Saturday, April 21, 2012

हे तुझे जुनेच


बेचैन करुन टाकतेस मग तसेच सोडून जातेस..
हे तुझे जुनेच
काळजावर घाव घालतेस मग त्यावर फुंकर घालतेस
हे तुझे जुनेच
सगळं जुनं विसरून पुन्हा एक होतेस
हे ही जुनेच
आजही तेच त्या त्या आठवणी..ती केविलवाणी बोलणी
हे ही जुनेच
खरं तर हे सारं म्हणजे आयुष्य तर नसेल
हे ही जुनेच का?
दुःख विसरण्यासाठी डोळ्यातलं पाणी थांबविण्यासाठी
हे हे जुनचं तर नाही..
राहू दे आता सारे घरट्याकडे जावू,,,चोचीत चारा भरवू
हे ही तुझे जुनेच
कोण जाणे कधी बैभान..बेचैन सावधान असतेस
हे तर जुनेच सारे


बदलू म्हणता बदलणार नाही...जुने तेच सारे ..नव्या दिशेकडे झुकलेले


सुभाष इनामदार, पुणे

Friday, April 20, 2012

मसाला...पाहण्यात मौज वाटते


मसाला...अनुभवताना
उमेश कुलकर्णी यांनी लिहलेल्या संवादातून खुलत आणि घडत जाणारा आरभाट निर्मित मसाला पाहताना प्रथम फार वेगळेपणाने मांडलेली कथा पडद्यावर मोहविणारी होती...तिथे संघर्ष होता. धडपड होती. व्यवसायासाठी लागणारी धोरणे होती...पण ती पळपुटी होती. प्रत्येक व्यवसायात त्याला खोट येते आणि ततो दुस-या गावाला पळून वेगळा धंदा करतो...
नशीब बलवत्तर असलवे म्हणजे मेहता शेठ त्याच्यातल्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेऊन पोलिस चौकितून आपल्या गोडावूनमध्ये आणतात. अखेरीस तो टच मसालाच्या कारखान्याचा मालक बनतो.

एकूणच मसाल्याशी या ना त्या नात्याने संबंधीत चित्रपट.
उमेश,गिरीश णि दिग्दर्शनाची जबाबदारी खाद्यावर घेतलेला संदेश कुलकर्णी यांनी तयार केलेली कथा-पटकथा आणि प्रत्यक्ष चित्रपट किमान अनुभवाच्या क्लुप्त्या दाखविणारे आहे.

पहिली सुरवात होताना आणि मध्यंतरापर्य़त वाटले की प्रवीण मसालेवाल्यांचा तसा संबंध नसावा..पण मध्येतरानंतर सारेच सूत्र फिरतो ते मसाल्या भोवती..तिथे ती मजा संपते..राहतो तो एक उपचार.



भूमिकात सर्वात लक्षात राहतात ते दिलीप प्रभावळकर..संशोधकाच्या वेगळ्या जगात त्यांनी उत्तम कस दाखविला आहे. डॉक्टर लागूंचे दर्शन सुखद आहे. मोहन आगाशे खानदारी मेहता म्हणून छान वावरले..सफाई तर होतीच पण त्यात आश्वासकता होती.
गिरीश कुलकर्णी ग्रामीण ठसक्याची मजा संवादात आणतात..मात्र त्यात मला अमृता सुभाष थोडी कमी वाटली..तिच्या भावना पाहोचल्या पण बाज थोडी शहरीकडे झुकणार वाटला.. अभिनयातील सहजता हे त्यांचे वेगळे वैशिष्ठ्य. आळशी आणि थोडी विनोदाची बाजू सांभाळणारी भूमिका ऋषिकेश जोशीकडून पहायला मिळते..ती मजा आणि गंभीरपण बनवते.
एका नव्या टच मसाल्याची भर पडली एवढेच..

फार अपेक्षा घेऊन बघू नका..पण टेकिंग आणि विविध शहरांमधे हिडणारी ही कथा अनेक लोकेशन्सवर घडतात..ती पाहण्यात मौज वाटते.



(हे व्यकितशः निरीक्षण आहे.माझे पहिले ताजे मत एवढेच)
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, April 19, 2012

स्नेहाची प्रार्थना


कधी चढावे ओठावरती गाणे
तेच रुजावे ओठी
सुंदर बनुनी गात्री...

किती जनांच्या असती
नित्य तेची स्मरती
अखंड एक नाम
तेच व्हावया समर्थ व्हावे
तेजाचा बहुमान...

हिच प्रार्थना आज माझिया
स्नेहाने करतो
हिच आळवा ओठी रुजवा
भाळी टिळा भरतो...

सांगून गेली नित्य तुझिया
आसुसलेले मन
सहज स्मरावे कानी यावे
नित्य तेच ध्यान..

कुणास ठावे किती काळ हा
आयुष्याचा खेळ
चालवितो धनी त्याचा
कृतार्थ होते मन...




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

भार्गवीच्या गुजगोष्टी ऐकताना....




मालिकांमध्ये सतत दिसणारी एक मराठी कलाकार. तिच्या सोशिकपणाच्या भूमिकांना अधिक प्रतिसाद मिळतो. तीला तिची आजी विचारते तू त्या पाच महिन्याच्या पोटात मूल असलेल्या मुलीला घराबाहेर काढतेस..हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. मी तुझ्यावर रागावले आहे.


भाग्यविधाता, वहिनीसाहेब आणि अनुबंध या मालिकामधून दिसणारी आणि तेवढाच प्रभावी नृत्यविष्कार करुन नंबर वन ठरलेली ही नृत्यनिपुण कलावंत...तिला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी डहाणुकर परिसरातलेच नाही तर कोथरुडवासीय लोक ..विशेष गर्दी केली ती महिलावर्गाने..


भार्गवी चिरमुले आणि आताची सौ. भार्गवी पंकज एकबोटे...साधना कलामंचाचा सारा सभागृह ओथंबून वहात आणि ऐकायला बाहेरच्या खूर्च्यातूनही लोक दाटी करुन होते...

अरुण नूलकरांच्या प्रश्नांमधून तिने तिचे सारे करियर लोकांसमोर उलगडले...जरा सबुरीनेच पण रसिकांनी विषेशतः महिलावर्गाने तिला टाळ्यातून शाबासकी दिली.. वार्षिक व्याख्यानमालेची सुरवात भार्गवीच्या लोकप्रियतेमुळे छान अनुभवता आली.


मूळची मुंबईच्या रुपारेल आणि किंग्ज जॉर्जमध्ये शिकलेली ही भार्गवी...आता डहाणूकर निवासिनी झाली आहे...घरात अभिनयाचा वारसा नसताना आधी भरत नाट्य शिकली . बालनाट्याचून कामे केली आणि नंतर सहजपणे करुन बघू म्हणून कॅमेरा फेसकरुन मालिंकामध्ये स्वतःचे अस्तित्व सिध्द करुन घराघरात पोचली...

तिच्या मते आम्ही मेहनत खूप करतो पण नशीब उघडायला एक क्षणही पुरेसा असतो.... वहिनीसाहेब मधील निगेटीव्ह रोल मला मिळाला आणि सारे सारे..मिळाले..प्रेम..जिव्हाळा..आणि लोकप्रियताही..

मालिकांमुळे ब-याच सासू, आजी-आजोबा भेटतात..चोकशीही करतात...आजी विचारतात..स्वयंपाक येतो का...आजोबा...शिकलीस किती.... आणि हो भार्गवीला स्वयंपाक करायला आजीबात आवडत नाही... तीनचं आज सांगितले..


नेहमी दिसणारी साधी तर सोशिक आणि छळ सोसणारी सून... जेव्हा `एकापेक्षा एक` मध्ये नृत्य कौशल्याने वेगळेपण सिध्द करुन गेली ..आणि तेवढ्याच सहजपणे `फू बाई फू`च्या मंचावर नेहमी गंभीर भूमिकांसाठीचा हा चेहरा विनोदी भूमिकांत दिसू लागला तेव्हा...भार्गवीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनच बदलला.

एकूणच तिच्या बोलण्यात प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास ठासून भरलेला होता..एकबोटेंकडे अनुरुप या विवाह संस्थेत नाव नोंदवून रितसर पाहून भार्गवी सून म्हणून गेली..तरी तिच्या अभिनयाला खंड पडला नाही...तसाच जोडीडार तिला हवा होता..एवढेच काय पण एकापेक्षा एक मध्ये एका पायावर नाचणा-या या सूनेची नृत्य किमया सासबाईंनीही पाहिली नव्हती...त्यांच्या घरातल्यांनी ही मुलगी सिरियलमध्ये लोकप्रिय आहे ह्याचा ठावठिकाणाही नव्हता...

सुबक अर्थात सुनिव बर्वे कलाकृतीच्या झॉपी गेलेला जागा झाला मध्ये काम करुन नाटकात काम करण्याचा अनुभव तिच्या पदरी आला..तिच्या मते नाटकात काम केल्याने हातवारे. बॉडिलॅंग्वेज, उभं कसं रहायचं. चालायचं कसं आणि मुख्य म्हणजे आवाज कसा वापरायचा हे कळल...

`चार दिवस सासूचे`च्या कलावंतांना आता सिरियल केव्हा बंद होणार हा प्रश्न विचारला जातो...हे सांगताना ती म्हणते...थोडी रागवून..कलावंताला मालिका बंद केव्हा होणार हा प्रश्न विचारणे त्याच्यावर अन्याय आहे..डॉक्टरला विचारता दवाखाना कधी बंद करणार....तुम्हाला नाही आवडली तर पाहू नका..टीआरपी आपोआपच खाली येते मालिका बंद होते.
तशी मी लगेच रागावते...तो राग शात व्हावा म्हणून हातात मोत्याची अंगठी घातली आहे...मात्र मी आहे तशीच आहे.. हातातल्या अंगठ्या वरुन प्रेक्षकातून आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ती सांगत होती...

एक बातमी मात्र तिने नाटकांच्या रसिकांना दिली...ती म्हणजे...सुबक लवकरच `हमिदाबाईची कोठी,` `सूर्याची पिल्ले` आणि `झोपी गेलेला जागा झाला` या नाटकांचे आणखी वीस प्रयोग करणार आहे....तेव्हा भार्गवीच्या झोपी मधल्या भूमिका पहाण्याचा योग येणार आहे....

सेलेब्रीटी स्टेटस आलेल्या भार्गवी चिरमुलेनी आपले शुटिंगचे. मालिकेतले आणि रसिकांचे अनुभव सांगून मनोरंजनाबरोबरच आपला दृष्टीकोनही स्पषट केला...संवादातून ती साधक म्हणून कशी आहे..आणि
लोकप्रिय असूनही साधेपणा असणा-या सोशिक कलावंताला पाहण्याचा योग या निमित्ताने कोथरुडला आला...
पुणेरी रसिक..तिला पाहून भरुन पावले....


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Posted by सांस्कृतिक संकेतस्थळ