घरात कुठलेही साहित्याचे ,कवीतेचे
वातावरण नसतानाही इतकी समृध्द प्रतिभाशक्ति
शांताबाई शेळके यांच्याजवळ होती की ,जे जे त्यांनी अनुभवले ते ते सारे शतरूपाने आपल्यापरीने
फुलवून आपल्यासमोर ठेवले आहे.. शांताबाईंच्या परंपरचा धागा आज आपल्या साहित्यातून आणि
कवीतेतून पोहचविणा-या अरूणा ढेरे शांताबाईंविषयी भरभरून सांगत होत्या .
ऋतू हिरवा या शांता
शेळके यांच्या गीतांच्या कार्यक्रमाच्यावेळी २३ जून ला
रसिकांना अरूणा ढेरे यांनी सांगितलेले
सारे
मनात टिपून ठेवण्यासाठी कान आतूर करावे लागत होते.
मनात टिपून ठेवण्यासाठी कान आतूर करावे लागत होते.
निलम बेंडे यांनी अतिशय
मनापासून शांताबाईंच्या गीताचा कार्यक्रम करण्याचे ठरविले आणि ते त्यांनी आपल्य़ापरिने
पडद्यावर साकार करून रसिकांना तृप्त केले.
जय शारदे पासून ते
मराठी पाऊल पडते पुढे.. या गीतप्रवासातील अनेक लोकप्रिय आणि गाजलेली गीते या कार्यक्रमात
एकामागोमाग रसिकांना ऐकता येत होती..त्यातच मागच्या पडद्यावर शांताबाईंच्या विविध गीतांच्या
ओळी साकारत होत होत्या.. त्यांच्या पुस्तकांची काही चित्रेही विंगेतून खुणावत होती..तसा
रंगमंच भारला जात होता..त्या स्वरांनी आणि विनया देसाई यांच्या शांताबाईं शेळके यांच्या
साहित्यातील अनुभवानी.
त्यातच भर म्हणून अरूणा ढेरे शांताबाईंचे रुप आणि त्यांची कवितेतील सहजता शब्दातून सांगण्यासाठी रंगमंचावर हजर होत्या..
त्यातच भर म्हणून अरूणा ढेरे शांताबाईंचे रुप आणि त्यांची कवितेतील सहजता शब्दातून सांगण्यासाठी रंगमंचावर हजर होत्या..
एका अर्थांने हा सारा
रंगमंच शांताबाई शेळकेमय झाला होता..
शांताबाईंची गीते पाच
ते आठ कडव्यांची असायची..त्यांना सुचायचे ते त्या विहित जायच्या संगीतकार त्यांना हवी
तेवढी त्यातली कडवी निवडायचे..एकूणच देता किती दो करांनी ...असे त्यांचे सूचणे असायचे- अरूणा ढेरे.
ज्येष्ठ समिक्षक रा.
ग. जाधव तर शांताबाईंना एकदा म्हणाले की,
शांताबाई, तुम्ही शब्दब्रम्हाच्या पुजारीण आहात....
किती सार्थ होते..विनया देसाई सांगत होत्य़ा.
शांताबाई, तुम्ही शब्दब्रम्हाच्या पुजारीण आहात....
किती सार्थ होते..विनया देसाई सांगत होत्य़ा.
तोच चंद्रमा नभात,
शूर आम्ही सरदार , अजब सोहळा आणि मराठी पाऊल पडते पुढे अशा उत्तम रचनांना आपल्या आवाजाच्या
जादुंनी चंद्रशेखर महामुनी यांनी सादर केलेली
गाणी आजही मनात रुंजी घालता हेत. दाटून
कंठ येतो ..ला
तर पुन्हा एकदा
म्हणण्याचा प्रतिसाद रसिकांकडून मिळाला.
खरे तर देवआनंद सारखी स्टाईल करणारा हा गायक नेहमी रसिकांच्या समोर येतो तो हिंदी गीतांचे सादरीकरण करताना..स्वतंत्रपणे.. पण त्यांनी गायलेली हा गाणी इतकी जबरदस्त झाली का त्यांच्या गाण्यात ती चाल होती पण त्यात भाव होते ते त्याच्या आपल्या अनुभवी सूरातून..
खरे तर देवआनंद सारखी स्टाईल करणारा हा गायक नेहमी रसिकांच्या समोर येतो तो हिंदी गीतांचे सादरीकरण करताना..स्वतंत्रपणे.. पण त्यांनी गायलेली हा गाणी इतकी जबरदस्त झाली का त्यांच्या गाण्यात ती चाल होती पण त्यात भाव होते ते त्याच्या आपल्या अनुभवी सूरातून..
आपल्या स्वतंत्र कार्यक्रमातून
मराठी गाणी लिलया सादर करणारी निर्माती आणि गायिका चैत्राली अभ्यंकर यांनी शांताबाईंच्या
गीतांना तेवढ्याच ताकदीने रसिकांच्या मनात पोहचविण्याचा उत्कट असा प्रयत्न केला. जे
वेड मजला लागले पासून..किलबील कीलबील हे बालगीत..तर ऋूतू हिरवा..हे शिर्षक गीत हे त्यांनी
तेवढ्याच वजनाने सादर करून शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. हात नगा लावू माझ्या साडीला..ही
लावणीही ठेक्यात सादर झाली.
कार्यक्रमाच्या निर्मात्या
आणि गायिका निलम बेंडे यांनी पैठणी ही कविता वाचून शांताबाईंच्या शब्दांना सार्थपणे
पोहचविले. ही वाट दूर जाते..माझे राणी माझे मोगा आणि शारद सुंदर.. या तिन गीतांनी निलमताईंनी
आपला ठसा उमटविला.
शांताबाई शेळके हे नाव मराठी माणसाला आपल्या कुंटुंबातील एक वाटते.. याचे कारण म्हणजे त्यांच्या सहज पण गुणगुणत रहाव्यात अशा कविता आणि त्यांचे शालीन, सोज्वल आणि लोभसवाणे ..कुणालाही आपल्या वाटतील अशा वेशातले व्यक्तिमत्व..
शांताबाई जाऊन बारा
वर्षे झाली..पण
त्यांच्या साहित्याची मोहिनी मराठी
सारस्वतांच्या ठायी कायम
आहे.. हेच रसिकांच्या
उपस्थितीने सिध्द केले.
केदार परांजपे .डॉ. राजेंद्र
दूरकर ,अभिषेक काटे ,आदित्य
गोगटे यांची संगीतसाथ असल्यामुळे कार्यक्रम
बहारदार..आणि ठसक्यात
होणार याची खात्री
होती..आणि तसेच
झाले.
पुन्हा पुन्हा अनुभव
घ्यावा असा हा
कार्यक्रम निलम बेंडे
यांनी सादर केला
त्याबद्दल त्यांचे कौतूक करावे
तेवढे थोडे आहे.
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com