Wednesday, January 19, 2011

आम्ही खूप बिझी असतो



सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

ईमेलवर पाठवतो ना ई-ग्रीटिन्ज
कोणाच्या गाठीभेटी मात्र घेत नाही
पाठवतो ऑरकुट-फेसबुकवर कलर मेसेजेस
पण समोर आलो तर ओळखतसुद्धा नाही
सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही

ऑनलाइन चाटवर आम्ही सदैव हजर
ओह क्रॅप ! समोरासमोर मात्र बोलत नाही
बोलाचीच कढी नेटवर आणि बोलाचाच भात
भेट-गिफ्ट्स प्रत्यक्ष आम्ही कधी देत-घेत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही

पत्रा-बित्राचा जमाना गेला कधीच
पोस्ट खात्याला आम्ही त्रास देत नाही
फोनवर बोलायला आहे कुणाला वेळ
"न्यू ईअर विश"चा फोनही आम्ही करत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही

‘थर्टी फर्स्ट’ला मात्र रात्रभर आमची पार्टी
एखादं वर्षही अज्जिबात चुकवत नाही
वेळ काढून मुद्दाम एसेमेस् करतो ना फॉरवर्ड
सेंड टू ऑल झटपट, एकाचे नावही सुटत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही
एकदम म्हणजे
एकदमच बिझ्झी !


- अनुराधा म्हापणकर

1 comment:

  1. नव्या पिढीच्या वागणुकीवर उत्तम कॉमेंत्स आहेत.........पण मनात येतं की अरेच्चा आपणही असेच वागायला लाग्लोयात की...........काळ बदलला आणि आपणही......चांगले की वाईट?------Avinaash Bhondwe

    ReplyDelete