साधना धर्म..साधना मर्म
सांगे तो कर्म गुरू माझा...!
करोनी ध्यान .. जाणतसे मर्म
तेची आहे साधन.. सदा ..!
घेई मुखी नाम..तोची माझा नेम
नित्य आहे काम ..सदा वाचे..!
करोनी एकाग्र.. साधना ती हवी
तेंव्हाच कधीतरी..साध्य होई..!
परिपूर्ण नाही..जगी असे कोणी
साधना अवीट.. जाणोनिया..!
गरू सांगे मज..नको पळवाट
साधना अनमोल.. जाण असे..!
आता करू निश्चय..निर्णय थोर
तपस्या माझी..कायमची..!
हाच माझा निर्धारु..दृढ असे भाव
गुरूच्या प्रती.. आदर असे..!
नमती मस्तके ..गुरूच्या पायी
आनंद होतसे..मजठायी..!
_ subhash inamdar, Pune