
परवा, अगदी भल्या पहाटे (सकाळी ६ वाजता..पुण्याच्या दृष्टीने) आम्ही कुटुंबीय सात पंधराची डेक्कन पकडली. सव्वादहाच्या सुमारास दादरला पोचलो. लागलीच परळसाठी टॅक्सी केली. पावसाने अदल्याच दिवशी कहरकेल्याने
आजही तो कोसणार याची खात्री होती. म्हणूनच मिळेल त्या टॅक्सीला हात केला.
पंचवीस रुपायात (पुणेकरांना रिक्षाचे भाडे माहित असल्याने) के.ई.एमच्या दारात पंधरा मिनिटात हजर झालो.
टॅक्सीचे दार उघडून बाहेर पडणार मात्र...मुंबईच्या पावसाने आपला खाक्या दाखविला.
हॉलमध्ये जाणाच्या आत पावसाने ओलेते करून सोडले.
लग्नाला वेळ होता. पण मुंबईची ती कुंद हवा.. बाहेर कोसळणा-या पावसांच्या सरी..
दमट हवेची सवय नसल्याने अधिकच घामेजलेला...
मात्र इकडच्या स्वारीने.. बॅग घेऊन थेट वधूपक्षाची खोली गाठली. लग्नाला शोभेलसा नट्टापट्टा केला.
मी मात्र...त्याच त्या पुण्याहून आलेल्या साध्या कपड्यात.. अखेरीस मी बॅगेत घेतलेला झब्बा अडकवला.
नातेवाईकांशी गुफ्तगू झाले. त्यातच सातारच्या न्यू ईग्लिश स्कूल मधला बॅचमेट भेटला.
तो मुलाकडून..तर मी मुलीचा मामा म्हणून नव्याने नाच्याचे बंध ओढले गेलो.
घामाच्या धारा अंगात वहात होत्या.. भाचीला स्टेजवर मामा म्हणून टोपी घालून स्टेजवर हजर केले.
मंगलाष्टकाच्या फैरी झडल्या... कुणाचा सुस्वर आवाज..तर कुणी पारंपारिक आवाजाची देणगी असलेला..
लग्नाचा विधी पार पडला..
तसे सारे जण भोजनाच्या दिशेने वळाले.. आधी प्लेटसाठी रांग....मग पदार्थ घेण्यासाठी रांग..
बरे बसायला जागा नाही... हातात प्लेट घेऊन अधिक पदार्थांच्या करीता त्याच ठिकाणी हालचाल सुरू..
पदार्थांची चव घेत जेवण घेणे आता शक्य नव्हते...आपण आधी घेतले तर इतरांना जागा मिळेल..
अशी स्थिती...
नवरा-नवरी स्टेजवर आलेल्यांच्या ओळखी करण्यात गुंतलेले.. तेही इतके की रांगेत दाखल होऊन
आपला नंबर कधी लागतो याची वाट पहात उभे रहायाचे...
दोन्हीकडचे पाहुणे..देवघेवीत गुंतलेले. कोण जेवले.. हे पहायाला सवड कुणाला...
दुपारी हॉल खाली करायचा..
ज्याने त्याने आपापले पोट पाहून ताटात घ्यायचे आणि तृप्त होऊन जायचे...बस्स्...
खरेच....पूर्वीकाळी( आमच्या काळी असे म्हणण्याची पध्दत होती..त्य़ाप्रमाणे) पंगत असायची..
ज्येष्ठांना मान असायचा.. मुलांकजेही लक्ष रहायचे.. ताट भरलेले असायचे... आग्रह व्हायचा...
कुणी विहिण म्हणाचयी... तर कुणी भावगीताने जेवणावळीची रंगत वाढवायचा..
प्रत्येक जण परिचित व्हायचा... मुलगा मुलगी पाया पजून आशिर्वाद घ्यायचे...
अगदी उखाण्यांची उधळण व्हायची... सारा सोहळा...समारंभात आपलेपणा असायचा...
आणि आता.....
सोहळा होतो..खर्च होतो...प्लेटचा हिशेब धरून केटरर पैसे घेतो..
येणारा आपल्याच हाताने वाढून घेऊन आनंद घ्यायचा प्रयत्न करतो...
जातो म्हणून सांगायला गेलात की...जेवलात ना? कोरडेपणाने विचारले जाते....
कुणाला काही द्यायचे नसते...कुणाला काही घ्यायचे नसते.... सारा मामला उपस्थितीचा...
आणि समारंभ उरकण्याचा... हो अगदी अलीकडे तर मुलगा मुलगी दोघांना उचलून माळा घालण्याचे नविन फॅड... अखेरीस ज्येष्टांना आवडो वा...ते होत रहाते...रिवाजासारखे...
अलिकडच्या असा लग्न पध्दतीत काय लक्षात रहाते...जेवण..
पण तोही आता उपचार उरलाय...अगदी स्पष्ट भाषेत सांगायचे झाले तर
लग्नाला जातो म्हणजे आपण जेवायला जातो....
त्यात जिव्हाळ्यापेक्षा असते ती सोय...
नात्यापेत्राही असतो तो व्यवहार...
दूरून लोक येतात..ते काय फक्त जेवण्यासाठी....
आलेल्यात आपुलीकेचे धागे असतात..पण तिथे ..ते औपचारिक बनते... गर्दीत उभे राहून ..
अक्षदा पडल्या की...प्टेट हाती धरून..कुणी वाढता कारे यात म्हणत रांगेत उभे रहायचे...
एकदाच काय ते खिचडी करून एकत्र घ्यायचे....आणि सुटायचे... बाकी काय...
तुमचा काही वेगळा अनुभव आहे.... जरूर उत्तर द्या...नव्हे...सांगा...
सुभाष इनामदार,पुणे
मोबा..९५५२५९६२७६
subhashinamdar@gmail.com