ओसरे चेह-यातून तेजाचा झरा
ह्दयी वसला, रुतून बसला
घडीभराचा नाजुक तो मुजरा
नजर घारदार, केसांची ती कुंतले
मनात माझ्या, दाटून बसावी
उभा क्षणभरी, ह्दयात जपली इष्काची छबी
बेभान पुरा होतो, नजर गुंतली इथे
भानावर येतो तरीही स्वप्नात दंगुनी गेलो
इष्काच्या अंगणी रंगूनी कसा ग गेलो
कसे गुंतून गेला, मजवरी होतसे फिदा
करु किती आठवा ,उभी राही तुझी सदा ही अदा
सय बेभान, लय नादान
रुते गुंता ..मनी रंगतो
वाटतो जीवही असा की ग दंगतो
-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Friday, February 22, 2013
Monday, February 18, 2013
आहे हा असा आहे...
खरचं आज किती दिवस
झाले. चपलांनी आता थांबायची विनंती केली आहे. पण कुणास ठावे त्यांना कधी कच-याची
टोपली दिसणार. ..
कितीही घरचे किंवा
मित्र म्हणाले तरी नवे काही खरचं घेतले जात नाही.
अगदी जीर्ण
झाल्याशिवाय जुनी टाकून नवी घ्यायची नाही ..हा जणू पण असल्यासारखे..
प्रत्त्येकाला वाटते
टेचात रहावे. इतरांवर प्रभाव पडावा असे झकपक रहावे.. अंगावर सेंट मारावा. झोकात ,
ऐटीत मिरवावे..
खर सांगू मला असे
कधीच वाटत नाही..कारण शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा...
जुने दिवस आठवतात..
खिशात फारसे काही नव्हते तेव्हाही हे सारे असेच घडत होते. पैसा खर्च करताना याची
आत्ताच आवश्यकता किती आहे ..हाच पहिला विचार येतो...आजही..
सहज लक्षात आली
म्हणून सांगतो..
कामावर असताना..मला
वरिष्ठांकडून बोलावणे आले...आहो, तुम्ही आता एका विभागाचे प्रमुख आहात. पायात
बूट..कपडेही टापटिपीत आणि टाय वगैरे वापरत चला..तुम्हाला जर पैशाची अडचण असेल तर
कंपनी परतफेडीच्या बोलीवर तेही देईल..
मी..त्यांना
उलटटपाली निरोप पाठविला..की मी दिसण्यासाठी काम करत नसून कामासाठी आहे...मी असे
कपडे वापरीन जे नोकरीनंतरही मला माझी ओळख देतील...तेव्हा हा विषय पुन्हा
माझ्यासमोर नको...
झाले तेच..पुन्हा हा
विषय निघाला नाही..पुढे अनेक वर्ष मी जसा आहे तसाच वावरलो..समाजात आणि त्या
कार्यालयातही..
मला स्वतःला असे
वाटते...कपड्यानी माणूस शोभतो..पण ते दिसणे यापेक्षाही कामातून दिसलात तर अधिक
प्रभाव पडतो....
म्हणून सारे
दिवस..हे असेच..विचार आणि रहाणीमान...
याला तुम्ही साधेपणा
म्हणा वा शिष्टपणा...
मी आहे हा असा
आहे... ना खंत..ना त्याचा खेद..
-
-सुभाष इनामदार,पुणेsubhashinamdar@gmail.com
9552596276
मदत
मदत करणारे हात आज आसुसलेत
त्याची किंमत समजणारे मात्र आक्रसलेत
मागितल्याशिवया केलेली मदत
कदाचित आवडणार नाही
तुमचा हेतू त्यांना कधी कळणारही नाही...
रोज भोवती असंख्य प्रश्न
निवडीचा आहे तुमचा यत्न
हात देतानाही जरा सावध रहा
स्वतःवर तेव्हाही विश्वास हवा
मदत कधी तोंडून सांगू नका
घेतला वसा कधी टाकू नका
तुमचा विश्वास तुमच्यावर खास
मदतीसाठी आहे एकच ध्यास
धन हे केवळ जतन करु नका
ज्याला गरज
त्याला हात पसरवायला लावू देऊ नका
इति- सुभाष इनामदार,पुणे
Subscribe to:
Posts (Atom)