Friday, August 20, 2010
वेबकॅमवर आले संगीताचे वर्ग
काळ बदलला हेच खरे. नाती बदलली. संदेश यंत्रणा बदलली. संपर्क साधनात नवे तंत्र विकसित झाले. शिक्षणाची पध्दत बदलली. पाठ्यपुस्तके बदलली. संस्कृतिशी जोडलेली नाळ मात्र कायम राहिली. प्रचार आणि प्रसार माध्यमांच्या बदलत्या परिस्थितीत. इंटरनेटचा वापर वाढला. हाताने लिहण्याचे कामही कमी झाले. आता संगणकावरची बटने संदेशवाहक बनले.
या इंटरनेटच्या सुविधेमुळे आणि त्यांतल्या webCam च्या वाढत्या प्रचाराचे तंत्र उपलब्ध झाले.
या तंत्राचा फायदा घेऊन परंपरेने चालत अलेली गुरू-शिष्याची ही नाती बदलली. विद्या मिळविण्यासाठी गुरुच्या घरी राहूनच ती प्राप्त करता येत होती. पण पुढे गुरू शिष्याकडे शिकवणीसाठी जावू लागला. हूळूहळू गुरूने चांगली जागा घेऊन शिक्षणाच्या दालनाचे व्यवसायात रुपांतर केले. क्लास आले. आता त्याच्यापुढे जावून. घरी बसून शिक्षणा घेता येईल अशी सोय झाली. वाहिन्यांनी क्लासरुम सुरु केले. आता तर कुठे न जाता On Line शिक्षणाचा मार्ग मोकळा झालाय.
आता नमन पुरे. तर विषय होता शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत शिक्षण शिकविण्याचा मार्ग ON LINE च्या जाळ्यातून स्विकारला गेला. आज अनेक गुरू आपल्या विद्दयार्थ्यींना या पध्दतीने शिक्षण देतानाची संख्या वाढत चालली आहे.
on line education and online payment
आमचे तरूण मित्र . राहूल देशपांडे यांच्या नविन कट्यारमध्ये सदाशिवाची भूमिका करणारे कलावंत महेश काळे यांनी आपला उच्च शिक्षणात पदव्यूत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून अमेरिकेत नोकरी न करता संगीत शिक्षणाचा प्रचार करायचे धोरण आखले. आज त्यांचेकडे १००-१५० मुले ( काही आपल्या भारतीय घरातली तर काही परदेशातलीही) North Indian Classical Music शिकण्यासाठी येत आहेत.
जेव्हा ते अमेरिकेत असतात तेव्हा ते आपल्या San Francisco Bay Area तल्या घरात गुरू-शिष्य त-हेने म्हणजे समोर बसून शिकवितात. पण कुठे मैफलीला किंवा कार्यक्रमाला गेले तर बरोबरच्या Laptop ला इंटरनेट क्नेक्ट केला की WebCam वरून मुलांना अगदी घरी बसून शिकवावे असे शिकवीताना मी पाहिले आहे.
संगीत शिकण्याची इच्छा असणारे हे तरूण त्यांच्या अमेरिकेतल्या घरी ठरलेल्या वेळी जमतात. मात्र काळे त्यांचा क्लास या इंटरनेटच्या माध्यमातून वेळेवर घेतात. ती वेळ आणि तो दिवस ते वाया जावू देत नाहीत.
कट्यारच्या तालमींच्या आणि प्रयोगांचे वेली ते भारतात होते तेव्हाही विद्यार्थ्यांची वेळ आणि दिवस चुकला नाही.
संगीताच्या प्रसाराला या अधुनिक साधनांचा उपयोग करून केवळ एका विभागापुरती म्रर्यादित असणारी साधना आता जगभर यामुळेच तर विखुरली गेली आहे. भारतीय कलांचा, त्यां पारंपारिक बंदीशीचा प्रसार आता अंतराच्या अडचणी ओलांडून केव्हाच देशांतराला गेल्या आहेत.
कला प्रांतात होणारा हा बदल स्वागतार्ह तर आहेच पण आता भारतीय भाषा, संस्कृतीची दालने तुम्हाला जगात कुठेही उघडी आहेत. तुमची केवळ इच्छा हवी, इतकेच.
काळ बदलला. तंत्र बदलेल्याने विकासाची दिशा तेवढीच रुंदावते हेच यातून सिध्द होते. नाही काय?
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
बिस्मिल्ला खाँ यांच्या स्मृतींना शतशः वंदन.
शहनाईच्या त्या सूरांवटींनी मन मोहरून गेले. त्या शहनाईच्या बादशाहला भारतरत्न बिस्मिल्ला खाँ यांच्या स्मृतींना शतशः वंदन.
शुभकार्यात वापरलली जाणारी सनई मनामनात साठवून ठेवण्याचे महान कार्य करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता.
बज गई शहनाई
शादी अब होनेवाली है
असा संदेशा पोचविणारी ही शहनाई. बिसमिल्ला खाँ यांनी पारंपारिक शास्त्रीय मैफलीच्या मखमली गालीचावर नेऊन बसविले.
मराठी कोशात त्यांची
बिस्मिल्ला खाँ (जीवनकाल: मार्च २१, १९१६:डुम्राओन, बिहार, भारत - ऑगस्ट २१, २००६:वाराणसी) हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते.
त्यांच्याबद्दल एवढीच माहिती उपलब्ध आहे.
ती देण्यापेक्षा या महान कलाकाराला स्मरताना त्यांना केलेल्या कलासेवेला मुजरा करायचा असेल आणि ज्यांना कुणाला त्यांची शहनाई ऐकायची असेल तर यूट्यूब वर सारा खजाना पडला आहे.
ती सूरावट साठवत आठवत रहा ते धुंद स्वर. आजही रेडिओवर जेव्हा प्रभात होते तेव्हा तेच सूर तुम्हाला काळाचे भान देतात.
मंद सूरावटींचे मारपिस फिरवित तुम्हाला जागे करतात.
जगात सर्वत्र 'गुंज उठी' रहेनेवाली ये शहनाई...
अशीच साठवून ठेवण्याचे सामर्थ्य मिळावे हिच इच्छा आणि हेच त्या महान कलावंताच्या कलेने आपल्यावर केलेले अनंत उपकार.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Wednesday, August 18, 2010
इतिहासाकरीता वेडे व्हा
वेडे व्हा. वेडे व्हा आपल्या इतिहासाकरीता आपण वेडे व्हा.खूप आहे मौलिक आहे. ते शोधायला शिका, हा बाबासाहेब पुरंदरेच्याच्या वाणीतून ऐकलेला संदेश अनुभवला आणि तुम्हालाही तो ऐकताना पटेल...
छत्रपतीं शिवाजी महाराजांची आर्ट गॅलरी सुरू करावी आणि १५९० ते १७३० या कालावधीतले शिवाजी महाराजां विषयीच्या इतिहासाचा तपशिल सांगणारी लायब्ररी काढणे हे दोन संकल्प वयाच्या ८९व्या वर्षी ज्या आत्मविश्र्वासाने शिवशाहिर बाबासाहेव पुरंदरे यांनी मांडले. ते ऐकतानाही त्यांचे हे दोन्ही उपक्रम नक्कीच पूर्ण होतील याची खात्री वाटते.
तन, मन दिले की धन आपोआपच गोळा होते त्याकरता कुठे जायची गरज नाही. ते तुमच्याकडून न मागता मिळते हा अनुभव बाबासाहेब विषद करतात.
पुण्यात शिवशाहिरांना लोकमान्य मातृभूमी पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला. पाच लाख ५१ हजारांचा पुरस्कार मंगळवारी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात भव्य समारंभात माजी पोलिस महासंचालक अरविंद इनांमदार यांच्या हस्ते देण्याच्या कार्यक्रमातले भाषण शिवशाहिरांच्या कृतिशिल व्यक्तित्वाचे द्रर्शन घडविणारे होते.
आपल्या कारकीर्दीत कुणासमोर न झुकलेल्या अरविंद इनामदारांनी शिवशाहिरांना केलेला सॅल्यूट पहाणे हाही एक मानाचा क्षण होता.
शिवचरित्राची बाराहजारावर व्याख्याने आणि जाणता राजा या महानाट्यातून छत्रपतींची कारकीर्द मांडणारे बाबासाहेव पुरंदरे यांच्याविषयीची कृतज्ञता कार्यक्रमातल्या प्रत्येक वक्त्याच्या बोलण्यातून जाणवत होती.
यानिमित्ताने ८९व्या वर्षीही चैतन्य म्हणजे काय याचा प्रत्यय घेतला. दाजीकाका गाडगाळांचे उदाहरण देउन ते ९२व्या वर्षी कसे आहेत तसे मला आणखी पाच वर्ष धडधाकट ठेवण्याचे बाबासाहेब देवाकडे मागणे मागतात. तोही क्षण अनुभवण्यासारखा होता. ते आयुष्य मागतात. ते छत्रपतींचे चरित्र वविध अंगाने पूर्ण करण्यासाठी.
धेय्य एकच. वेड एकच. ध्यास एकच.
त्यांना उद्याच्या पिढीविषयीची आस्था आहे. ते म्हणतात,'काय सांगावे. त्यात बाजी, तानाजी इतकेच नव्हे उद्याचा शिवाजीही जन्माला आला असेल. तुम्ही त्याला चांगले संस्कार द्या'.
असे समारंभ इतिहास शिकवितात. प्रेरणा देतात आणि स्फूर्तिही देतात.
जय हिंद. जय महाराष्ट्र, जय शिवाजी.
सुभाष इनामदार,पुणे.
subhashinamdar@gmail.com
9552596276
Tuesday, August 17, 2010
पुरुषोत्तम करंडक आता महाराष्ट्रीय पातळीवर
सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने वाटचालीला आरंभ करणारी पुरुषोत्तम करंडक महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सोमवारपासून पुण्यातल्या भरत नाट्य मंदिराच्या रंगमंचावर घुमू लागल्या आहेत. महाराष्ट्रातल्या सहा शहरात या स्पर्धेचे वारे हळूहळू वहायला यंदापासून सुरवात होती आहे.
डिसेंबर २०१०च्या १८,१९ आणि २० या तारखांना पुण्यापुरती मर्यादित राहणारी ही महाराष्ट्रीय कलोपासकची स्पर्धा कोव्हापुरात होणार आहे. यंदा जळगाव इथेही ती होत आहे. २०१३ पर्यत ती आणखी नाशिक, मुंबई, नागपूर आशा शहरात होउन सुवर्ण महोत्सवी वर्षात याची मेगा फायनल पुण्यात भरेल.
यंदाचे स्पर्धेचे हे ४७ वर्ष असून आता ती महाराष्ट्र पातळीवरची एकमेव मानाची आणि महाविद्यालयीन पातळीवर विविध नविन कलावंतांत उत्साह निर्माण करणारी म्हणून ती गाजली जाणार आहे.
महाविद्यालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यींना ही लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रकाश योजना अशा विविध अंगाने आपापली क्षितीजे निर्णाण करण्याची संधी देते. कलावंत इथे आधी दिसतात. त्यांच्या अभिनला स्टेज मिळते. आज प्राथमिक आणि अंतीम असा दोन पातळ्यांवर होत असेलेल्या एकांकिका पाहण्यासाठी तिकीटांसाठी मारामारी होते.
अनेक स्पर्धा पुण्यात भरतात पण इतका उत्साही प्रेक्षक लाभलेली ही एकमेव स्पर्धा मानली जाते. जल्लोष आणि घोषणाबाजूने रंगमंदिर परिसर ३० ऑगस्टपर्यत गाजत राहणार आहे.
महाविद्यालयीन पातळीवरील मुलांच्या क्रियाशिलतेला वाव देणारी ही स्पर्धा अनेक ज्वलंत विषयही आणते. कलात्मकता आणि नाविन्याचा नवा पायंडा इथे मुळ धरतो. अनेकविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे कितीतरी चेहरे इथे दिसले मग ते व्यवसायत स्थिरावल्याची उदाहरणे आहेत
ग्लोबल मराठी कडून सर्वांना शुभेच्छा.
सुभाष इनामदार,पुणे.
subhashinamdar@gmail.com
9552596276
Sunday, August 15, 2010
देशाचा अभिमान
आज सकाळपासूनच स्वातंत्रयदिनाची हलचल रस्ता नोंदवित होता.
सर्व सुखाचे आणि दुःखाचे क्षण हात रस्ता आदी सांगतो. नाही का?
शाळेत जाणारी छोटी बच्चे कंपनी १५ ऑगस्टच्या झेंडावंदन दिनाला लगबगीने रस्ता आडवून वेगवेगळ्या मुडमध्ये धावत होती.
आज लाखो नागरिक विश्रांतीचा रविवार सुखनैव घालविण्यासाठी जेव्हा साखरझेपेच असतील तेव्हा या मुलांच्या घरी आवरून शाळेत निघायची घाई झालेली असेल.
त्यांचे ते निरागसपण अनुभवले की उद्याची ही मोठी नागरी फळी यांना शिक्षकांबद्दल प्रेम आहे. शाळेबद्दल आस्था आहे.
आज्ञा पालन करणे हे तर त्यांचे कर्तव्यच आहे.
त्यांच्याकडून देशाला खरीच आशा आहे.
शाळेतही सारेच उत्साही वातावरण.
देशाचा हा सण साजरा करण्यासाठी . उद्याची महान देशाची उंची वाढविण्यासाठी ही पिढी घडविणारी सारीच शिक्षक मंडळी इथे आपापल्या वर्गाची जबाबदारी घेउन मुलांवर थोडी शिस्त लावताना दिसत होती.
यात काही प्रमाणात कामाचा भागही असेलही. पण या कामातला आनंद घेउनही ही मंडळी धावाधाव करताना पाहिले की बरे वाटते.
ध्वज उंचावताना उत्साहाने राष्ट्रगीत म्हणणारे ते आवाज आणि संचलनात सामिल झालेल्या घोष पथकातून वाजत जाणारी राष्ट्रभक्तिची धून सारेच आनंदीत.
शाळा हीच उद्याची पिढी घडविणारी मोठी प्रयोगशाळा आहे. हे आज पुन्हा पुन्हा सिध्द होते आहे.
आपणही या सा-यांना मदत करू या. आळसाने झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करण्यापेक्षा जी जागी आहेत त्यांना सशक्त बनविण्यासाठी थोडा वेळ कारणी लावला तरी यात सार कांही आले.
डोळ्याला देसले ते तिरंगी निशाण
वाकून प्रणाम करी
हाच नाही का देशाचा अभिमान
सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmnail.com
9552596276
Subscribe to:
Posts (Atom)