
शिक्षक .
शालेय जिवनातला महत्वाचा घटक. आज त्याचे महत्व किती.
धड्यातले मुलांच्या वह्यात उतरवून देण्यापूरते....
तो धडा मुलांना समजलाय की नाही याची खबरदारी घेणे हे त्याचे काम आहे...
संस्काराचे ओझे झुगारून आजच्या चलनी जगात मुलांच्या मनावर पुस्तकातले धडे शिकवायचे की, त्यांना या व्यवहारी जगात
कसे वागायचे याचे ज्ञान देउन खरे त्याला सज्ञान करायचे?
श्रमाची किंमत पगाराच्या नोटांमध्ये करूनही शिक्षक त्यांच्या कामात प्रामाणिक आहे?
अगदी पाठ्यपुस्तके बनविणा-या बालभारती पासून ते थेट शिक्षण मंत्र्यांपर्यत सा-यांचा या शिक्षणाच्या व्यावसायात सहभाग आहे.
उद्याची भावी पीढी घडविणा-या शिक्षकाची परिक्षाच पहाणारा हा काळ .
शहरातल्या शाळेतून निदान वर्ग तरी होतात.
थोड्याफार प्रमाणात शिस्तीचा धाक असतो.
बंदीस्त वर्ग असतात. सोई-सुविधा मिळतात.
पण हीच शाळा जेव्हा खेड्यात अवतरते. तेव्हा चित्र असे दिसते काय?
शिकविणारा शिक्षक पुरेसा अनुभवी असतो काय?
त्या विषयात त्याची गती - प्रगती कितपत आहे?
याचे किती भान ठेवले गेले आहे?..... हा विचार करण्यासारखा भाग आहे.
आठवत रहावा ... नक्की त्यांचे सांगणे हेच सत्य.
असे शिक्षक किती आहेत.... ही ज्ञानाची प्रेरणा घेऊन ती ज्योत पुढच्या कोवळ्या वयातील मुलांपर्यत तेववत ठेवतील.
यात चूक कोणाचीच नाही. काळ बदलला. पिढी बदलली. मुले बदलली. त्यांची विचाराची, प्रश्रांची धार बदलली.
मात्र एक नक्की. शिक्षणाला पर्याय नाही. ते घरी मिळणार नाही. त्यासाठी class room हवी आहे.
त्यांत शिक्षक हे हवेतच. फक्त बदललत्या परिस्थीतीचे भान असणारे ज्ञान असणारे शिक्षणक्रम असायला हवेत.
भारताची उद्याची पिढी घडविणा-या शिक्षकांची तेवढी ताकद हवी. तिथे मात्र वशिला. भ्रष्टता नको.
कारण शिक्षक हा मुलांवर ज्ञानाचे संस्कार करणार सैनिकच असतो. सैनिक देशाच्या सीमांचे रक्षण करतो.
शिक्षक देशाच्या पिढीचे भवितव्य घडवितो.
शाळेच्या चार भिंतीत. पुस्तकांच्या धड्यांमधून. वहीत टिपलेल्या टाचणावरून. भोवतालच्या परिस्थितीचे भान ठेऊन.
आदर्श. उत्तम. आकर्षक असा हा शिक्षक पेशा. त्याला मान द्यायला हवा. मात्र तो कमविण्यासाठी नोकरीपेक्षाही हा वसा घेतलेला तो एक आदर्श असावा... एवढेच वाटते..
(शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक स्वैर टिपण)
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276