Sunday, May 16, 2010

सिटी प्राईड- आर डेक्कन पुण्यात सुरू






ग्लोबल मराठी साठी तयार केलेली ही व्हिडीओ स्टोरी
------------------------------------------------------------------
दिल्ली, बेंगलोर, मुंबई नंतर पुण्यात ५५ सिटचे आरामदायी चित्रपटगृह चाफळकर ब्रदर्सच्या सिटी प्राईड ग्रुपमध्ये अक्षयतृतीया- रविवार १६ मे पासून चित्रपटरसिकांसीठी सामिल होत आहे. पूर्वीच्या डेक्कन चित्रपटगृहाच्या जागेत झालेल्या राणेंच्या माॅल मध्ये शेवटच्या मजल्यावर हे सर्वसुविधांनी युक्त असे पुण्यातले अशा पध्दतीचे हे पहिले चित्रपटगृह रसिकांना आकर्षित करेल.

डेक्कन भागातली नटराज आणि डेक्कन दोन्ही चित्रपटगृहे गेली कांही वर्षे बंद होती. सिटी प्राईडच्या या दोन स्क्रिनच्या चित्रपटगृहांनी ती कसर भरून निघणार आहे.याबाबात माहिती देताना चाफळकर ब्रद्र्सचे भागीदार अरविंद चाफळकरांनी 'ग्लोबल मराठी'ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये या चित्रपटगृहांची सविस्तर माहिती दिली.

'अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सिटी प्राईडच्या वतीने दोन स्क्रिनचे हे चित्रपटदालन आम्ही पुणेकरांच्या सेवेत दाखल करीत आहोत. एक १८५ आसन क्षमतेचे नेहमीच्या सुविधांनी सज्ज असे असेल.यातल्या खु्र्च्या पुशबॅक पध्दतीच्या असून तर इतर सोईसुविधा अधुनिक पध्दतीच्या आहेत.


दुसरे केवळ ५५ आरामदायी आसनक्षमतेचे चित्रपटगृह आम्ही सुरू करूत आहोत. यातली प्रत्येक खुर्ची विमानामध्ये जशी झोपून, रेलून बसण्याची सोय असते तशा खास आरामदायी खु्र्च्या बनवून घेतल्या आहेत.जमीनीवर कार्पेट, बाहेर बसायला आरामदायी सोफा,पोर्चमध्ये खाण्यासाठीची सोय सारेच यात अद्दयावत तयार केले आहे. वेगवेगळे क्लब, रोटरी सारख्या संस्था आणि जे जास्त पैसे देवून अधुनिक सुविधांचा लाभ घेऊ इच्छितात त्यांचेसाठी या रिक्लायनर मध्ये चित्रपट पाहणे ही आनंदाची पर्वणी ठरावी अशी सोय करण्यात आली आहे. '

या दोन स्क्रीनच्या उभारणीसाठी अदाजे दोन कोटी रूपये खर्च आला असून मुंबईच्या झवेरी अणि झवेरी या कंपनीने अंर्तगत सजावटीचा भार उचलला आहे. दुपारच्या साडेबाराच्या शोला २०० तर संध्याकाळ आणि रात्रीच्या शोसाठी या चित्रपटगृहाचा दर ३५० ते ४०० रूपये राहणार असल्याचे चाफळकरांनी सांगीतले.मात्र पहिले काही दिवस नवा दर आकारला जाणार नसल्याचे पुष्कर चाफळकरांनी स्पष्ट केले.


मंगला, सिटी प्राईड बिबवेवाडी, सिटी प्राईड कोथरूड नंतरचे हे डेक्कनवरचे चित्रपटगृह असेल. ब्लाॅग बुकींगसाठी आणि व्यक्तीगतसुध्दा अशा चित्रपटगृहाला नक्की प्रतिसाद मिळेल
असा विश्वास चाफळकरांनी व्यक्त केला.

प्रकाश चाफळकर सिव्हिल इंजिनियर असल्याने त्यांच्या स्ल्ल्यानुसारच राणे यांनी चित्रपटगृहाच्या बांधणीचा ढाचा बनविला आहे. अर्थात आम्ही ती जागा भाडयाने घेतली असून आरामदायी अनुभव घेउन चित्रपट पाहणे हा आनंद इथे नक्की मिळेल याची खात्री चाफळकरांनी दिली.

मल्टीपेक्समध्ये देशात चाफळकर ब्रदर्स हे एकमेव मराठी नाव आहे. लवकरच सिंहगड रोडच्या अभिरूचीतल्या जागेवर तयार होत असलेल्या माॅल मध्ये सात स्क्रिनचे तर कांही काळनंतर
कोंढव्यातही सिटी प्राईडचे नाव झळकणार आहे.






सुभाष इनामदार, पुणे

subhash.inamdar@myvishwa.com
www.globalmarathi.org
9552596276



9552596276

No comments: