Saturday, September 29, 2012

पुण्याची विसर्जन मिरवणूक..व्हिडीओतून

पुण्याची विसर्जन मिरवणूक..व्हिडीओतून













-----माझ्या स्मृतीत भरुन राहिलेली




अनंतचतुर्दशीच्या दिवशी पुण्यातली मानाची पारंपारिक शाही विसर्जन मिरवणूक आपल्या नेहमीच्या वैभवी दिमाखात मंडईतल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शनिवारी सकाळी साडेदहाला पुण्याच्या महापौर वेशाली बनकर यांच्या हस्ते कसबा गणपतीच्या मूर्तीची पूजा करुन झाली....उत्साहाला उधाण आले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही....

गणपती बाप्पा मोरया..
पुढच्या वर्षी लवकर या...

 पुण्यातली मानाची पारंपारिक शाही विसर्जन मिरवणूक आपल्या नेहमीच्या वैभवी दिमाखात सुरु झाली त्यात अनेक पक्षाचे नेते सामिल होऊन पुणेकरांच्या बरोबरीने या उत्सवात सामिल झाले होते.

.







विसर्जन मिरवणूक पाहाण्यासाठी विविध वयातील लहानथोर मंडळी अशी रस्त्यावर उभी राहून आपल्या लाडक्या दैवतीची मूर्ती डोळ्यात साठवून ठवीत असतात.

खास पुणेरी स्टाईल करुन विसर्जनाच्या मिरवणुकीत सामिल झालेली ही मंडळी



रमणबागेचे हे ढोल ताशाचे पथक..लक्ष्मी रस्ता दणाणून सोडणारे हे पथक...आकर्षकपणे आपली भारतील पारंपारिक कला मोठ्या अभिमानाने मिरवत...श्री गणेशाच्या चरणी या वाद्यांचा गजर करत आहे.


रोटरीच्या माध्यमातून परदेशीयांचा हा घोळका आपल्या भारतीय पोशाखात कसो शोभून दिसत होता.


नऊवारी साड्या नेसून महिलांनी आपली भारतीय ग्रामीण परंपराही ठसक्यात अशी सादर केली..


वडीलांच्या खांद्यावर बसून मुलगी मिरवणुक पाहण्याचा आनंद घेत आहे....मिरवणुकीत..वय,जात धर्म आणि वर्ण सा-यांच्या पविकडे जावून समाजमन एकत्र य़ेते असते...हे वैशिष्ठ्य..


कसबा गणपती 

बाबु गेनू चौकात कसबा गणेशावर अशी पुष्पवृष्टी केली गेली 




गुरुजी तालीम गणपती




 

तुळशीबाग गणपती




तांबडी जोगेश्वरी गणपती

 
 केसरीवाडा गणपती



रणरागिणी...तलवारीणी
 घोड्यावर बसलेल्या या स्त्रीयांनी आपण अबला नसून सबला आहोत..हे दाखवत मिरवणुकीतला आपला सहभाग विविध प्रकारे दाखविला..त्यातलाच हा एक..
तांबडी जोगेश्वरी गणपतीसमोर या महिलांचे हे पथक

प्रचंड मोठी रांगोळी काढून पुण्यातल्या मंडई परिसरातून सुरु होणा-या पुण्यातल्या गणपती विसर्जनानिमित्त एक सुंदर रंगकाम करुन दरवर्षी काढली जाते..ती रांगोळी वातावरणात आनंदाचा शिडकावा करते..

आजुबाजुच्या वातावरणामुळे यातला प्रशांत दामलेंचा आवाज तुमच्यापर्य़त पोचू शकत नाही..क्षमस्व....त्यांना यंदा शेवटच्या दिवशी पुण्यातल्या मिरवणुकीत सहभागी होताना खूप आनंद होत आहे...असेच ते सांगत होते..ते त्यांच्या देहबोलीतून दिसत होते...त्यांनीही गणेश भक्तांनी शुभेच्छा दिल्या आहेत..

Friday, September 28, 2012

संपलेल्या गोष्टी



       भिजून   जाव्या      
          रेतीवरल्या    जपलेल्या 
          जश्या  पाऊलखुणा   

निघून   जावे 
मेघ  तसेही 
चार थेंबा विना 
   
         दिवसही   यावा   
          निघून   जावा 
          उजेड  झाल्यविना 

संपून  जावा 
 प्रवास दीर्घ तो    
कुणा  सोबतीविना 
    
        कोरडे   वाह्वे  
         गाल आसवांचे 
           कुणी  पुसल्याविना  

संपून  जावी  
मैफील  जीवनाची  
 दाद  मिळाल्यावीना 

        पहाट   वाहवी 
        अंधार    संपुनी 

        सुंदर  स्वप्नावीना  


        -मैत्रेय 

  श्रीकांत  आफळे   
 shrikant maitreya shrikantmaitreya@gmail.com


Thursday, September 27, 2012

मनात साठलेला संजय सूरकर...







दिग्दर्शक संजय सुरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पुण्यात निधन ..बातमी वाचली आणि छातीत धस्स झाले..त्याचे माणूसपण आणि त्याचे कलाजीवन जवळून अनुभले..पण हे असे काहीतरी अघटित घडेल असे...खोटी ठरावी वाटणारी घटना खरी होती..त्याची स्मृती जागविताना शब्दातून घेतलेला हे संक्षिप्त शब्दपट...


महाराष्ट्र शासनाच्या वतीने काही वर्षापूर्वी राज्य नाट्य स्पर्धेंत सादर होणा-या अंतिम स्पर्धतील पहिल्या दोन संघातील नाटकातल्या कलावंतांसाठी नाट्य प्रशिक्षणाचे एक महिन्याचे निवासी शिबीर घेतले जाते होते. १९८० च्या सुमरास त्यापूर्वी ख्यातनाम दिग्दर्शिका श्रीमती विजया मेहता मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात हे शिबीर घेत असत..पण १९८० सालापासून त्यांनी नकार दिल्याने शासनाने त्या वर्षी प्रथमच मुंबई बाहेर म्हणजे पुण्यात भरत नाट्य संशोधन मंदिराच्या ग्रंथालयाच्या जागेत घेतले होते...त्याचा समन्वयक म्हणून माझी नेमणूक झाली होती...यात आमचा हा मित्र नागपुरच्या रसिक रंजन या संस्थेमार्फत शिबीरात दाखल झाला होता..तेव्हा पासून त्याने माझ्याशी गट्टी केली..ती अखेरपर्यंत...

नाटकातून तो चित्रपट क्षेत्राकडे वळला..त्याला स्मिता तळवलकरांनी `चौकट राजा`चे दिग्दर्शक संजय सूरकरला बनविले आणि तो पुढे तिथेच आपले करियर सुरु केले आणि सिध्दही करुन दाखविले..नंतर तो नागपूरकर न राहता महाराष्ट्राचा दिग्दर्शक बनला.

मितभाषी. सतत आपल्या विचारात आणि प्रसंगी हसत खेळत असणारा हा मित्र आज गेल्याची बातमी ऐकली आणि धसका बसला...

काही वर्षापूर्वी त्याची बायपास झाली तीही पुण्यातच पण त्यानंतर तो तब्येत सांभाळून. नव्हे एक झपाटलेल्या कलावंताप्रमाणे दिग्दर्शक म्हणून चित्रपट करणे सुरुचे ठेवले..अगदी अलिकडेच लोकमान्य टिळकांवर केला जाणारा चित्रपटही त्याने स्विकारला होता...आजही अखेरच्या दिवशीही तो पुण्यात चित्रिकरण करत होता...

तसे त्याचे वय फार नव्हते..पण कलावंत आणि त्यातही दिग्दर्शक म्हणून वावरताना असणारी व्यवधाने.. एकूणच तो जबाबदारीने सांभाळत होता..पण त्याचाही ताण असतोच की...यशस्वी झाल्याचा आनंदही पण चित्र व्यवहारात अडकले तर त्याचा ताणही तेवढाच येतो...



मुळात नागपुरची दिलदार वृत्ती घेऊन त्याने मुंबईच्या महानगरीत कलासक्त दिग्दर्शक म्हणून उत्तम स्थान कमावले होते.. अनेक पुरस्कारच्या बाहुल्या सांभाळूनही त्याच्यातली पटकथेकडे पहाण्याची तरल दृष्टी आणि कल्पकता कधीही संपुष्टात आली नाही...त्याच्यातला माणूसही तेवढाच सहृदयी होता...कलावंताची निवड करताना त्यांचे कलागुण माहित करुन त्यांना नवा चेहरा देण्याचे काम त्याने केले..

तो शरीरीने या सृष्टीतून गेला असला तरी आपल्या रसिकांच्य़ा मनावर त्याच्या चित्रपटांनी..वेगळ्या विषयांनी आणि सामान्य माणसांच्या असामान्य प्रश्नांनी घर केले आहे...त्याला तुमच्या सर्वांच्या वतीने ही शब्दांजली वाहतो..त्याच्या कलाजीवनाचा असा अचानक अंत व्हावा हे मात्र नियतीने योग्य केले नाही...त्याच्या स्मृती माझ्या आयुष्य़ात आणि आपल्या मनातही कायम राहतील..

संजय ..तुझे रुप आमच्या मनात भरुन आहे..तुझ्या यशस्वी कारकार्दीबद्दल आम्ही तुला कायमचे स्मरणाच ठेवणार आहोत..


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276 


मूळ बातमी...
पुण्यात दिग्दर्शक संजय सुरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पुण्यात निधन झाले. चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने सेनापती बापट मार्गावरील रत्ना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली.

चौकट राजा, सातच्या आत घरात, आनंदाचे झाड, सुखान्त, मास्तर एके मास्तर, सखी, तू तिथं मी हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

शिवाय छोट्या पडद्यावरील अवंतिका, सुकन्या, ऊन पाऊस या गाजलेल्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत अभिनेते सचिन खेडेकर होते. एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने संजय सुरकर पुण्यात होते.

Sanjay Surkar
Filmography

Marathi Movies as Director:
Sukhant (upccoming)
Master Eke Master (2009)
Tandala (2008)
Ek Daav Sansaracha (2008)
Sakhi (2007)
Aawhan (2007)
Anandache Zaad (2006)
Aaishappat(2006)
Saatchya Aat Gharat (2004)
Tu Tithe Mi (1995)
Rawraheb (1996)
Yadna (1994)
Aapali Manas (1993)
Chaukat Raja (1991)

TV Serials
Awantika (1998)
Sukanya (1998)
Un Paus (1998)