संपन्न केलेले आहे.
 संगीतातून साहित्याचे आदानप्रदान होणे आणि त्यातून कलाकृती बाहेर येते हे फार महत्वाचे आहे.
 मीही एक लहानपणा कवीता करण्याचा प्रयत्न केला होता..बालवय आणि बालबुध्दी याच्यारलीकडजे त्याला काही अर्थ नव्हता. महांबरे कवीता लिहीतात मीही कवीता लिहिते..अशातून ती चूक घडली.


नवे संगीत नाटक करताना शब्द बदलण्याचे धाडस कधी केले..म्हणून मी किंचीत कवी असू शकेन.. शाळेत आमच्या कवीच्या जाणीवा समृध्द देल्या त्या  विमलाताई गरवारेतल्या वा. भा. जोशी सरांनी. बालकवी आणि केशवसूत यांच्यावर शाळेत त्यांनी एक कार्क्रम शाळेत केला होता. त्यात मी . लता सहभागी झालो. त्यामुळे केशवसुतांचे काव्य अतिशय प्रिय झाले. अजुनही त्या सुंदर कार्यक्रमाची आठवण माझ्या मनामध्ये  तशीच्या तशी कोरली गेलेली आहे.















मल्हार शब्द असेलेले नामदेवांचे काव्य त्यांनी शेवटी गाऊन दाखविले..





-सुभाष इनामदार, पुणे
 subhashinamdar@gmail.com
9552596276