विविध मोटारींच्या छोट्या प्रतिकृतींमधून रत्नाकर जोशी यांनी उभी केली आहे गणपतीची सजावट.
पर्वती पायथ्याला लक्ष्मी-नगरमध्ये राहणाऱ्या जोशींनी केलेली ही सजावट पाहण्यासाठी,
मोठ्यांबरोबर बालगोपाळांनीही गर्दी केली आहे.
सजावटीचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्या या वेगळ्या सजावटीचे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध केल्यानंतल, त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली. प्रादेशिक परिवाहन विभागात नोकरी करणाऱ्या जोशी यांनी गेली काही वर्षे मोटारींच्या प्रतीकृती जमवण्याचा छंदच होता.
ते नोकरी निमित्ताने किंवा घरगुती कामासाठी बाहेरगावी गेले की,
ते नवनवीन मोटांरींच्या प्रतिकृती शोधत असत.
आज त्यांचेकडे एकशे दहा वेगवेगळ्या मोटारींची छोटी प्रतिके उपलब्ध आहेत.
यातल्या कांही गाड्यातर रिमोटवर चालतातही.एक ट्रॅक्टर तर सर्व कामे करुन दाखवितो.
रत्नाकर जोशी गेली कांही वर्षे घरच्या गणपती समोर वेगवेगळी सजावट करुन गणेश भक्तांना आकर्षीत करताहेत.
यंदा मात्र त्यांच्या मोटारीचा छंदच सजावटीसाठी पुढे आला.
गजाननाचे वाहन उंदीर पण काळाबरोबर त्यांच्या घरच्या गणेशाला वाहनांच्या गराड्यात
उभे राहून आपले दर्शन देण्याची इच्छा झाली आहे.
वेगवेगळे रस्ते, वाहनांचे प्रदुषण, वाहतूकीसाठीचे नियम या साऱ्यांना
साजावटीत सामावण्याचे ते विसरले नाहीत.
त्यांची पत्नी आणि मुलगीही त्यांच्या या छंदाला मदत करतात.