Saturday, March 22, 2014

गजाननबुवांच्या स्मृती जिवंत झाल्या..

व्हायोलीनवादनाची सुरेल मैफील रंगली. निमित्तहोते ख्यातनाम व्हायोलीन वादक आणि गायक कै. पं. गाजाननबुवा जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे शिष्य भालचंद्र देव यांनी आयोजित केलेल्या 'स्वरबहार' या व्हायोलीनवादनाच्या मैफिलीचे.
शुक्रवारी निवारा वृध्दाश्रमातल्या सभागृहात मैफिलीची सुरुवात झाली ती पं. गजाननान बुवांनी  राग केदारमधील ध्वनिमुद्रणाच्या स्मृतींनी. त्यानंतर चारुशीला गोसावी यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्या  चिन्मय स्वामी या बालकलाकाराने राग भीमपलासमध्ये त्नितालातील एक रचना व तिचे आलाप, ताना आणि त्यानंतर एकतालातील रचना सदर केली. उद्याचा कलाकार कसा तयार होतो आहे ते कळण्यासाठी त्याचे वादन निश्चित आश्वासक होते..


यानंतर पं. भालचंद्र देव यांच्या कन्या आणि शिष्या चारुशीला गोसावी आणि कै. पं. मधुकर गोडसे व रमाकांत परांजपे यांच्या शिष्या नीलिमा राडकर यांनी शामकल्याण रागात जुगलबंदी सादर केली. त्याला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर दोघींनी व्हायोलीनमधल्या दिग्गजांनी बांधलेल्या वेगवेगळ्या रागांतील रचना सदर करून वाहवा मिळवली. व्हायोलीनचे सूर ज्व्हा रंगात येतात तेव्हगा रसिकही किती उस्फूर्त प्रतिसाद देतात याचे उदाहरण म्हणून या दोन व्हायोलीन वादनात गेली अनेक वर्ष करत असलेल्या त्यांच्या मनेहनतीला किती रंग चढत जातो..ते यांच्या एकत्रित वादनातून उमजले.


ज्येष्ठ शिष्याने वयाचे गणीत न विचारात घेता व्हायेलीनची जादू किती आत्मसात केली आहे ते  पं. भालचंद्र देव यांनी विविध नाट्यगीतातून श्रोत्यांसमोर आली... त्यांनीच साकारलेल्या भैरवीच्या सूरांनी  कार्यक्रमाची सांगता झाली. . या भैरवीने श्रोत्यांच्या पं. गजाननबुवांच्या व्हायोलीनवादनाच्या स्मृती जागृत झाल्या.


रविराज गोसावी यांनी सर्मपक तबल्याची साथ करून मैफिलीत रंग भरला. राजय गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. 

Wednesday, March 19, 2014

बरोबर चाळीस वर्षे झाली..




बरोबर चाळीस वर्षे झाली...पुण्यात आलो..आधी तरुण भारत (नरकेसरी प्रकाशन, नागपूर) ,मग १४ वर्षं..वनवास उपभोगला तो इंडियन एक्स्प्रेसच्या पुणे शाखेत काम करून...नंतर साली लाईनच बदलली..चक्क वृत्त संपादक म्हणून ई-सकाळचा दहा वर्ष ओळखला जाऊ लागलो..
सातारा सोडून पुण्यात आलो..केवळ योगायोगाने नाकरीला लागलो...आज सातारा येथे काही नाही..आहे त्या जुन्या आठवणी..जुने मित्र..जुनी शाळा..पण योग्य संस्कार...
पुण्यात कधी येऊ अशी स्वप्नातही न वाटणारी गोष्ट होती..पण आधार दिला तो सारस बागेने...नारद मंदिराने..भरत नाट्य मंदिराने..आणि वनाज जवळच्या कुंबरे चाळीतल्या दोन खोल्यांनी..
पुढे जग बदलले...बाय़को आयुष्यात आली..ती ही बॅंकेतली..मग सारा परिवर्तनाचा काळ सुरु झाला तो आजही कायम आहे..
सकाळने मला वयाच्या ५५ व्या वर्षी आपली इथे गरज नाही..म्हणून बजावले..त्यादिवशी राजिनामा दिला...आणि स्वतंत्रपणे वाट शोधू लागलो..
नव्या संस्थांनी बळ दिले..नवे लेखन होऊ लागले..आयुष्यात नवे पर्व आले...

आता मी मोकळा आहे..खिशाने
पण माणसांच्या जगात विहरतो आहे
आनंदाची लहर मिरवत
ती इतरांमध्ये परसवत
समाधानात रमलो आहे..

माणसांचे, मित्रांचे, नात्यांचे बंध
काही तुटले काही बांधले गेले
तर काही आयुष्याशी जोडले गेले
रोज सारे काही नव्याने घडल्यासारखे

सांस्कृतिक क्षेत्राचा धांडोळा घेत
कलेच्या वाटेने धग घेत
मस्तीत , मौजेत
इतरांसाठी..आपल्या माणसात
सारे काही नसूनही..असल्यासारखा


- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276