ज्येष्ठ कवीआणि साहित्यिक
गंगाधर महाम्बरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने भरत नाट्य मंदिरातील रसिक कार्यक्रमाची
आतुरतेने वाट पहात होते.. कारण इथे या कलावंतातला माणूस.. आणि त्या माणसातली प्रतिभेची
साक्ष पटविणारे कार्यक्रम सादर होणार होते..अखेरिस पुणे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. नितिन
करमळकर आले आणि पदडा उघडला गेला. व्यासपिठावर होते प्रा.डॉ. शैलजा पाटील.ज्यांनी गंगाधर
महाम्बरे यांच्या साहित्यातील जीवनदृष्टी व लेखन शैली या विषयीचे पुस्तक लिहले..स्नेहवर्दन
प्रकाशनाच्या संचालिका प्रा. स्नेहल तावरे,
अरूंधती महाम्बरे , कुलगुरू, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर तसेच मराठी
रंगभूमिवरील मालवणी नाटकांची समीक्षा..हे पुस्तक लिहिणारे डॉ. बाळकृष्ण लळित.
मालवणीत आपले बालपण
घालविलेले महाम्बरे यांनी आपल्या साध्या, सोप्या शेलीतून गीते लिहली..ती आजही तेवढीच
लोकप्रिय आहेत..साहित्यविश्वातही त्यांचे योगदान मोलाचे आहे..त्यांची १०२ पुस्तके प्रकाशित
झाली असून त्यांच्या शेलीवरही एक पुस्तक प्रकाशित होत आहे.
कुलगुरूंच्या हस्ते
दोन्ही पुस्तके इथे प्रकाशित झाली
मुळातले कणकवलीचे असणारे
डॉ. करमळकर यांनी मुळातले कोकणातले असणारे महाम्बरे साहित्याचा जो प्रवास आहे तो दिपविणारा
आहे, असे सांगून कोकणातला माणूस दिसायला काळा
सावळा..पण तो आतून बाहेरून गोड असतो..तसे महाम्बरे होते..त्यांची भावगीतेही प्रसिध्द
आहेत. खवचट माणूस हा विशेष करून रत्नागिरी भागातला आसतो. पु लं.चा अंतू बरवा..हे एक
उदाहरण आहे. आपल्याला मिळालेल्या पुंजींवर महाम्बरे सुरवातील मुंबईत नंतर पुण्यात आले
आणि आपले साहित्य निर्माण केले.याचा मला अभिमान आहे.
गंगाराम गवाणकर यांनी
केवळ गीतकार म्हणून नव्हे, कलावंत म्हणून नव्हे..महाम्बरे यांच्यातला माणूस पुस्तकातून
शैलजा पाटील यांनी कोरून काढलेला आहे, असे अभिमानाने व्यक्त केले. कालवंत कितीही मोठा असू दे पण त्याच्यातला माणूस
असायला हवा.. तसे महाम्बरे होते..ते या पुस्तकातून स्पष्ट होते. गवाणकरांनी त्या माणूसपणावर
भर देऊन. मालवणातल्या या गवाणकराला या पुण्याने कसे मोठे केले ते आपल्या भाषणात छान
रंगवून सांगितले.
संधीकाली
या अशा..महाम्बरेंची गीते ऐकली
उत्तरार्धात किरणांच्या
हळव्या तारा छे़डून प्रतिभा इनामदार आणि संजीव
मेहंदळे यांनी ग्रंथपाल म्हणून काम करताना पुण्याच्या सांस्कृतिक साहित्यिक भूमित आपला
ठसा कसा उमटवित गेले ते त्यांनी रचलेल्या अनेकविध
भावगीतातून सूर, ताल आणि लयीच्या या महाजालातून रसिकांच्या मनात गंगाधर महाम्बरे पुढचे दोन साठवून ठेवले.
गंगाधर मनमोहन महाम्बरे..३१
जानेवारी १९३१ ला म्हापशात जन्मलेले आणि मालवणच्या घरात मोठे झालेल्या या आतुन बाहेरून
साधेपणा मिरविणारे साहित्यिक कसे होते..ते विनया देसाई यांच्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण
निवेदनातून गीतागणीत उमजत गेले.
पूर्वेच्या देवा तुझे
सूर्यदेव नाव..या रामदास कामत यांनी गायलेल्या गीताने महाम्बरे हे नाव सर्वपरिचित झाले.
आज प्रतिभा इनामदार यांच्या भावनामय स्वर आविष्कारातून आणि संजीव मेहेदळे यांच्या सुरेल
खड्या आवाजातून एकेक गीत रसिकांच्या मनावर कशी अधिराज्य करत होते ते आजही टाळ्यांच्या
प्रतिसादातून सिध्द होत गेले.
गंगाधर महांबरें यांच्या
जयंती निमित्त त्यांच्याच गीतांची ही मैफल ऐकताना मन भारावून जाते. खरं तर गीत सुचणे..ते
योग्य संगीतकाराच्या आणि गायकाच्या आवाजातून रसिकांच्या मनापर्यंत पोहोचणे ही सारी
परमेश्वराची कृपा असते..ती त्यांना साध्य झाली होती..
त्यांच्या सुरेल अशी
गीतांना श्रीनिवास खळे, य़शवंत देव, विणा चिटको, ह्दयनाथ मंगेशकर या संगीतकारांच्या
चालीतून आशा भोसले, रामदास कामत, लता मंगेशकर यांच्या आवाजातून रसिकांपर्यंत पोहोचणारे
महाम्बरे यांचे गीत जेव्हा गाणे म्हणून ऐकण्याची
वेळ येते तेव्हा या भरतच्या रंगमंचावर प्रतिभा इनामदार आणि संजीव मेहंदळे यांच्यावर ती मोठी जबाबदारी येते..ते गीत प्रामाणिक मेहनतीमधून
उतमत अशा मोजक्या साथीदारांच्या उत्तम मेळामधून ते आपले समजून गायचे..
पण या दोनही गायकांनी
ही सुरेल गीते..तेवढ्याच सुंदर रितीने रसिकांच्या मनापर्यत भिडविली..
मग ते निळा सावळा नाथ असूदे की कंठातच रूतल्या ताना
, रसिका तुझ्याच साठा,संधीकाली या अशा , वायुसंगे येई श्रावणा यांसारखी अवीट गोडीची
गाणी असूदेत.. प्रतिभा ताईंनी ते एकात्मतेने गायले.
वाटे भल्या पहाटे यावे
तुझ्या महाली काय..किंवा देवा घरच्या फुलातले सुमधूर सूर असोत.. संजीवने ते तेवढ्याच
तन्मयतेने सादर केले.
गाताना गायकांना दडपण
येते पण उत्तम साथीदार संगत करायला असतील तर स्वर लयीतल्या चुका सहजपणे रसिकांच्यापर्यंत
न पोहोचता ते गाणे तेवढ्याच सुरेलपणे पोहोचते.
अनय इनामदार (हार्मोनियम) , केदार परांजपे (सिंथेसायझर) , राजेंद्र
साळुंके (ताल वाद्य) आणि उत्तम तबला वादनाने ठेका धरायला लावणारे प्रसाद जोशी यांची
साथ लाभल्याने एक तरल असा भावनामय कार्यक्रम १ फेब्रुवारीला पुण्यातल्या भरतच्या रंगमंचावरून
आम्हा आस्वादकांना मोहवून गेला.
गंगाधर महाम्बरे हे
गीतकार आणि साहित्यिक नाव या निमित्ताने पुन्हा झळकू लागले आणि पुढची येणारी पिढी ते
नाव वारंवार घेत राहिल असा विश्वास दृढ झाला.
-सुभाष इनामदार, पुणे
9552596276