Saturday, October 27, 2012

घे आकाशी भरारी...



गेली काही वर्षे मी माझ्या मुलीला वाढदिवसाच्या निमित्ताने शब्दिक शुभेच्छा देतो..आजही त्या तशाच दिल्या...आज तिच्या सांगण्यानुसार मुक्तछंदात नको ..आणि काही आम्हाला कळेल अशा शब्दात लिहा..
मी तेच करायचा प्रयत्न केलाय..तोच तुमच्यासमोर ठेवत आहे...



वर्ष तुझे वाढता, हर्ष मानसी होतसे
सूखिया तुला पाहता, उल्हास मनी दाटसे..

सरले बालपण आता, शैशव तुझे संपले
बोबडे बोल ते चित्ती, आठव अजूनी ना विरले..

चैतन्याचा स्पर्श खरा, होतो तुझीया देहा
चित्त स्थिर, मार्ग सुकर, स्पष्ट ते धेय्य गाठाया..

खरा प्रवास आता सुरु, धेय्य तुझे स्पष्ट
उजळून चारी दिशा, तू घेतलेस लक्ष्य...

यश कीर्तिची दारे, आता पुढे सामोरी
सारथ्य करतो आम्ही, घे आकाशी भरारी...


तुझाच,

बाबा..




सुभाष इनामदार, पुणे
२७ ऑक्टोबर, २०१२

Tuesday, October 23, 2012

ज्योत आता कुठं दिसत नाही


 
 
सणांची महती आता तेवढी उरली नाही
पिवळ्या धमक झेडूंनी तोरणं चौकटीवर
सिंमेंटच्या दारांवर खिळ्यातून झुलत
अलगद लटकवली जाताहेत
वाडा..कौलारु घर..बैठ्या चाळी सारेच हरविले
बंदिस्त अधिक बंदिस्त जग
बाहेरून डोकावायचीही सोय नाही
झरोकाही उरला नाही.
कोनाडाही दिसत नाही
ज्योत आता कुठं दिसत नाही
प्रकाश अंधुकसा तोही वीजेच्या दिव्यांनी सजतोय
नवी नाती तशीच बंदिस्त होत आज माणूस जगतोय..




-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276