Thursday, September 17, 2020

मागे वळून पाहताना..




समाधानाचा पेला पुरता भरलाय !


सामान्य कुटुंबातील या मुलाला कितीतरी हातांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदतीचा टेकू दिला..

नादारीतून शिक्षण .. इतरांचे घरात आपलेपणाचा ओलावा लाभला..

आईची कडक शिस्त आणि तेवढीच प्रेमाची छाया.. वडिलांचे सौम्य पण बोलके पाठबळ..

साताऱ्यात बरीच कमी जास्त धडपड करून आपल्यापुरता मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला..

तरुणपणात धाडस केले..तडक पुणे गाठले..तरुण भारत आयुष्यात पहिले पाऊल कसून टाकण्यास उपयोगी पडला..

जिद्द आणि साधना.. दोन्ही होती..



भरत नाट्य मंदिरात नाटकाची नांदी सुरू झाली..भूमिका मिळत गेल्या..नाटकाची भाषा पचनी पडली..रंगभूमीचे आकर्षण वाढले..रात्री बाबूराव विजापुरे.. आणि तिकडे पुलाच्या पलिकडे पीडीएचे भालबा केळकर..यांच्या सोबत रात्री रुंगू लागल्या..





नाटकावर आपल्या भाषेत समीक्षण सुरू झाले..

कला आणि साहित्याची आवड जोपासली गेली..वि ना देवधर यांच्यामुळे पुण्याचा फेरफटका आणि अशा उद्याची..दोन सदरे तरुण भारत मधून लिहली.

साहित्यविशारद झालो..


प्रा.एन डी आपटे सरांमुळे पदवीधर मग एक्सप्रेसने दुसरी नोकरी मग विवाहबंधन!





आयुष्याला स्थिरता आली..विद्याधर गोखले यांचा आशीर्वाद मिळाला..पुणेरी रंगमंच, पुणे तिथे काय उणे..  लोकसत्ता, चतुरंग, सांज लोकसत्ता इथे सदरे, लेखन सुरू झाले..जेष्ठ पत्रकार प्रकाश कर्दळे यांच्या प्रोत्साहनामुळे बातमीदारी आणि लेखन सुधारले..







मात्र कारकुनी वृत्ती सोडून संपादन क्षेत्रात फ्लॅश पब्लिसिटीच्या चारुदत्त गोखले यांच्या दूरदर्शीपणाने  pune flash. com साप्ताहिक  आणि फ्लॅश  म्युझिक.. मध्ये कारकीर्द बनविली..


एका बाजूला नोकरी आणि दुसरीकडे सांस्कृतिक क्षेत्रातली मुशाफिरी केली..कलावंत जवळ आले..अंतरंग समजू आले..


वयाच्या ४५ व्या वर्षी सकाळ सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्राची इ आवृत्ती सुरू करण्याची संधी आली.. त्याचा वृत्त संपादक झालो..बातमी, सदर लेखन आणि चलत चित्रणाचा अनुभव गाठीशी पडला..अखेरीस त्यांना नकोसा झालो.. राजीनामा देवून बाहेर पडलो..

मंदार जोगळेकर, अरुण खोरे, सुनील मेहता..यांच्याकडे काही लुडबुड केली. 

www.subhashinamdar.blogspot.com यातून लेखन सुरू ठेवले.. 

http://culturalpune.blogspot.com/

यातून सातत्याने घटनांची नोंद सुरू ठेवली..

सोशल मीडिया मधून face book  सतत नोंद करीत गेलो.. 






संगीत, साहित्य आणि नाटकाने भरभरून समाधान दिले..माणसे पहायला ओळखायला शिकविले..



जमेल तशी मदत करावी..मित्र जोडावेत.त्यांचा सहवास घ्यावा.. फिरण्याचा छंद जपून ठेवलाय.. मनात बेचैनीचा विचार आला तर मागचे सारे आठवून त्यातून हुरूप आणतो..





आपल्या क्षमतेपेक्षाही खूप काही मिळाले.. आता हेच समाधान टिकवायला हवं!

रक्ताची आणि जोडलेली नाती टिकवून ठेवायला हवीत..समाजाने भरभरून दिले..ते समाजाला परत करायला हवे..तेवढी शक्ती आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे एवढीच प्रार्थना!

तुमचा आशीर्वाद आणि सहवास लाभावा हीच मनोकामना!




आपलाच,

सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

6 comments:

  1. छान लिहिलं आहेस. भरत मधला सुभाष इनामदार मला चांगला आठवतोय.

    ReplyDelete
    Replies
    1. हो, खरोखरच भरतने मला रंगमंच आणि नाटक शिकविले..राजेश दामले..तुही तिथेच भेटलास..छान होते ते दिवस

      Delete
  2. सुभाष.. मनःपूर्वक लिहिलं आहेस. उमेदवारीच्या काळातला सुभाष मी पाहिला आहे. तुझी माझी मैत्री त्यामुळेच झाली. निरपेक्ष व निर्मळ मैत्री टिकून राहील. - सुभाष नाईक, पुणे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपली मैत्री ही कुठलीही अपेक्षा नसल्यानेच कायम कोरली गेली आहे..ती तशीच रहाणार..

      Delete
  3. अफलातून प्रवास आयुष्याचा आलेख सतत उंचावत ठेवत समाधानाची पायरी न सोडता कसरत करत आपण गाठलेली उंची वाखाणण्याजोगी आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹 प्रदीप रत्नपारखे

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्यासारखे मित्र, कलावंत आणि स्नेही जोडले गेले..ह्याच भांडवलावर माझा हा प्रवास झाला..आभारी आहे..

      Delete