Saturday, June 9, 2012

पावसाची वाट...



पाऊस पडून गेला...छे, तो तर अजून यायचाय. उन्हाच्या धारा आता थोड्या हलक्या आणि सुसह्य झाल्यात.बाहेर उन आहे.पण ते आता तेवढे तापत नाही. सहा जूनला पावसाने हजेरी लावली.. काय सांगू..पुण्यातल्या रेनकोटच्या दुकानात एकच झुंबड ऊडाली. दुकाना पाय ठेवायला जागा उरली नाही.
तेव्हा वाटले. लोक पावसासाठी करायची तयारी आधी का नाही करत!

बेटा, तेव्हा आला...आता ते नक्की कोसळणार या सुखद जाणीवेने पावसावरच्या चार ओळीही खरडल्या.
तापलेल्या धरणीवरी धारा पडल्या पडल्या..
वाटा फुटून फूटून भेगा सा-या त्या भिजल्या..
झाडे, वने आणि मने सारी चिंब भिजून ती गेली..
येता पावसाच्या धारा..सृष्टी बहरून ती गेली...

पुढे काय़...सारे उजाड !

मान्सुनची आगेकुच थबकली...स्थिरावली...पुन्हा त्याची प्रतिक्षा करणे एवढेच आपल्या हाती राहिले..
हो.. कदाचित असे असेल..शाळा १५ जुनपासून सुरु होणार म्हणून तो बापडा थांबला असेल..पूर्वी शाळा लवकर भरत म्हणून त्याने सात जूनचा मूहुर्त धरला होता...

असो...ये बापुड्या वरुणदेवा...सगळ्यांची मने आणि शरीरे तुझ्या आगमानाने...सुखावून जावू दे..सर्वांना पाणी मिळू दे..
इथे पाण्याशिवाय सारे काही अपूर्ण आहे..ते तू पुरे कर...हिच प्रार्थना !


subhash inamdar,Pune