Monday, August 6, 2018

बाबूजींच्या गाण्याचा स्मृतीगंध बहरत गेला



अभिजित पंचभाई यांच्या गीतांना दिली रसिकांनी पावती

आम्हा कलाकारांच्या मनात बाबुजींचे गाणे कायम आहे. लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत मी वाढलो. त्याचे कारण माझी आई. त्याकाळी कॅसेट असायची. मला आठवते एका बाजुला सगळी बाबुजींची गाणी होती. आणि दुसरी बाजु होती त्यात गीतरामायणायतली गाणी त्यात होती. ती गाणी लहानपणापासून घरीत कानावर पडत पडत मी मोठा झालो. त्यावेळी त्याचा अर्थ कळत नव्हता. केवळ कानाला आणि मनाला छान वाटायचे. आई कधी त्यातली गाणी ऐकताना डोळ्यातून पाणी काढायची. मला त्याकाळी हे काही समजायचे नाही. नंतर मी आईला एकदा विचारले, तुला गाणी ऐकून डाळ्यात पाणी का येतं. तेव्हा ती म्हणायची, तु मोठा झालास की तुला ते आपोआप कळेल

आता मला खरच त्या गाण्याचा अर्थ मला समाजयला लागलाय. एकेक गाणं ऐकता एकता जीव कातर करून टाकतात बाबुजी. असं ते गाणं मनात रूततं. भावनामय झालेली गाणी  कार्यक्रमात फारशी घेतली जात नाहीत.
जी गाणी लोकांनाही आवडतात.. आणि आपल्यालाही गाता यतील. ती गाणी घ्यायचं नक्की केलं. फार वाद्यमेळ घेता. हार्मेनियम, तबला आणि तालवाद्य या तीन शिलेदारांवर हा कार्यक्रम करायचे धाडस केले. पहा तो तुम्हाला कसा वाटतो.

हे माझ्या आयुष्यातलं आठवणींचे मैत्र लहानपणापासूनचे आहे. जे मला माझ्या सर्व रसिक मित्रांशी शेअर करावेसे वाटले. म्हणून हा` मैत्र आठवांचे` हा उपक्रम सुरु केला.  ह्या गीतांचा दरवळ मनात सतत सुगंध देत रहातो. हा सुंदर वास आपण आयुष्यभर विसरत नाही. तोच बाबुजींच्या गाण्याचा  दरवळ  रसिकांपर्य़त हा पोचविण्याचा प्रयत्न..कधी  बहर  कधी शिशीर..या कार्यक्रमातून ..

गेली बारा वर्षे पुणेकर रसिकांच्या मनात गीतरामायण रामनवमीच्या निमित्ताने कोरणारा अभिजित पंचभाई..रविवारी ओगस्टला पुण्यात सुधीर फडके यांची अविट गोडीची आणि जीवनाचा अर्थ सागणारी गीते निवडून त्यातून  दोन तास खिळवून ठेवणारा कार्यक्रम सादर केला.. 

सुधीर फडके यांनी रूजविलेल्या चाली..आपल्या मनात भारून त्या आपल्या आवाजातून सादर करून लोकांच्या मनात बाबुजी पुन्हा एकदा लोकांसमोर आणले..त्यांचे शब्दोच्चार..त्यांची देहबोली आणि त्यांची  भारावून टाकणारी सुरावट.. या निमित्ताने मोहवून गेली.





राम फाटक, राम कदम, आणि दस्तुरखुद्द सुधीर फडके यांच्या चालीतून कार्यक्रम पुढे जात राहिला आणि अभिजित पंचभाई यांच्या आवाजातून भावनेला साद घालत गीते् मनात घर करत पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटत असतानाच पुढे सरकत राहिली.




बाबुजी तथा संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अभिजित पंचभाई यांनी रसिकांसाठी हा त्यांच्या अनेक गीतांचा सुगंध देणारा दरवळ बेभानपणे रिता केला.  ज्या संगीतकार, गायकाच्या अनेक गाण्याची त्यांनी पारायणे केली त्याची ही फलश्रुती होती. आपल्या अत्यंतिक लाडक्या गुरूला ही भावओंजळ वाहिली तीही असंख्य जाणकार आणि कान असलेल्या लोकांच्या संगतीत.. आणि त्यातून त्यांना जाणवला विलक्षण  स्नेहभाव.. लोकांनी टाळ्यांची दाद तर दिलीच पण पुढचे काही कार्यक्रम असेच करण्यासाटी त्यांनी आर्थिक बळही दिले.





स्वर आले दुरूनी, पासून  या सुखांनो या ,सारखे  आशा भोसले यांनी लोकप्रिय केलेले गीतही अभिजित  आपले मानून सादर केले. .. त्या गाण्यात ती आर्तता ती भावना रसिकांच्या मनापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. दाम करी काम आणि डाव मांडून भांडून  सारखी वेगळ्या धाटणीची गाणीही त्याने गायली.  लळा जिव्हाळा सारखे भावनांना साद घालणारे.. माणसांचे खरे दर्शन घडविणारे गीतही तेवढ्या गंभीरपणे शब्दांना आणि अर्थाला न्याय देत सादर केले



डोळ्यामधले आसू पुसतील.. सारखे भावपूर्ण गीत..आणि चालली शकुंतला.. म्हणताना तर त्याच्या डोळ्यात पाणी तरळून आले.  दिसलिस तू सारखे  प्रेम  व्यक्त करणारे गाणे..आणि ..आनादी मी अनंत मीसारखे धेय्यपूर्ण गीताची धीटाईने मांडणी करून ते त्याच शक्तिने स्वरांच्या  शब्दांच्या  माध्यामातून अंगावर काटा येईल असे समर्पक गायले

कार्य़क्रमाचा अखेर केला तो तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे ..या भावमधूर गीताने. चाल सुधीर फडके यांची..मांडणी त्याच पध्दतीची.. आणि ती सादर करताना त्यां चालींना पूर्ण न्याय देत ..आपल्या स्वरांतून या लोकप्रिय आणि अनवट वाटावी अशी गाणी अभिजितने श्रोत्यांच्या मनात रूजविली. अनेकजण तीच गाणी आपल्या ओठावर नाचवत ऐकत होते.


रंजना काळे यांनी आपल्या निवेदनातून प्रसंगा मागची भूमिका आणि गाण्यातले वेगळेपण सांगताना बाबुजींनी गाणी करताना त्या प्रसंगानुरूप विचार मांडत व्यक्त करीत होत्या..रसिकांशी संवाद साधत आणि गायकाला  विश्रांती देत..गाण्याला पुढे नेण्याचे काम खरंच उत्तम केले.









अभिजितच्या शब्दात सांगायचे म्हणजे..`हा सगळा कार्यक्रम तिन शिलेदांच्या खांद्यावर वाहून नेला..ते म्हणजे हार्मोनियम ची साथ  केलेल्या दिप्ती कुलकर्णी..तबला संगतीतून तालाचा भक्कम आणि  नेटका संगत करणारा अभिजित जायदे..आणि विविध वाद्यातून गीताला नटवून..योग्य त्या ठिकाणी काहीसा नाजूक पण आवश्यक ठेका देणारे उध्दव कुंभार.. समर्थ साथीने..












मध्यंतरानंतर दिप्ती कुलकर्णी यांनी जगाच्या पाठीवर चित्रपटाले राजा परांजपे यांच्यावर चित्रित केलेले ..गळ्यात पेटी घेऊन..सिमा देव यांच्या सोबतीने पडद्यावर गाजलेले ..बाई मी विकत घेतला न्य़ाय... हे गाणे आपल्या वाद्यातून उत्तमरित्या साकार करून..त्यांच्यातल्या कलेच्या किमयाची चमक सिध्द केली..



अभिजित पंचभाई यांनी `कधी बहर..कधी शिशिर`, या शिर्षकाखाली..सादर केलेला कार्यक्रम म्हणजे बाबुजींच्या निवडक पण सार्थ गीतातून  सादर केला हा स्मृतीगंध..

असे अनंक कुंभ रसिकांच्या चरणी अर्पण करण्याची त्यांची मनीषा आहे..त्यांच्या या कृतिची रसिक नेहमीच वाट पहात असतील..






-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com