Thursday, October 17, 2024

उत्तम अभिनयाने आणि संगीताने सादर झालेली खणखणीत कलाकृती.. गोष्ट संयुक्त मानापमानाची..!


मराठी रंगभूमीवर १९२१ साली संगीतसूर्य केशवराव भोसले आणि नटसम्राट बालगंधर्व यांच्या एकत्र प्रयत्नातून टिळक फंडासाठी झालेल्या संयुक्त मानापमान या नाटकाने जो इतिहास घडविला त्यावर आधारित हे नाट्य...

यातली नाट्यमयता आणि तो काळ..आणि प्रत्यक्ष कलावंतांनी संगीत भूमिकांनी रसिकांवर केलेला परिणाम..त्याचा समजावर झालेला परिणाम सारेच या नाटकातून परिणामकारक बाहेर आले आहे.
शंभर वर्षाहून अनुभवलेल्या अभूतपूर्व घटनेला आपल्या अभ्यासपूर्ण लेखनातून अभिराम भडकमकर यांनी साकारलेल्या कलाकृतीला आपल्या लेखनातून मोठ्या हुशारीने ..कुठेही त्याचा इतिहास जसाच्या तसा बाहेर आणला.

मानापमान नंतर सौभद्र..नाटक करून बालगंधर्व यांना द्रौपदी नाटकाच्या कर्जातून बाहेर काढण्याचं केशवराव यांनी ठरविले होते..मात्र विषमज्वराने त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची..आलेली बातमी कळताच बालगंधर्व यांच्या मनाला धक्का बसला..आणि तोच या नाटकाचा शेवटचा प्रवेश ठरला

.
हृशिकेष जोशी यांनी तेव्हढ्याच तयारीने रंगभूमीवर उभी करून..तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतील अशी कलाकृती रसिकांच्या भेटीला आणली आहे..
तीच म्हणजे हे गोष्ट संयुक्त मानापमानाची.. हे नाटक.





संगीत नाटकाच्या आणि एकूणच नाटकावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींना पाहताना यात विलक्षण अनुभव मिळेल.. आजची तरुण पिढी आपल्या परंपरेचे जतन किती उत्तम रित्या मांडण्याचे कौशल्य दाखवीत आहे ..हेच नाटक पाहून दाद द्यायला अभिमानाने तयार होईल..एव्हढी
ताकद या कलाकृतीत आहे हे नक्की.




अशी कलाकृती रसिकांच्या भेटीला आणल्याबद्दल आधी निर्माते नाट्यसंपदा कलामंचे अनंत वसंत पणशीकर आणि चंद्रमंगल आर्ट्स .. शौर्य प्रोडक्शनचे श्यामराज पाटील यांचे मनापासून अभिनंदन करायला हवे.
नांदी..ते भैरवी असा हा संगीत प्रवास कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाने नाटकात सजला..बहरला..
याला प्रदीप मुळ्ये यांचे प्रकाश आणि रंगसजावट आणि मधुरा रानडे यांची वेशभूषा अधिक तेजोमय करते.
मी पुण्यात १३ ऑक्टोंबर २४ रोजी प्रयोग पाहिला त्यात





ओंकार प्रभुघाटे... धैर्यधर ..गाणारा केशवराव



अजिंक्य पोंक्षे..भामिनी..बालगंधर्व
( पायाला दुखापत झाली असताना.. बँडेज बांधून त्यानी ज्या पद्धतीने भामिनीची पदे ..आणि सूत्रधाराच्या भूमिका केल्या..त्याला दाद द्यायला हवी..)





आशिष नेवाळकर...बालगंधर्व,( गद्य)
ऋषिकेश वांबुरकर..केशवराव .( गद्य)






श्यामराज पाटील .. लक्ष्मीधर,

प्रद्युम्न गायकवाड, परमेश्वर गुट्टे, ऋत्विज कुलकर्णी, आशिष वझे, निरंजन जाविर, श्रीराम लोखंडे,अश्विनी जोशी..या कलाकारांनी आपल्या कलेतून आम्हाला हा विलक्षण देखण्या कलाकृतीचा आनंद दिला.
संगीत मार्गदर्शन आणि ऑर्गन - सुशील गद्रे
तबला - अथर्व आठल्ये..





* केशवराव यांचे तरतरीतपण..आणि कोल्हापुरी भाषेचा लहेजा..
* बालगंधर्व..यांच्यातला मृदू पण आयुष्यातील धक्के खाऊन आलेला सहजी स्वभाव..
* संगीत गाणाऱ्या बालगंधर्व यांच्या पुरुषाने स्त्री वेशात केलेल्या हळव्या आणि पद्यातून उमटणाऱ्या पदांच्या जागा..
* केशवराव आणि बालगंधर्व यांचे नट आणि नाटकासाठी..कलावंतांसाठी असलेले प्रेम..
आणि कलेविषशी निष्ठा..
*देशप्रेम..आणि टिळक यांचे प्रती असलेला भाव..
* त्या काळाचे दर्शन घविणारे प्रसंग..
* नाट्यप्रयोग सादर होण्यापूर्वी केशवराव..आणि बालगंधर्व यांच्यातले संबंध दाखविणारा दूध आणि पानाची देवाणघेवाण करणारा मेकअप करतानाचा प्रसंग..
* गद्य नट वेगळे..आणि संगीत भूमिका सादर करणारे पात्र वेगळे..
* नाटकाच्या लेव्हलच नाट्य हलते राहण्यासाठी केलेला उपयोग...
* मानापमान नाटकातील गाजलेल्या पदांची कलावंत म्हणून केलेले उत्तम सादरीकरण..
* एकाच नाटकात प्रयोगशील ..आणि तेव्हढेच उत्तम नेपथ्याचा केलेला उपयोग...
* इतिहास अभ्यासून लेखकाने तयार केलेली ही परिणामकारक नसऱ्य..
* नाटक सतत घडत रहाण्यासाठी हृषीकेश जोशी यांनी केलेला मंच वापर..
* तरुण कलावंत घेऊन सादर झालेला परिणामकारक संगीत नाटकांचा प्रयोग..
* नाट्यक्षेत्रात इतिहास घडविणाऱ्या ऐतिहासिक घटनेला पुन्हा नव्याने उजाळा देणारी रांगमंचावरील घटना..
* तरुण कलावंतांनी आपल्या परंपरेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याचा हा उत्तम प्रयत्न..
* कालानुरूप बदलूनही काळाची पावले ओळखून केलेला हा नाट्य निर्मिती करण्याचा निर्णय..


_ सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

No comments: