Monday, December 10, 2018

काळाच्या पुढे धावणारी दुबई






दुबईहून परतलो खरे पण तिथल्या आठवणीत घुटमळत आहे. देश छोटा असूनही स्मृती कामय ठेवणारा आहे. पिण्याचे पाणी नाही. तिथले लोक वीस टक्केच. पण आपला देश जगाच्या नकाशावर सतत दिसत रहावा यासाठी तिथल्या राजाची काळाच्या पुढे धावणारी दृष्टी

 

 

 

जगातले सर्वात मोठे हॉटेल . जगातली सर्वात मोठी इमारत. जगातली सर्वात्तम मशिद. जगातली सर्वात मोठी फ्रेम .

अगदी तिथे विमानतळावर उतरल्यापासून दुबईचे वैभव तुमच्या मनात भरते.


श्रीमंत देशांच्या यादीत दुबईचा वरचा क्रमांक लागतो. कारण सारी मालकी  राजाची. खास दुबईचे मूळ रहिवाशी कमी. त्या नागरिकांना महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण मोफत. शिक्षण संपले की नोकरी हमखास. लग्न झाले की बंगला तोही तुम्हाला हव्या त्या किमती गाडीसकट मुफ्त. तुम्हाला खर्च केवळ घरचे राशनपाणी भरण्याचे.  देश ऊभा करताना अतिशय डोळसपणे विकास केला.भविष्याचा विचार करून.




बाहेच्या कौणालाही नागरीकत्व मिळत नाही. व्यावसाय करायचे असेल तर तिथल्या कुणाला तरी ५१ टक्के भागिदारी द्यावी लागते, ही अट. आत्तापर्य़त इथे कुठलाच कर नव्हता. आता टक्के आकारला जातो. त्यामुळे वस्तु स्वस्त. आणि व्यवसाय करणेही सहज साध्य होते.

रस्ते सुसज्ज. मोठमोठे फ्लॉयओव्हर. लेनची शिस्त पाळण्याची सक्ती. वाहनचालक आणि पादचालकांसाठी कडक नियम. वाहतुकीवर सीसीटीव्हीची नजर. कुणेही कुठेही रस्ता ओलांडायचा नाही हा नियम. त्यामुळे वाहनांचा वेग किमान १०० कि.मि.. ताशी.


पाण्याची कमतरता ती समुद्राचे पाणी शुध्द करून पुरी केली. पाण्याची किंमत कळली आहे. त्यातले अशुध्द पाणी बांधकामासाठी तर केवळ शुध्द पाणी पिण्यासाठी. हे ठरविलेले.

भव्यच काय अतिभव्य इमारती. इमारती बांधताना भार कमी व्हावा यासाठी अनेक इमारती ताकदवान काचेच्या भितींनी सुसज्ज. चारी बाजुला काळ्या काचेचे आवरण असल्याने ती इमारत तापते कमी. त्यात उन्हाळ्यात ५२ पर्य़ंत तापमान त्यामुळे सर्वत्र वातानुकुलीत यंत्रणा कार्यक्षंम.

इथे केवळ टक्के तेल आहे. पण पाणी नसल्याने देशातली विज तेलाच्या वापरातून तयार होते. पण कुठेही खांब वाटेत दिसत नाहीत





वाळवंटी प्रदेश असूनही ठिबक मिंचन पध्दतीने पाण्याचा उपयोग करून रस्त्यांच्या दुतर्फा हिरवळ आणि बागा फुलविल्या आहेत. इतकेच नव्हे तर जगातली अतिभव्य बाग पाहण्यासाठी लाखो पर्य़टक मिरॅकल गार्डनला आवर्जुन भेट देतात.
वाळवंटाचा उहयोग करून पर्यटकांचे आकर्षण असणारी डेझर्ट सफारीची कल्पना इथे प्रत्यक्षात आणली. तिथे जाण्यासाठी भव्य अशा गाड्या आणि तसे तयार वाहनचालक मिळाले. वाळुच्या डोंगरावर तुम्ही सहजी आनंद घेऊ शकता.

दुबईचे महत्व पर्यटनक्षेत्रात खूप मोठे आहे. तिथे कामावर राहिल्यास भरपूर मोबदला मिळतो. त्यामुळे भारत, पाकिस्तान, बांगला देश,फिलिपिन्स, मलेशियासह सारेच लोक तुम्हाला इथे एकमेकांच्या संगतीने अनेक ठिकाणी कामकरताना सहजी आढळतात.
समुद्राचे पाणी हटवून जागा निर्माण केल्या. तिथे मोठमोठे प्रकल्प तयार करून त्या इमारती भरपूर किमतीने विकून पैसा उभा केला जात आहे.



जगातले अनेक देश इथे आपल्या व्यवसाय करण्य़ासाठी उत्सुक असतात हे लक्षात घेऊन त्यांच्या साठी देशाने `ग्लोबल व्हिलेज`ची संकल्पना राबविली असून ते प्रदर्शन पाहण्यासाठी पर्यटक तर जातातच पण शुक्रवार शनिवार आठवड्याची सुट्टी असणारे अनेक रहिवासी इथे आवर्जून येतात.

सौर उर्जेला प्रोत्साहन देऊन अनेक ठिकाणी नवे प्रकल्प आकार घेत आहेत. यात सौर उर्जेवर आणि लाइटवर चालणारी स्वयंचलीत वाहने, जपानच्या सहकार्याने लोहचुंबकीय पट्ट्यांवर धावणारी विना वाहक वाहने.. असे कितीतरी आगामी काळात दिसतील.
विकासाचे उत्तम सौंदर्य देशात साधले असून भव्यता आणि मोहकता यांचा प्रत्यय ठिकठिकाणी येतो.

इथे मात्र काही नियम कसोशिने पाळावे लागतात. स्थानिक नागरिकांचे. विशेषकरून बुरखाधारी महिलांचे. सरकारी इमारतींचे. पोलिस स्थानकांचेही. छायाचित्र घेणे टाळावे. मद्दय प्राशन करून रस्त्यावर दिसणेही योग्य नाही. तिथल्या वाहनचालकाशी जादा बोलणे टाळावे. तुम्ही वाहनचालकाला दिलेली वेळ कसोशिने पाळणे. पाच मिनिटेही उशीर झाला तर तो निघुन जाईल. भोजनाच्या वेळाही पाळाव्या लागतात. दिलेल्या वेळेचे महत्व खूप आहे



तिथे भारतीयांना मानतात. कारण सुमारे ५५ टक्के लोक भारतातून विविध व्यवसायासाठी शहरभर पसरले आहेत. आजही अनेक सरकारी नोकरीत भारतीय लोक आहेत. कारण दुबई बनविण्यात भारतीयांचे मोठे योगदान आहे, असे तेही मानतात.

आणि सर्वांत महत्वाचे इथ सर्व प्रकारचे भोजन मिळते. महाराष्ट्रीयन. गुजराथी, राजस्थानी, पंजाबी आणि आंतराराष्ट्रीय दर्जाचे.


स्वच्छता, टापटिप आणि सौंदर्य या तिन्ही बाबतीत दुबईला मानावे लागेल. तिथे जाणे हे अधिक सुरक्षित मानले जाते. एकूणच पर्यटनासाठी अतिशय आनंद देणारा. तुमची करमणूक करताना तुमची द्ष्टी बदलणारे दुबई एकदा अनुभवायला हवे.



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com




(आम्ही १२ ते १७ नोव्हेंबर, २०१८ ला दुबईलो गेलो होतो. प्रत्यक्ष दुबईभर हिंडताना अनुभवलीली ही व्यक्तिगत माहिती आहे. यात कुणाचे मत वेगळे असू शकेल. त्याचाही आदरच करतो.)





No comments: