Tuesday, November 27, 2018

शब्द स्वरातून उमगलेले..रमाकांत परांजपे




सर्व लोकप्रिय गायक ,वादकाना आपल्या व्हायोलिन साथीने मनमुराद आनंद देणारे रमाकांत परांजपे यांनी आपल्या साथीने सनई, सरोद, दिलरूबा,बासरी, सारंगी यांचा भास कसा घडवला याचे प्रत्यक्ष दर्शन पुणेकर रसिकांना घडविले.

नोव्हेंबर २४ला 'मुक्तसंध्या'मध्ये जेष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे यांचे व्हायोलिन वादन आणि गप्पा मनसोक्त ऐकता आल्या.संवादक आहेत अरुण नुलकर
यांनी त्यांना बोलते केले..














चतुरंग प्रतिष्ठान आयोजित एक संध्याकाळ एक कलाकार मध्ये रमाकांत परांजपे यांनी आपण आजोबा नरहरबुवा पाटणकर यांच्याकडून संगीताचे बाळकडू घेतले. आरंभी तबला मग पेटी आणि शालेय वयातच व्हायोलिनकडे कसे आकर्षित झालो याची आठवणही त्यांनी सांगितली.

त्यांच्याच शब्दा नेमके सांगायचे म्हणजे..





आरंभी गोपल गायन समाजात गायन. पेटी वडीलांनी शिकविली. रामभाऊ आठवले यांचेकडे तबल्याचे धडे गिरविले. नूमवि शाळेत स्नेहसंमेलनात एका मुलाचे व्हायोलिन पाहिले. ते आवडले. म्हणून वडिलांकडे हट्ट केला . मला हे शिकायचे आहे. घरात धुळखात पडलेले दुरुस्त करून भास्करराव चिरमुले यांचेकडे सारेगमपासून शिकलो. संगीताची पार्श्वभूमि   तयार असल्याने ते शिकायला वेळ लागला नाही.





व्हायेलिनमध्ये सूर शोधावा लागतो..खरे तर ही तारेवरची कसरत आहे. सूऱ शोधावा वागतो.  कुठे बोट ठोवायचे ते कानानी ठरवायचे आसते. किंचित जरी इतर ठिकाणी बोट गेले की सूर बेसूर होतो. त्यासाठी कानही तयार लागतात.

हे वाद्य आपल्याकडे अतिप्राचिन काळीही होते. अगदी रावणाच्या काळातही त्याला रावणहत्ता म्हणत असत. भरताच्या नाट्यशास्त्रात याचा उल्लेख आहे. सारी तांत्रीक माहितीही ते इथे सविस्तरपणे देत होते. ते इतर देशात फिरत युरोपमध्ये गेले. आणि आजचा आकर्षक आकार युरोपमध्ये  तयार झाला.  हे वाद्य आकाराने छान. सुटसुटीत.त्यात आवाजाचे माधुर्य आहे. हे विश्ववाद्य आहे असे समजतात. जगात त्यांच्या संगीतात वेगवेगळ्या प्रकारे या वाद्याचा उपयोग केला जातो. या वाद्याविशयी मला माझे गुरुजी शंकरराव बिनिवाले यांनी सारे काही शिकविले. ते इटलीला जावून पाश्चात्य संगीत शिकून आलेले होते.



कुठल्याही कार्यक्रात रंमाकांत परांजपे यांचा सूर योग्य समजला जातो. त्यांचा होकार मिळाल्यवरच इतर वादक त्याचे अनुकरण करतात. अरूण नूलकर यांनी परांजपे यांचेबाबत आपली टिपणी केली.

यावेळी परांजपे यांच्या स्वरलिपीचेही वेगळेपण रसिकांना उमगले.आणि व्हायोलिनवरच्या त्यांच्या अभ्यासाविषयीही शब्दातून आणि स्वरातून काही ऐकता आले.




केवळ गाणेच नाही तर गाण्यातली जोडाक्षरेही व्हायोलिनमधून आपण  हुबेहुब काढायचा कसा प्रयत्न कसा करतो ते पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा हे गीतरामायणातले गाणे वाजवून रसिकांना त्यांनी दाखवून दिले.


गेली ५८ वर्षे ते व्हायोलिन वादनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवून आहेत. आपण कसे घडलो..या वादनात कसा अभ्यास केला. याविषयी ते मनमोकळे बोलले. अरूण नूलकर यांनी प्रश्न विचारून त्यांच्या कलेचे यथोचित दर्शन घडविले.



यावेळी धाकटे बंधू विवेक परांजपे आणि मुलगा केदार परांजपे हेही खास हजर होते.
केदारने तर त्यांना काही गाण्यांसाठी मदत ही केली होती.

शब्द आणि स्वर यातून रंगलेली ही मुलाखत कायम लक्षात राहील. नेहमी वाद्यातून बोलणाऱ्या कलावंताला बोलते केले याबद्दल चतुरंग परिवाराचे आभार मानावे लागतील. 

शब्द स्वरातून उमगलेले..रमाकांत परांजपे
एक झलक या लिंकमध्ये ऐका







-सुभाष इनामदार, पुणे
Subhashinamdar@gmail. com