संगीतातून गायन वादन नृत्य हे तिन्ही प्रकार तालाशिवाय अपुरे आहेत. ताल संगीतातील सुरांना निर्धारीत कालखंडात बंदिस्त करतो. यात तालाचे महत्व आहे..त्याच ताल सौंदर्यावर आधारित कार्यक्रम ज्येष्ठ तबलावादक विद्यानंद देशपांडे यांच्या संकल्पनेतून रविवारी २९ जून २०२५ रोजी कलाद्वयी यांचे वतीने सादर झाला..
तालबंधातील ठेव ही...
असा आगळा अभ्यासपूर्ण कार्यक्रम करून संगीत नाटकाला आणि नाट्यसंगीताला आजच्या तरुण आणि संगीत नाटकावर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी निर्माण केला याबद्दल संस्थेचे सारेच विश्वस्त यांचे मनापासून अभिनंदन करायला हवे.
हा होता शुभारंभ प्रयोग..पण याचे अनेक कार्यक्रम यापुढेही सादर होतील अशी खात्री आहे.
चौदा वेगवेगळ्या तालावर आधारित नाट्य पदांच्या या कार्यक्रमात त्यात्या तालाची माहिती आणि तो ताल कसा नाट्य पदात वापरला गेला याचे तयारीच्या गायकांकडून गायलेली तयारीची पदे इथे सादर केली जात होती..
अगदी नांदीपासून सुरू झालेला हा तालाच्या अभ्यासातून समोर मांडला जाणारा आविष्कार नव्याने मनात झिरपत होता आणि रसिक तो अनुभव अतिशय जिंदालील पद्धतीने समजून घेत होते..
कार्यक्रमाचे नाव संगीत रंगभूमीवर अनेक वर्षे काम करणाऱ्या वर्षा जोगळेकर यांनी अतिशय समर्पक दिले होते..
त्यांचे त्याबद्दलचे विवेचनही तेवढेच महत्वाचे होते..तर संजय गोसावी यांनी निवेदनात त्यांना साथ दिली होती.
नांदी.... धुमाळी तालात
अभोगी नाटकातील नांदी..
नमित प्रथम गणपती
गंधर्व ठेका..सौभद्र
बलसागर तुम्ही वीर शिरोमणी.. संपदा थिटे
शब्द..स्वर..ताल..याला. गद्याची तेव्हढीच उत्तम लय
अध्धा त्रिताल
भावना प्रक्रटीकरण करणारा ताल..
बिंबाधरा मधुरा.. ज्ञानेश पेंढारकर
दीपचंदी ताल..
चिन्मय जोगळेकर..रवी मी
एकच प्याला.. त्रिताल १६ मात्रांचा..
अस्मिता चिंचाळकर.. ललना मना नच अघलव शंका
चाचर..ठेका..
नाटक ..चैती..अब आई ऋत वसंत.. संपदा थिटे
झपताल १४ मात्रा
वझे बुवांचा वारसा..सखी मुखचंद्र
ज्ञानेश पेंढारकर.. नाटक श्री
रूपक ताल..रागिणी मुखचंद्रमा
चिन्मय जोगळेकर
दादरा.. चार नाट्यगीतांची मेडली
साकीची..झलक.. चिन्मय जोगळेकर
झम्पा.. ताला.. चे प्रत्यक्ष उदाहरण
एकताल.. रचना..संपदा थिटे
.. ये झणी ये रे माघारी
केरवा ताल..
आर.डी. बर्मन यांनी बऱ्याच वेळा वापरला आहे.
संगीत नाटकात.... ये मोसम है रंगीन...
अस्मिता चिंचाळकर
वसंत देसाई..संगीतकार.. वसंत देसाई ठेका..
जय जय रमा रमण श्रीरंग.. जय जय गौरी शंकर
ज्ञानेश पेंढारकर ते उत्तम तयारीने ..आणि तन्मयतेने सादर करतात..
जोहार मायबाप जोहार.. संथ लईतला अभंग चिन्मय जोगळेकर सादर करून कार्यक्रमाचा समारोप करतात..तेंव्हा रसिक मायबाप टाळ्यांच्या गजरात सर्व कलावंतांचे उभे राहून कौतुक करतात..
कलाद्वायी प्रस्तुत आणि विद्यानंद देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा नाट्यपदांचा विशेष कार्यक्रम
ज्ञानेश पेंढारकर, संपदा थिटे, चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर या संगीत नाटकात भूमिका करणाऱ्या तयारीच्या गायकांनी हा सादर करून रसिकांची दाद मिळविली..
संगीत नाटकाच्या अभ्यासकांना..रसिकांना आणि संगीत नाटके पुन्हा करण्यासाठी उत्सुक असलेल्या संस्थांना हा प्रेरणादायी आहे. तबला शिक्षण घेणाऱ्या अभ्यासकांनी हा कार्यक्रम एक नवी शिकण्याची उमेद देणारा आहे.
भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात रविवारची संध्याकाळ या तालाच्या अभ्यासातून तो मायबाप रसिकांनी अनुभवला.
प्रमोद जांभेकर..हिमांशू जोशी आणि विद्यानंद देशपांडे या उत्तम साथीदारांनी तो अधिक खुलविला..
संजय गोसावी आणि वर्षा जोगळेकर यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून त्याचे बारकावे ऐकता आले.
- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com