पं. भालचंद्र देव यांचा सहस्त्रचंदर्दर्शन सौहळा
व्हायोलीनला
चार तारा असतात.
नानांचं म्हणजे. पं. भालचंद्र
देवांचे आयुष्य देखील एखाद्या
व्हायोलीनसारखच आहे. कलेप्रती
असलेली असीम निष्ठा,
अत्यंत साधी रहाणी
व संतुलीत आहार
आणि संतुलीत जीवन.
सर्वांच्या दृष्टीने एक आदर्श
गुरू..अशा त्यांच्या
आयुष्याच्या व्हायोलीनच्या चार तारा
आहेत. या
चार तारा अतिशय
संतुलीत करणारा जो `बो
`आहे..तौ त्यांच्या
आयुष्यातली शिस्त आहे . त्या
`बो` नी या
सर्व तारांना तोलून
धरले आहे. त्यांना
एकमेकांच्यामध्ये कुठेही हालण्याची परवानगी
नाही. म्हणूनच त्यांचं
व्हायोलीन आजही सुमधूर
आहे .उत्तरोत्तर तो
सूर अधिकाधिक श्रीमंत
होत चाललेला आहे`,
असे उद्गार लोकप्रिय
निवेदक आनंद देशमुख
यांनी पं. भालचंद्र
देव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन
सोहळ्यानिमित्ताने झालेल्या सत्कार समारंभात
काढले.
ज्येष्ठ व्हायोलीनवादक पं. भालचंद्र
देव यांचे सहस्त्रचंद्रदर्शन
आणि त्यांची पत्नी
सौ. नीला देव
यांचा अमृतमहोत्व या
निमित्ताने पुण्यात निवारा सभागृहात
` स्वरबहार` आणि `सांस्कृतिक पुणे`
यांच्यावतीने शनिवारी ( ३ डिसेंबर,१६) संगीताची
मेजवानी पुणेकर रसिकांना प्राप्त
झाली.
पं. देव यांना
याप्रसंगी त्यांच्या आयुष्याचा आलेख
सांगणारे मानपत्र गानवर्धनचे संस्थापक,
अध्यक्ष श्री. कृ.गो.धर्माधिकारी यांच्या हस्ते
देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता
व्यक्त करण्यात आली.
`सकाळी नाना झांडांची
फुले तोडताना मी
पाहतो..खरं तर
ते स्वतः आडनावाने
देव असून ते
काणत्या देवांना फुले वाहतात
ते पाहण्याची मला
उत्सुकता आहे. देवत्व
हे त्यांच्या वादनात
आहे. संस्कारामध्ये आहे,
त्यांच्या विचारामध्ये आहे, असे
दांपत्य आमच्या सोसायटीत राहते
हे आमचे भाग्य
`, असे देशमुख यांना वाटते.
गायकाच्या घराण्यातली
परंपरा सांगितली जाते..तशीच ती नानांबाबतीतही सांगावी लागेल. त्यांचे वडील उत्तम गायचे. थोरला भाऊ हार्मानियम वादक. वडीलांनी व्हायोलीन
नानांच्या हाती दिले. गेली अनेक वर्षे ते व्हायोलीन वादन अव्याहतपणे करताहेत. कुंटुंबात
कला ही परंपरा तेव्हापासून रूजली असल्याचे देशमुख सांगतात.
ती परंपरा आत्ताही
सुरू आहे..नाना व्हायोलीनला..मुलगी चारूशीला व्हायोलीनच्या सहवादनाला साथ द्यायला.
नातू तबल्याला आणि आमच्यासारख्या निवेदकाला आजिबात थारा नको म्हणून जावई- राजय गोसावी
निवेदनाला. संगीतावर प्रेम करणारे हे कुटुंब आहे हा आम्हाला अभिमानाचा भाग वाटतो , असे देशमुख गौरवपूर्वक सांगतात.
`गायकी पध्दतीने एखादे वाद्य
वाजविणे ही प्रचंड
मेहनत घेऊन आत्मसात
केलेली कला आहे.
वादानातले प्रभुत्व इतके असते
की ते शब्द
आपणाला सहजपणे आठवतात..तसे
शब्द देवांच्या व्हायोलीनमधून
सहजपणे दिसतात..म्हणजेच ते
वाद्य बोलू लागते.
गायकी अंगाने वाद्य
बोलू लागते`.
चारूही वडीलांच्या पाऊलावर
पाऊल टाकले आहे..मग ती
नोकरी असो, शिस्त
असो वादन असो..तिचेही वादन आक्रमक
आणि सुंदर असते..देशमुख सहजच चारूशीला
गोसावी यांनाही शाबासकीची थाप
असा देतात.
`लहानपणापासून
मी बघतोय..नाना
तसेच आहेत.. काळ्याचे
पांढरे झालेत फक्त..बाकी
तोच उत्साह, तोच
तरतरीतपणा, तिच शिस्त.
तोच नियमितपणा आणि
संगीतावरची तिच निष्ठा.. त्यांचे वादन
त्यांच्या रहाणीमानाइतकच परफेक्ट आहे.. सूर,
लय आणि आणि
ताल यांच्यावर त्याचे
अमाप प्रभुत्व आहे`,.पं. देव
यांचा नातू तबलावादक
रविराज गोसावी आपले मनोगत
व्यक्त करीत होता.
`योग्य गुरूची निवड हा
कलाकाराच्या आयुष्यातला कळीचा मुद्दा
असतो, त्या बाबतीत
भालचंद्र देव खरेच
भाग्यवान ठरले.पं.
गजाननराव जोशी, पं. बबनराव
कुलकर्णा,पं. नागेश
खळीकर..तबला वादनासाठी
छोटू गोखले असे
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ
गुरू त्यांना लाभले.
गुरूंकडे शिक्षण घेऊन त्यांनी
आपल्या व्हयोलीन वादनाची नवी
शैली आत्मसात केली.
अव्याहत संगीत साधना. जीव
ओतून केलेले सादरीकरण.
शिष्यांना आप्तेष्ट समजून केलेले
अध्यापन. सकारात्मक व्यक्तिमत्व. वागण्यातील
साधेपणा,सात्विकता. वादनातील सच्चाई
आणि रियाजातील एकाग्रता.
हे त्याच्या व्यक्तिमत्वातील
तेजस्वी पैलू आहेत.
त्यातच त्यांचा परमानंद एकवटलेला
आहे`, असे सांगून
गानवर्धनचे कृ. गो.
धर्माधिकारी यांनी पं. देव
यांचे व त्यांच्या
पत्नी सौ. नीला
देव यांचे अभिष्टचिंतन
केले आणि त्यांना
दीर्घायुष्य लाभावे अशी परमेश्वराजवळ
प्रार्थना
केली.
`माझ्या नातीने दोन गाणी
निवडली. माझी कन्या
व्हायोलीन वादन करेल
आणि मी शेवटी वाजविणार
आहे..अशा आमच्या
तिन्ही पिढ्या आपल्यासमोर येणार
आहेत. यापलीकडे काय
बोलू.. आम्ही सारे सुरातूनच बोलणार
..तेव्हा आपणा सर्वांचा
लोभ असावा..एवढीच
अपेक्षा.`.असे दोन
शब्द पं. भालचंद्र
देव यांनी सत्काराला
उत्तर देताना आपल्या
मनोगतातून व्यक्त केले.
पं. देव यांच्या
सत्कारप्रसंगी सौ. कुमूद
धर्माधिकारी यांच्या हस्ते सौ.
नीला देव यांचा
अमृतमहोत्वानिमित्ताने सत्कार केला गेला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पं. देव यांची नात सौ. मधुरा गोसावी- तळेगावकर यांनी अमृताहुनी गोड हा अभंग आणि दान दिल्याने हे गीत सादर करून स्वरातून भावभक्तीची आराधना केली.
सत्कार सोहळ्यानंतर पं. देव
यांची कन्या व
शिष्या सौ. चारूशीला
देव यांनी आपले
व्हायोलीन वादनातले श्रेष्ठत्व सिध्द
केले..आरंभी मियामल्हार..नंतर याद
पियाकी आये ही
ठुमरी आणि नंतर हे
सूरांनो चंद्र व्हा..हे
नाट्यपद वाजवून रसिकांची दाद
मिळविली.
शेवटी पं. भालचंद्र
देव यांनी आपली
मैफल सजविली. आरंभी
सोहनी राग.नंतर
तेजोनिधी लोहगोस
आणि धीर धरी ही दोन नाट्यपदे सादर केली..
आपल्या व्हायोलीन वादनाचा शेवट सुरावट आणि नादमयता यांची पाहोच रसिकांच्या मनात सुरेल असा भैरवी राग नटवून दिली.
तेजोनिधी लोहगोस
आणि धीर धरी ही दोन नाट्यपदे सादर केली..
आपल्या व्हायोलीन वादनाचा शेवट सुरावट आणि नादमयता यांची पाहोच रसिकांच्या मनात सुरेल असा भैरवी राग नटवून दिली.
सर्वच कार्यक्रमातील गीतांना आणि वादनाला
संगत केली ती
त्यांचा नातू रविराज
गोसावी यांनी.
सा-या कार्यक्रमाचे
निवेदन आणि सूत्रसंचालन
पं. देव यांचे
जावई राजय गोसावी
यांनी केले होते.
- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
http://culturalpune.blogspot.in/
http://subhashinamdar.blogspot.in/
9552596276